Skip to content

Pride बद्दल बायबलमधील वचने

303 वचने · 61 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जो प्रौढी मिरवतो त्याने याविषयी प्रौढी मिरवावी मी याहवेह, जो कृपा करणारा पृथ्वीवर न्याय आणि नीती करणारा आहे, असे त्यांनी मला खरोखर समजावे, ह्यात मला संतोष आहे, असे याहवेहने म्हणतात.”

  2. “याहवेह असे म्हणतात: अशाच प्रकारे मी यहूदीयाचा गर्व व यरुशलेमचा महागर्व नष्ट करणार आहे.

  3. ऐका व लक्ष द्या, उर्मट होऊ नका, कारण असे याहवेहने म्हटले आहे.

  4. जर तुम्ही माझे ऐकले नाही, तर मी एकांतात अश्रू ढाळेन तुमच्या गर्विष्ठपणामुळे; माझे डोळे घोर रुदन करतील, माझ्या अश्रूंचा पूर लोटेल, कारण याहवेहच्या कळपाला बंदिवान करून नेण्यात येईल.

  5. होशयाहचा पुत्र अजर्‍याह, कारेहचा पुत्र योहानान व इतर सर्व गर्विष्ठ माणसे यिर्मयाहला म्हणाली: “तू खोटे बोलतोस! ‘तुम्ही इजिप्तला जाऊन तिथे वसती करू नये,’ असे आम्हाला सांगण्यास तुला आमचे परमेश्वर याहवेहने पाठविले नाही.

  6. कारण तुम्ही आपल्या कार्यावर व धनसंपत्तीवर भरवसा ठेवला होता, तुम्हालादेखील बंदिवान म्हणून नेण्यात येईल. तुमचे दैवत कमोश बंदिवासात जाईल, त्याचे याजक आणि सरदार हे सर्वजण नेले जातील.

  7. “ ‘आम्ही वीरपुरुष, पराक्रमी योद्धे आहोत!’ असे तुम्ही कसे बोलू शकता?

  8. परंतु आता मोआबचा सर्वनाश होणार आहे, तिची नगरे हस्तगत केली जाणार आहेत; तिच्या अत्यंत उमद्या तरुणांची कत्तल होईल,” असे राजाधिराज, ज्यांचे नाव सर्वसमर्थ याहवेह आहे ते म्हणतात.

  9. “आम्ही मोआबच्या गर्वाविषयी ऐकले आहे— तिचा गर्व किती मोठा आहे— तिचा उर्मटपणा, तिचा उन्मत्तपणा, तिचा अहंभाव आणि तिच्या अंतःकरणाची मग्रुरीही सर्व आम्हाला माहीत आहे.

  10. तुझ्या खोर्‍यांचा तू गर्व का करतेस, सुपीक खोर्‍यांची तू बढाई का मारते? हे अमोन्यांच्या अविश्वासू कुमारिके, तुझ्या संपत्तीवर भरवसा करून तू म्हणतेस, माझ्यावर कोण हल्ला करू शकतो?

  11. तुम्ही दहशतीस दिलेले प्रोत्साहन आणि तुमच्या अंतःकरणाच्या गर्विष्ठपणाने तुमची फसवणूक केली आहे, तुम्ही जे खडकांच्या कपारीत राहता, तुम्ही ज्यांनी डोंगरावरील उच्च स्थाने व्यापली आहेत. जरी तुम्ही तुमची घरटी गरुडांच्या घरट्यांप्रमाणे उंच बांधली आहेत, तरी तिथून मी तुला खाली आणेन. असे याहवेह जाहीर करतात.

  12. “धनुर्धाऱ्यांना बाबेलविरुद्ध पाचारण करा, धनुष्य ताणणाऱ्या सर्वांना बोलवा. नगरीला वेढा घाला; कोणालाही निसटून जाऊ देऊ नका. तिच्या कृत्याची परतफेड करा; तिने इतरांचे जसे केले, तसे तिचे करा. तिने याहवेहला, इस्राएलाच्या पवित्र परमेश्वराला उद्दामपणे तुच्छ लेखले,

  13. “पाहा, अहो गर्विष्ठ लोकांनो, मीच तुमच्याविरुद्ध आहे आता तुमचा दिवस आला आहे, तुम्हाला शिक्षा देण्याचा समय आला आहे! प्रभू सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात.

  14. गर्विष्ठ अडखळतील व पडतील, तिला मदतीचा हात देऊन कोणीही उठविणार नाही; मी तिच्या नगरांमध्ये अग्नी पेटवेन तो अग्नी सभोवतालचे सर्वकाही गिळंकृत करेल.”

  15. तुझ्या गर्वाच्या दिवसात जेव्हा तुझी दुष्टता प्रगट झाली नव्हती, तेव्हा तू तर तुझी बहीण सदोमचे नाव देखील घेत नसे. त्याचप्रमाणे, आता, अरामाच्या कन्या व त्यांचे सर्व शेजारी आणि पलिष्ट्यांच्या कन्या यांनी तुझी अप्रतिष्ठा केली—तुझ्या सभोवती असलेल्या सर्वांनी तुला तुच्छ मानले.

  16. “मानवपुत्रा, सोरच्या अधिपतीला सांग: सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘आपल्या अंतःकरणातील गर्वाने तू म्हणालास, “मी देव आहे; देवाच्या आसनावर समुद्राच्या हृदयात मी बसतो.” तुला वाटते की तू देवासारखा सुज्ञ आहे, परंतु तू मानव आहेस आणि देव नाही.

  17. तू दानीएलापेक्षा सुज्ञ आहेस काय? तुझ्यापासून काही गुपित नाही काय?

  18. तुझी सुज्ञता व समज याद्वारे तू आपल्यासाठी संपत्ती मिळविली आणि आपल्या खजिन्यात सोने आणि चांदीचा साठा केलास.

  19. व्यापारातील तुझ्या महान कुशलतेने तू आपले धन वाढविलेस, आणि तुझ्या संपत्तीमुळे तुझे हृदय गर्विष्ठ झाले आहे.

  20. “ ‘यास्तव सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘कारण तू स्वतःला ज्ञानी, अगदी देवासारखे ज्ञानी समजतोस,

  21. म्हणून मी परकीय लोकांना तुझ्याविरुद्ध आणेन, जे राष्ट्रांमध्ये सर्वात क्रूर आहेत; तुझे सौंदर्य व ज्ञान याविरुद्ध ते त्यांची तलवार उपसतील आणि ती तुझ्या चमकत्या वैभवाला भेदून जाईल.

  22. ते तुला खाली गर्तेत आणतील, आणि तिथे समुद्राच्या मधोमध तुझा भयानक मृत्यू होईल.

  23. तेव्हा जे लोक तुला मारतात त्यांच्यादेखत तू म्हणशील काय, “मी देव आहे?” जे तुझा वध करतात त्यांच्या हातात, तू केवळ मानव असशील, देव नाही.

  24. तुझे हृदय तुझ्या सौंदर्यामुळे अहंकारी झाले, आणि तुझ्या वैभवामुळे तू तुझ्या ज्ञानाला भ्रष्ट केले. म्हणून मी तुला भूमीवर टाकून दिले; आणि राजांसमोर मी तुला तमाशा असे केले.

  25. “ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘इजिप्तचे मित्रगण पडतील तिचे अहंकारी बळ सुद्धा पडेल. मिग्दोलपासून असवानपर्यंत सर्व तिच्यामध्ये तलवारीने पडतील, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.