Skip to content

Pride बद्दल बायबलमधील वचने

303 वचने · 61 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जेव्हा हामानाने पाहिले की मर्दखया गुडघे टेकवित नाही व मुजराही करीत नाही, तेव्हा त्याला अतिशय संताप आला.

  2. जसे रानगाढवाचे शिंगरू मनुष्याचा जन्म घेऊ शकत नाही तसेच अक्कलशून्य मनुष्य शहाणा होणार नाही.

  3. “खचितच तुम्हीच ते विशिष्ट लोक आहात, आणि ज्ञान तुमच्याबरोबरच नाहीसे होईल!

  4. परंतु मलाही तुमच्यासारखी बुद्धी आहे; मी तुमच्यापेक्षा कमी दर्जाचा नाही. या सर्वगोष्टी कोणाला ठाऊक नाहीत?

  5. जे तुम्हाला माहीत आहे, ते मलाही माहीत आहे; मी तुमच्यापेक्षा कमी दर्जाचा नाही.

  6. तुम्ही गप्प राहाल तर किती बरे होईल! कारण त्यातच तुमचे शहाणपण आहे.

  7. मग एलीफाज तेमानीने उत्तर देऊन म्हटले:

  8. “सुज्ञ मनुष्य पोकळ मताने उत्तर देईल का किंवा पूर्वेकडील गरम वार्‍याने आपले पोट भरणार काय?

  9. कुचकामी शब्दांनी, आणि व्यर्थ भाषणाने ते वाद घालतील काय?

  10. परंतु तू तर धार्मिकता देखील कमी लेखतोस आणि परमेश्वराच्या भक्तीत अडखळण आणतो.

  11. तुझी पापे तुझ्या मुखाला संकेत देतात; धूर्तांची जीभ तू अंगीकारतो.

  12. माझे नव्हे, तर तुझे स्वतःचे मुख तुला दोषी ठरविते; तुझे स्वतःचे ओठ तुझ्याविरुद्ध साक्ष देते.

  13. “सर्व मानवजातीमध्ये तू प्रथम जन्मलेला आहेस का? पर्वत निर्माण होण्यापूर्वी तू अस्तित्वात आला का?

  14. परमेश्वराची मसलत तू ऐकतोस काय? शहाणपणाचा ठेका तुझ्याकडे आहे का?

  15. आम्हाला माहीत नाही, अशी तुला काय माहिती आहे? आम्हाला आहे, त्याहून अधिक कोणते ज्ञान तुला आहे?

  16. केस पांढरे झालेले आणि वयोवृद्ध पुरुष आमच्यामध्ये आहेत; जे तुझ्या वडिलांपेक्षाही अधिक वयाचे आहेत.

  17. परमेश्वराचे सांत्वन आणि सौम्यतेचे शब्द तुझ्यासाठी पुरेसे नाहीत का?

  18. तुझ्या मनाने तुला का वाहवत नेले आहे, तुझे डोळे असे का चमकतात,

  19. यासाठी की आपला क्रोध तू परमेश्वरावर दाखवावा आणि तुझ्या मुखातून असे शब्द ओतावे?

  20. आम्हाला जनावरांप्रमाणे का समजतोस तुझ्या नजरेत आम्ही मूर्ख आहोत का?

  21. रागाने जो तू स्वतःला फाडतोस, त्या तुझ्यामुळे पृथ्वी ओसाड पडावी काय? किंवा खडक आपल्या ठिकाणातून कोसळू द्यावे काय?

  22. उघडपणे त्यांना कोण दोष लावणार? त्यांनी जे केले आहे, त्याचे प्रतिफळ त्यांना कोण देणार?

  23. त्यांना कबरेकडे वाहून नेले जाते, आणि त्यांच्या धोंड्यावर पहारा ठेवतात.

  24. जे वयाने मोठे तेच ज्ञानी आहेत असे नसते, जे योग्य ते केवळ वृद्धांनाच समजते असेही नाही.

  25. “म्हणून मी सांगतो ते लक्षपूर्वक ऐका; मी सुद्धा मला जे माहीत आहे ते सांगतो.