Skip to content

Pride बद्दल बायबलमधील वचने

303 वचने · 61 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तुमच्या आज्ञांपासून पथभ्रष्ट झालेल्या शापित आणि गर्विष्ठ लोकांना तुम्ही धमकाविता.

  2. गर्विष्ठ लोकांनी माझ्याविरुद्ध कुभांडे रचली आहेत, परंतु तुमचे नियम मी संपूर्ण अंतःकरणाने पाळतो.

  3. त्यांची अंतःकरणे कठोर व संवेदनाहीन झाली आहेत, परंतु तुमच्या नियमशास्त्राने मी सुखावतो.

  4. गर्विष्ठ लोकांची अप्रतिष्ठा होवो, विनाकारण त्यांनी मजवर अन्याय केला आहे, परंतु मी तुमच्या नियमांचे मनन करेन.

  5. प्रवाशांचे आराधना गीत. दावीदाची रचना. हे याहवेह, माझे हृदय गर्विष्ठ नाही, माझी नजर उन्मत्त नाही; मला समजत नाही अशा महान आणि अद्भुत गोष्टींपासून मी स्वतःला दूर ठेवतो.

  6. याहवेह महान असले तरी ते दीनांची दयेने काळजी घेतात; गर्विष्ठ लोकांना मात्र ते दुरूनच ओळखतात.

  7. उपहास करणार्‍या गर्विष्ठांचा ते उपहास करतात, परंतु जे नम्र आणि पीडित आहेत त्यांच्यावर ते कृपा करतात.

  8. याहवेह सहा गोष्टींचा द्वेष करतात, त्यांना सात गोष्टींचा तिटकारा वाटतो:

  9. गर्विष्ठ नजर, खोटे बोलणारी जीभ, हात, जे निष्पाप व्यक्तीचा रक्तपात करतात,

  10. मी, सुज्ञान, सुज्ञतेबरोबर सहवास करते; ज्ञान आणि विवेक माझ्याकडे आहेत.

  11. याहवेहचे भय धरणे म्हणजे वाईटाचा द्वेष करणे होय. गर्विष्ठपणा आणि उद्धटपणा, वाईट आचरण आणि विकृत भाषण यांचा मी तिरस्कार करते.

  12. जो शिस्तीचे पालन करतो तो जीवनाचा मार्ग दाखवितो परंतु जो सुधारणा नाकारतो, तो दुसर्‍यांची दिशाभूल करतो.

  13. जेव्हा गर्विष्ठपणा येतो, तेव्हा अप्रतिष्ठा येते, परंतु विनम्रपणामुळे सुज्ञता प्राप्त होते.

  14. विवेकहीन मनुष्य आपल्या शेजार्‍याची निंदा करतो; परंतु सुज्ञ मनुष्य आपल्या जिभेला लगाम घालतो.

  15. स्वतःला प्रतिष्ठित दर्शवून अन्नाचा अभाव असण्यापेक्षा सर्वसामान्य असून जवळ चाकर बाळगणारा असणे बरे.

  16. मूर्खाच्या दृष्टीने त्याचाच मार्ग योग्य असतो; परंतु जो शहाणा असतो, तो सल्ला ऐकतो.

  17. जिथे भांडण आहे, तिथे गर्व उपस्थित आहे, परंतु जे सल्ला स्वीकारतात त्यांच्यामध्ये सुज्ञता दिसून येते.

  18. शेजार्‍यांचा द्वेष करणे पाप आहे; परंतु जे गरजवंतावर दया करतात ते धन्य!

  19. मूर्ख पुत्र आपल्या आईवडिलांचा सल्ला तुच्छ मानतो, पण जो सुधारणा अंमलात आणतो, तो सुज्ञपणा दाखवितो.

  20. जे सत्याचा मार्ग सोडतात, कठोर शिक्षा त्यांची वाट पाहते; आणि जे सुधारणेचा तिरस्कार करतील ते मृत्युमुखी पडतील.

  21. उपहास करणार्‍यांना सुधारणेचा राग येतो, म्हणून ते ज्ञानी लोकांस टाळतात.

  22. गर्विष्ठांच्या घराचा याहवेह नाश करतात, परंतु ते विधवांची दगडी सीमा सुरक्षित ठेवतात.

  23. जे शिस्तीकडे दुर्लक्ष करतात ते स्वतःचा तिरस्कार करतात, परंतु जो सुधारणेकडे लक्ष लावतो तो समंजसपणा प्राप्त करतो.

  24. याहवेह गर्विष्ठ अंतःकरण असलेल्यांचा सर्वांचा तिरस्कार करतात. याची खात्री असू द्या: त्यांना शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही.

  25. नाशापूर्वी गर्व आणि अधःपातापूर्वी मग्रूरी येते.