- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Solomon बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
तो उतार वयाचा होईपर्यंत, त्याच्या पत्नींनी त्याचे हृदय इतर दैवतांकडे वळविले आणि त्याचा पिता दावीदाप्रमाणे शलोमोनचे हृदय आता संपूर्णपणे याहवेह त्याच्या परमेश्वरास समर्पित नव्हते.
शलोमोन सीदोन लोकांची देवी अष्टारोथ आणि अम्मोनी लोकांचे अमंगळ दैवत मोलेख याची उपासना करू लागला.
याप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते शलोमोनने केले; त्याचा पिता दावीदाने केले त्याप्रमाणे शलोमोन याहवेहला पूर्णपणे अनुसरला नाही.
शलोमोनाने यरुशलेमच्या पूर्वेकडील डोंगरावर मोआबाचे अमंगळ दैवत कमोश व अम्मोनी लोकांचे अमंगळ दैवत मोलख यांच्यासाठी पूजास्थाने बांधली.
आपल्या परदेशीय स्त्रिया, ज्या धूप जाळून आपआपल्या दैवतांना यज्ञ अर्पण करीत होत्या, त्यांच्यासाठी सुद्धा त्याने तसेच केले.
शलोमोनचे हृदय याहवेह इस्राएलचे परमेश्वर, ज्यांनी त्याला दोनदा दर्शन दिले होते त्यांच्यापासून दूर वळले होते, म्हणून याहवेह शलोमोनवर रागावले.
जरी याहवेहने इतर देवांचे अनुसरण करण्यास मना केली होती, तरी शलोमोनने याहवेहची आज्ञा मानली नाही.
म्हणून याहवेहने शलोमोनला म्हटले, “तुझी ही वृत्ती आहे, आणि मी तुला लावून दिलेल्या माझ्या कराराचे व विधींचे पालन तू केले नाही, मी खचितच तुझे राज्य तुझ्यापासून हिसकावून घेईन व ते तुझ्या हाताखालच्या मनुष्याला देईन.
तथापि, तुझा पिता दावीद याच्याप्रीत्यर्थ, ते मी तुझ्या जीवनकाळात करणार नाही. ते मी तुझ्या पुत्राच्या हातून हिसकावून घेईन.
तरीही, संपूर्ण राज्यच मी त्याच्यापासून हिसकावून घेणार नाही, तर माझा सेवक दावीद व यरुशलेम ज्यांना मी निवडले, याच्याप्रीत्यर्थ एक गोत्र मी तुझ्या पुत्राच्या हाती देईन.”
“तुमच्या पित्याने आमच्यावर भारी जू ठेवले, तर आता मजुरीचा हा कठीण भार व हे भारी जू आपण हलके करावे, म्हणजे आम्ही आपली सेवा करू.”
पुढे शलोमोनाने यरुशलेमच्या पूर्वेकडील आणि विध्वंसगिरीच्या दक्षिणेकडील टेकड्यांवरील मंदिरे काढून टाकली. ही मंदिरे इस्राएलचा राजा शलोमोनाने सीदोन्यांच्या अष्टारोथ, मोआबाच्या कमोश आणि अम्मोन्यांच्या मिलकाम या अमंगळ दैवतांसाठी बांधली होती.
योहानान यास अजर्याह झाला. अजर्याह शलोमोनाने यरुशलेमात बांधलेल्या मंदिरात याजक म्हणून सेवा करीत असे.
जेव्हा तुझे दिवस भरतील आणि तू आपल्या पूर्वजांना जाऊन मिळशील, तेव्हा मी तुझे संतान, तुझ्या पुत्रांपैकी एक उभा करून त्याला तुझा उत्तराधिकारी बनवीन, मी त्याचे राज्य स्थापित करेन.
तोच माझ्यासाठी घर बांधेल आणि मी त्याचे राजासन सर्वकाळासाठी स्थापित करेन.
मी त्याचा पिता होईन आणि तो माझा पुत्र होईल; ज्याप्रकारे मी तुझ्या पूर्वजापासून काढून घेतले होते तसे मी माझे प्रेम कधीही त्याच्यापासून काढून घेणार नाही.
मी त्याला माझ्या मंदिरावर आणि माझ्या राज्यावर नेमीन; त्याचे राजासन सर्वकाळासाठी स्थापित केले जाईल.’ ”
जेव्हा दावीद वृद्ध व वयातीत झाला, तेव्हा त्याने आपला पुत्र शलोमोनला इस्राएलचा राजा बनविले.
याहवेहने मला सांगितले: ‘तुझा पुत्र शलोमोन माझे मंदिर आणि अंगण बांधील, कारण मी त्याला माझा पुत्र म्हणून निवडले आहे आणि मी त्याचा पिता होईन.
त्याने माझ्या आज्ञा आणि सूचना आतापर्यंत पाळल्या, त्याप्रमाणे जर तो यापुढेही काटेकोरपणाने पाळल्या, तर मी त्याचे राज्य सदासर्वकाळ टिकवेन.’
त्यांनी त्या दिवशी याहवेहसमोर मोठ्या आनंदाने खाणेपिणे केले. नंतर त्यांनी दावीद राजाचा पुत्र शलोमोनचा याहवेहसमोर आणि सर्व पुढार्यांसमोर पुन्हा राज्यकर्ता म्हणून राज्याभिषेक केला. आपला याजक म्हणून त्यांनी सादोकाचाही याजक म्हणून अभिषेक केला.
सर्व अधिकारी आणि शूरवीर सैनिक, दावीद राजांच्या पुत्रांनी राजा शलोमोनशी एकनिष्ठ राहण्याचे वचन दिले.
याहवेहने शलोमोनाला इस्राएलीदेखत सर्वाधिक सन्मान दिला आणि इस्राएलमध्ये कोणत्याही राजाला त्याच्यासारखे शाही ऐश्वर्य दिले नव्हते.
त्या रात्री परमेश्वर शलोमोनला दर्शन देऊन म्हणाले, “मी तुला जे काही द्यावे असे तुला वाटते ते माग.”
शलोमोनाने परमेश्वराला उत्तर दिले, “आपला सेवक माझे पिता दावीद याला आपण अपार दया दाखविली आणि त्यांच्या जागी तुम्ही मला राजा म्हणून नेमले.