Skip to content

Algum बद्दल बायबलमधील वचने

5 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. (त्याचप्रमाणे हीरामच्या गलबतांवर ओफीर येथून सोने व मोठ्या प्रमाणात चंदनाचे लाकूड व मोलवान रत्ने आणली.

  2. शलोमोनने याहवेहच्या मंदिरात व राजवाड्यात कठडे बनवण्यासाठी व वादकांसाठी वीणा व सतारी बनविण्यास चंदनाच्या लाकडाचा उपयोग केला. तेव्हापासून आजपर्यंत हे चंदन ना कुठे आणले गेले ना ते कोणाच्या दृष्टीस पडले.)

  3. “याशिवाय लबानोनच्या जंगलातून गंधसरू, देवदारू व रक्तचंदन यांची लाकडे माझ्याकडे पाठवा. लाकडे कापून पाठविण्याच्या कामी तुमचे लोक निष्णात आहेत हे मी जाणतो. माझे कारागीर तुमच्या कारागिरांसह काम करतील.

  4. (हीरामच्या सेवकांनी आणि शलोमोनच्या सेवकांनी ओफीर येथून सोने आणले; त्यांनी चंदन आणि मोलवान रत्ने ही सुद्धा आणली.

  5. शलोमोनने याहवेहच्या मंदिरात व राजवाड्यात पायर्‍या बनवण्यासाठी व वादकांसाठी वीणा व सतारी बनविण्यास चंदनाच्या लाकडाचा उपयोग केला. यहूदीयामध्ये त्यासारखे कधीही पाहण्यात आले नव्हते.)