Skip to content

Solomon बद्दल बायबलमधील वचने

301 वचने · 46 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तुझे झगे गंधरस, जटामांसी आणि दालचिनी यांनी सुगंधित केलेले आहेत; तुझ्या हस्तिदंती राजवाड्यामध्ये, तंतुवाद्याचे संगीत तुला आनंदित करतात.

  2. राजकन्या तुझ्या आदरणीय स्त्रियांमध्ये आहेत; तुझ्या उजवीकडे राणी उभी असून तिने ओफीरच्या सोन्याचे दागिने घातले आहेत.

  3. अगे कन्ये, ऐक, काळजीपूर्वक लक्ष दे; तू आपली माणसे आणि आपल्या पित्याचे घर विसर.

  4. तेव्हा राजा तुझ्या सौंदर्यात आनंद करेल; त्याचा आदर कर, कारण तो तुझा स्वामी आहे.

  5. सोराची कन्या नजराणे घेऊन येईल, श्रीमंत लोक तुमची कृपा लाभावी म्हणून इच्छा करतील.

  6. राजकन्या, आपल्या अंतःपुरात तेजस्वी आहे; तिची भरजरी वस्त्रे सोन्याच्या धाग्यांनी विणलेली आहे.

  7. नक्षीदार वस्त्रांनी नटवून तुला राजाकडे नेण्यात येत आहे; तिच्या कुमारी सख्या तिच्या मागोमाग चालल्या आहेत— त्यांना तुझ्याकडे आणण्यात येत आहे.

  8. राजमहालात प्रवेश करीत असताना, त्यांची मिरवणूक किती आल्हाददायक आणि हर्षपूर्ण वाटते.

  9. तुझे पुत्र आपल्या पित्याप्रमाणे राजे होतील, जगातील सर्व सिंहासनावर ते बसतील.

  10. सर्व पिढ्यांमध्ये तुझ्या नावाचे स्मरण होईल, असे मी करेन; जगातील राष्ट्रे सर्वकाळ तुझी स्तुती करतील.

  11. याहवेहनी दावीदाला शपथ घेऊन म्हटले की, एक अशी शपथ जी ते कधीही मोडणार नाहीत: “तुझ्या वंशजांपैकी एकाला मी तुझ्या राजासनावर विराजमान करेन.

  12. मी, उपदेशक, यरुशलेममध्ये इस्राएलचा राजा होतो.

  13. मी स्वतःला म्हटले, “पाहा, यरुशलेममध्ये माझ्या आधी राज्य करून गेलेल्या राजांपेक्षा, मी अधिक सुज्ञान प्राप्त केले आहे; सुज्ञान आणि विद्या यांचा मला सर्वात अधिक अनुभव घडला आहे.”

  14. मी मोठे प्रकल्प हाती घेतले: स्वतःसाठी घरे बांधली आणि द्राक्षमळे लावले.

  15. मी बागा आणि उद्याने बनवून त्यामध्ये प्रत्येक प्रकारची फळझाडे लावली.

  16. त्या बहरलेल्या झाडाना पाणी मिळावे म्हणून मी जलाशय बनविले.

  17. मी स्वतःसाठी चांदी आणि सोन्याचा व राजांच्या व प्रांताच्या मौल्यवान वस्तूंचा मोठा संग्रह केला. मी गायक आणि गायिका ठेवल्या, तसेच उपपत्न्यांसाठी जनानखानाही तयार केला—जे मनुष्याचे हृदय हर्षित करते.

  18. माझ्यापूर्वी यरुशलेममध्ये असलेल्यांपेक्षा मी फार थोर झालो. या सर्वांमध्ये माझे ज्ञान माझ्यासोबत राहिले.

  19. याहवेहच्या मंदिरासाठी शलोमोन राजाने तयार केलेले दोन खांब, मोठी टाकी व त्याखालील बारा बैल आणि बैठकी यांचे वजन करणे कठीण होते.

  20. इशाय दावीद राजाचा पिता, दावीद शलोमोनाचा पिता, शलोमोनाची आई पूर्वी उरीयाहची पत्नी होती,

  21. तरी मी तुम्हाला सांगतो की शलोमोनदेखील आपल्या सर्व वैभवात त्यांच्याइतका नटला नव्हता.

  22. दक्षिणेची राणी न्यायकाळी या पिढीबरोबर उठेल आणि त्यांना दंडपात्र ठरवेल, कारण ती शलोमोनाचे ज्ञान ऐकण्यास पृथ्वीच्या टोकाकडून आली; आणि पाहा, आता तर शलोमोनापेक्षा थोर असा कोणी येथे आहे.

  23. “रानातील फुले कशी वाढतात याचा विचार करा. ती कष्ट करीत नाहीत किंवा कातीत नाहीत. तरी मी तुम्हाला सांगतो की शलोमोनदेखील आपल्या सर्व वैभवात त्यांच्याइतका नटला नव्हता.

  24. जेव्हा परमेश्वराने इतर राष्ट्रांना त्यांच्या समोरून हाकलून दिले तेव्हा त्यांनी त्यांची जमीन ताब्यात घेतली आणि आपल्या पूर्वजांनी यहोशुआच्या नेतृत्वाखाली जो निवासमंडप त्यांच्याबरोबर आणला तो त्या जमिनीवर दावीद राजाच्या काळापर्यंत तिथेच राहिला.

  25. दावीदाने परमेश्वराची कृपादृष्टी अनुभवली आणि त्याने याकोबाच्या परमेश्वरासाठी निवासस्थान बांधता येईल का अशी विचारपूस केली.