Skip to content

Pride बद्दल बायबलमधील वचने

303 वचने · 61 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. म्हणून तुम्हाला माझा असा सल्ला आहे की श्रीमंत होण्यासाठी तुम्ही माझ्याकडून अग्नीत शुद्ध केलेले सोने विकत घ्यावे. तुमची लज्जास्पद नग्नता झाकण्यात यावी म्हणून तुम्ही माझ्याकडून स्वच्छ, शुद्ध, शुभ्र वस्त्रे विकत घ्यावी. तुम्हाला दृष्टीलाभ व्हावा म्हणून तुम्ही माझ्याकडून अंजन विकत घ्यावे.

  2. तिने आपले सगळे आयुष्य विलासात आणि ऐषआरामात घालविले आहे, आता त्याच मानाने तिला यातना आणि दुःख द्या. ती आपल्या अंतःकरणात बढाया मारून म्हणते, “मी महाराणी होऊन माझ्या सिंहासनावर बसलेली आहे. मी काही विधवा नाही. मला कधीच दुःखाचा अनुभव येणार नाही.”

  3. म्हणूनच तिला मरण, शोक व दुष्काळ या सर्वांच्या पीडा एकाच दिवशी भोगाव्या लागतील. अग्नीने तिला जाळून टाकण्यात येईल. सर्वसमर्थ प्रभू परमेश्वर तिचा न्यायनिवाडा करणार आहेत.