मुख्य मजकुरावर जा

Solomon बद्दल बायबलमधील वचने: Builds his house of the forest of Lebanon

6 वचने · 46 पैलू

Builds his house of the forest of Lebanon बद्दल वचने

  1. त्याने लबानोनच्या वनात जो राजवाडा बांधला त्याची लांबी शंभर हात, रुंदी पन्नास हात व उंची तीस हात होती, त्याला गंधसरूच्या खांबांच्या चार रांगा होत्या व त्याला आधार देण्यासाठी गंधसरूच्या छाटलेल्या तुळया होत्या.

  2. त्या खांबांवर एका ओळीत पंधरा तुळया; अशा पंचेचाळीस तुळया होत्या व त्यावर देवदारूच्या फळ्यांचे छत होते.

  3. त्याच्या खिडक्या उंचावर समोरासमोर तीन अशा जोडीने बसविल्या होत्या.

  4. सर्व दरवाजांना चौकट बाह्या होत्या; त्या समोरच्या बाजूने समोरासमोर तीन अशा जोडीने होत्या.

  5. त्याने पन्नास हात लांब व तीस हात रुंद अशी खांबांची एक पंक्ती बनविली. त्याच्यासमोर एक द्वारमंडप होता व त्यासमोर खांब व त्यावर छत होते.

  6. त्याने राजासनासाठी खोली बांधली, जी न्यायाची खोली, जिथे बसून तो लोकांचा न्याय करणार, त्या खोलीला जमिनीपासून छतापर्यंत गंधसरूच्या फळ्यांनी झाकले.