Ophir
22.0000, 77.0000 गूगल नकाशावर पाहा
Ophir चा उल्लेख असलेली वचने
त्यांनी ओफीरपर्यंत प्रवास करून चारशे वीस तालांत सोने परत आणले व ते शलोमोन राजाला दिले.
(त्याचप्रमाणे हीरामच्या गलबतांवर ओफीर येथून सोने व मोठ्या प्रमाणात चंदनाचे लाकूड व मोलवान रत्ने आणली.
ओफीर शहरातून सोने आणता यावे म्हणून यहोशाफाटने व्यापारी जहाजे बांधली होती. पण ती एजिओन-गेबेर येथे फुटली, त्यामुळे ती समुद्राची वाटचाल करू शकली नाहीत.
ओफीराचे तीन हजार तालांत सोने आणि मंदिराच्या भिंती मढविण्यासाठी सात हजार तालांत शुद्ध चांदी.
आणि हीरामाने त्याला आपल्या माणसांबरोबर म्हणजेच त्याच्या अनुभवी खलाश्यांनी चालविलेली जहाजे पाठविली. त्यांनी शलोमोनच्या माणसांबरोबर ओफीरपर्यंत प्रवास करून चारशे पन्नास तालांत सोने परत आणले व ते शलोमोन राजाला दिले.
(हीरामच्या सेवकांनी आणि शलोमोनच्या सेवकांनी ओफीर येथून सोने आणले; त्यांनी चंदन आणि मोलवान रत्ने ही सुद्धा आणली.
जर तू आपले सोने धुळीत मिळवशील, आणि तुझे ओफीराचे सोने नदीच्या गाळात टाकून देशील,
ओफीराचे सोने, मोलवान गोमेद किंवा नीलमणी, यांनीही त्याचे मोल करता येणार नाही.
राजकन्या तुझ्या आदरणीय स्त्रियांमध्ये आहेत; तुझ्या उजवीकडे राणी उभी असून तिने ओफीरच्या सोन्याचे दागिने घातले आहेत.
मी लोकांना शुद्ध सोन्यापेक्षा दुर्मिळ करेन, ओफीरच्या सोन्यापेक्षाही अप्राप्य करेन.