Skip to content

Pride बद्दल बायबलमधील वचने

303 वचने · 61 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मनुष्याचा सर्व अहंकार नमविला जाईल आणि मनुष्याचा गर्व खाली करण्यात येईल; त्या दिवशी याहवेह एकटेच गौरविले जातील.

  2. याहवेह म्हणतात, “सीयोनातील स्त्रिया गर्विष्ठ आहेत, त्या मान उडवीत चालतात, चंचल नेत्रकटाक्षांनी मन वेधतात, पायातल्या पैजणांचा छुमछुम आवाज करीत, कंबर मटकत छोटी छोटी पावले टाकून चालतात.

  3. म्हणून प्रभू सीयोनी स्त्रियांच्या डोक्यांना खवडे आणणार; याहवेह त्यांचे टाळू टकले करणार.”

  4. त्या दिवशी त्यांची सर्व आभूषणे प्रभू ओरबाडून काढतील: त्यांच्या बांगड्या, ललाटपट्टी, व चंद्रकोर हार,

  5. त्यांचे कानातील झुमके, कांकण आणि मुखावरण,

  6. त्यांची शिरोवेष्टणे, त्यांचे पैंजण आणि कमरपट्टे, अत्तरदाण्या आणि ताईत,

  7. अंगठ्या आणि नथण्या,

  8. उत्तम पोशाख, अधोवस्त्रे, अंगरखे, आणि बटवे,

  9. त्यांचे आरसे, त्यांची मलमलची वस्त्रे, मुकुट व शाली.

  10. सुगंधाऐवजी त्यांच्याकडे दुर्गंध येईल; कमरपट्ट्याऐवजी एक दोरी असेल; नीट केशरचनेऐवजी टक्कल; उत्तम पोशाखाऐवजी गोणपाट; आणि सौंदर्याऐवजी व्रण त्यांच्या वाट्याला येतील.

  11. तुमचे पुरुष तलवारीने पडतील, तुमचे योद्धे युद्धभूमीवर ढासाळतील,

  12. सीयोनच्या वेशी आक्रोश करतील आणि विलाप करतील; ती निराधार होऊन जमिनीवर बसलेली असेल.

  13. तुम्ही जे एका घरानंतर दुसरे घर बांधता, आणि जोपर्यंत जागा संपत नाही शेताला शेत जोडून घेतात, आणि मग त्या भूमीवर तुम्ही एकटेच राहता, त्यांना धिक्कार असो.

  14. म्हणून लोकांची अधोगती होईल आणि प्रत्येकजण नम्र केला जाईल, गर्विष्ठांची नजर लीन केली जाईल.

  15. सर्व लोकांना ते माहीत होईल— एफ्राईम आणि शोमरोन येथील नागरिक— जे अभिमानाने आणि अंतःकरणाच्या उद्धटपणाने असे म्हणतात,

  16. “विटा खाली पडल्या आहेत, परंतु आम्ही ते घडविलेल्या दगडाने पुन्हा बांधू; उंबराची झाडे कापली गेली आहेत, परंतु आम्ही त्यांच्या जागी देवदारू लावू.”

  17. “अश्शूरचा धिक्कार असो, जो माझ्या क्रोधाची काठी आहे, ज्याच्या हातामध्ये माझ्या क्रोधाचा सोटा आहे!

  18. मी त्याला अधार्मिक राष्ट्राविरुद्ध पाठवितो, मला जे संताप आणतात, अशा लोकांविरुद्ध पाठवितो, त्यांची लूटमार करण्यासाठी आणि लूट हिसकावून घेण्यासाठी, आणि त्यांना रस्त्यांवरील चिखलाप्रमाणे तुडविण्यासाठी.

  19. परंतु हा त्याचा उद्देश नाही, त्याच्या मनात हे नाही; त्याचा उद्देश आहे की नाश करावा, अनेक राष्ट्रांचा नाश करून त्यांचा अंत करावा.

  20. ‘माझे सेनापती सर्व राजे नाहीत काय?’ असे ते म्हणतात.

  21. ‘कालनो कर्कमीश सारखे नाही काय? हमाथ अर्पादसारखा आणि शोमरोन दिमिष्कसारखा नाही काय?

  22. जशी माझ्या हाताने मूर्तींपूजक राज्ये ताब्यात घेतली, अशी राज्ये ज्यांच्या प्रतिमा यरुशलेम आणि शोमरोनपेक्षा श्रेष्ठ होत्या—

  23. शोमरोन आणि तिच्या मूर्तींबरोबर मी जसा व्यवहार केला तसा व्यवहार मी यरुशलेम आणि तिच्या मूर्तींबरोबर करू नये काय?’ ”

  24. जेव्हा प्रभूने सीयोन पर्वत आणि यरुशलेमविरुद्ध त्यांचे सर्व कार्य पूर्ण केले, तेव्हा ते म्हणतील, “मी अश्शूरच्या राजाला त्याच्या अंतःकरणाच्या हेतुपुरस्सर अभिमानाबद्दल आणि त्याच्या नजरेतील गर्विष्ठपणाबद्दल शिक्षा करेन.

  25. कारण ते म्हणतात: “ ‘माझ्या हाताच्या शक्तीने मी हे केले आहे, आणि माझ्या शहाणपणाने हे केले आहे, कारण माझ्याकडे समंजसपणा आहे. मी राष्ट्रांच्या सीमा काढून टाकल्या, मी त्यांचे खजिने लुटले; एका बलवानाप्रमाणे मी त्यांच्या राजांना वश केले.