Skip to content

Pride बद्दल बायबलमधील वचने

303 वचने · 61 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. गर्विष्ठांबरोबर राहून लूट वाटून घेण्यापेक्षा दीनांबरोबर नम्रचित्त असणे बरे.

  2. जो कोणी कलहप्रिय असतो तो पापाची आवड धरतो; जो कोणी उंच प्रवेशद्वार बांधतो तो आपत्तींना आमंत्रण देतो.

  3. धनवानाचे धन त्यांचे तटबंदीचे नगर आहे; ते कल्पना करतात की त्या उंच भिंती चढण्यास दुष्कर आहेत.

  4. मनुष्याचा नाश होण्याआधी त्याचे हृदय गर्वाने भरते, परंतु सन्मान मिळण्याआधी मनुष्यास नम्रता येते.

  5. पुष्कळजण अतूट प्रेम असल्याचा दावा करतात, परंतु प्रामाणिक मनुष्य कोणाला सापडेल?

  6. गर्विष्ठ दृष्टी आणि अभिमानी अंतःकरण— दुष्टांचे नांगर न चालविलेले शेत—पाप उत्पन्न करतात.

  7. गर्विष्ठ, उद्धट ज्याचे नाव “टवाळखोर” आहे, तो तीव्र संतापाने वागतो.

  8. कधीही न दिलेल्या देणगीबद्दल जो घमेंड करतो, तो वृष्टिहीन मेघ आणि वारा यासारखा आहे.

  9. जसे अति मध खाणे हानिकारक आहे आणि अति खोल गोष्टींचा शोध घेणे सन्माननीय नसते.

  10. मूर्खाला त्याच्या मूर्खतेला योग्य असे उत्तर द्या, नाहीतर तो स्वतःला शहाणा समजू लागेल.

  11. आपल्याच दृष्टीत स्वतःला शहाणा समजणारा मनुष्य तुम्ही पाहिला आहे काय? अशा माणसापेक्षा मूर्खाला अधिक आशा आहे.

  12. स्वदृष्टीत शहाणा असणार्‍या आळशास वाटते कि तो यथायोग्य उत्तर देणाऱ्या सात लोकांपेक्षाही जास्त शहाणा आहे.

  13. दुसरा कोणीतरी तुमची स्तुती करो, तुमच्या स्वतःच्या मुखाने नको; बाहेरील व्यक्तीला ती करू द्या, पण तुम्ही स्वतःच्या ओठांनी करू नये.

  14. श्रीमंत माणसे त्यांच्या दृष्टीने स्वतःला शहाणे समजतात; परंतु जो गरीब आणि विवेकी आहे तो पाहतो की श्रीमंत कसे भ्रमात पडलेले आहेत.

  15. लोभी मनुष्य भांडणे लावतो, परंतु जे याहवेहवर भरवसा ठेवतात त्यांची भरभराट होईल.

  16. टवाळी करणारे शहरात गोंधळ करतात, परंतु सुज्ञ लोक राग घालवून टाकतात.

  17. अहंकार व्यक्तीच्या अधःपतनाचे कारण ठरतो; परंतु जो आत्म्याने नम्र आहे, त्याला सन्मान मिळतो.

  18. जे लोक आपल्या दृष्टीने स्वतःला शुद्ध समजतात, तरीपण त्यांची मलिनता त्यांनी स्वच्छ केलेली नसते;

  19. काही लोकांचे डोळे नेहमीच मग्रुरीत असतात, ज्यांच्या नजरा तिरस्काराने भरलेल्या असतात;

  20. उन्मताची नजर नमविली जाईल, आणि मनुष्याचा गर्व उतरविला जाईल; त्या दिवशी याहवेह एकटेच गौरविले जातील.

  21. गर्विष्ठ आणि उद्धट लोकांना, जे सर्वकाही उच्च करण्यात आले आहे त्यांना नम्र करण्यासाठी, सर्वसमर्थ याहवेहने एक दिवस निर्धारित केला आहे—

  22. लबानोनाचे सर्व उंच व भव्य गंधसरू आणि बाशान येथील एलावृक्ष,

  23. उंच उंच पर्वत आणि सर्व उंच डोंगर,

  24. प्रत्येक भव्य बुरूज, प्रत्येक तटबंदीची भिंत,

  25. तार्शीशमधील प्रत्येक व्यापारी गलबत आणि बंदरातील डौलदार जहाजे, त्या दिवशी सर्व नष्ट होतील.