Skip to content

Kings बद्दल बायबलमधील वचने

580 वचने · 175 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. अशाप्रकारे राजाने लोकांचे म्हणणे मानले नाही, कारण शिलोनी संदेष्टा अहीयाहच्याद्वारे याहवेहने नेबाटाचा पुत्र यरोबोअमला सांगितलेल्या वचनांची पूर्तता व्हावी म्हणून या घटना याहवेहकडून घडून आल्या होत्या.

  2. राजाने आपले म्हणणे ऐकले नाही असे जेव्हा इस्राएलच्या सर्व लोकांनी पाहिले, तेव्हा त्यांनी राजाला उत्तर दिले: “आम्हाला दावीदामध्ये, इशायच्या मुलाशी आमचा काय वाटा, इस्राएला, तुझ्या डेर्‍यांपाशी जाऊन! दावीदा, आपल्या स्वतःचे घर सांभाळ!” असे म्हणत इस्राएलचे लोक परत घरी गेले.

  3. परंतु तरीही जे इस्राएली लोक यहूदीयाच्या नगरांमध्ये राहत होते त्यांच्यावर रेहोबोअमने राज्य केले.

  4. अदोनिराम जो मजुरी कामकर्‍यांचा प्रमुख होता त्याला रेहोबोअम राजाने पाठवले, परंतु सर्व इस्राएलने त्याला धोंडमार करून मारून टाकले. तरीही, रेहोबोअम राजा आपल्या रथात बसून यरुशलेमास निसटून गेला.

  5. याप्रकारे इस्राएली लोकांनी दावीदाच्या घराण्याविरुद्ध बंड केले ते आजवर चालू आहे.

  6. यरोबोअम इजिप्त देशातून परत आला आहे हे सर्व इस्राएल लोकांनी ऐकले, तेव्हा त्यांनी त्याला आपल्या मंडळीत बोलावून घेतले व त्याला सर्व इस्राएलवर राजा केले. केवळ यहूदाहचे गोत्र दावीदाच्या घराण्याशी विश्वासू राहिले.

  7. जेव्हा रेहोबोअम यरुशलेमास आला, तेव्हा त्याने यहूदाह व बिन्यामीनच्या गोत्रातील सर्व लोकांना जमा केले; इस्राएलशी युद्ध करून शलोमोनचा पुत्र रेहोबोअमसाठी राज्य पुन्हा मिळवून देतील असे एक लाख ऐंशी हजार सक्षम तरुण पुरुष होते.

  8. परंतु परमेश्वराचा मनुष्य शमायाह याच्याकडे परमेश्वराचे वचन आले:

  9. “शलोमोनचा पुत्र यहूदीयाचा राजा रेहोबोअम, यहूदाह आणि बिन्यामीन व बाकीच्या लोकांना सांग,

  10. ‘याहवेह असे म्हणतात: इस्राएल जे तुमचे बांधव आहेत त्यांच्याविरुद्ध लढाईस जाऊ नका. तुम्ही प्रत्येकजण आपआपल्या घरी जा, कारण हे माझ्यापासून आहे.’ ” म्हणून त्यांनी याहवेहचा शब्द मानला आणि याहवेहने दिलेल्या आदेशाप्रमाणे आपआपल्या घरी परत गेले.

  11. त्यावेळी शलोमोनचा पुत्र रेहोबोअम हा यहूदीयाचा राजा होता. तो राजा झाला त्यावेळी तो एकेचाळीस वर्षांचा होता आणि आपले नाव द्यावे म्हणून याहवेहने सर्व इस्राएलच्या गोत्रांतून ज्या शहराची निवड केली त्या यरुशलेमात त्याने राज्य केले. त्याच्या आईचे नाव नामाह होते; ती अम्मोनी होती.

  12. याहवेहच्या दृष्टीत जे वाईट ते यहूदीयाच्या लोकांनी केले. आणि जी पापे त्यांनी केली त्यामुळे त्यांच्या पूर्वी होऊन गेलेल्या लोकांपेक्षा त्यांनी याहवेहला अधिक क्रोधित केले.

  13. प्रत्येक पसरलेल्या झाडाखाली त्यांनी त्यांच्यासाठी पूजास्थाने, पवित्र धोंडे व अशेराची खांब बनविली.

  14. त्यावेळी देशात मंदिरामध्ये पुरुषगामीही होती; जे सर्व याहवेहने इस्राएलातून काढून टाकले होते, त्या सर्वप्रकारच्या अमंगळ कृत्यांमध्ये लोक भाग घेत होते.

  15. रेहोबोअम राजाच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षी, इजिप्तचा राजा शिशाकने यरुशलेमवर हल्ला केला.

  16. त्याने याहवेहच्या मंदिरातील भांडारे व राजवाड्यातील भांडारे लुटून नेली. शलोमोनने बनविलेल्या सोन्याच्या ढालींसहीत त्याने सर्वकाही घेतले.

  17. म्हणून रेहोबोअम राजाने त्या सोन्याच्या ढालींच्या ऐवजी कास्याच्या ढाली तयार केल्या व राजवाड्यातील पहारेकर्‍यांच्या कामगिरीवर असलेल्यांच्या हाती त्या स्वाधीन केल्या.

  18. जेव्हा राजा याहवेहच्या मंदिरात जात असे, तेव्हा पहारेकरी त्या ढाली घेऊन उभे राहत असत आणि नंतर त्या त्यांच्या चौकीत ठेवत असत.

  19. रेहोबोअमच्या कारकिर्दीतील इतर घटना आणि त्याने केलेली कृत्ये यहूदीयाच्या राजांच्या पुस्तकात लिहून ठेवल्या आहेत की नाही?

  20. रेहोबोअम व यरोबोअम यांच्यामध्ये सतत युद्ध होत राहिले.

  21. रेहोबोअम त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला दावीदाच्या शहरात त्याच्या पूर्वजांजवळ पुरण्यात आले. त्याच्या आईचे नाव नामाह होते; ती अम्मोनी होती. त्याचा पुत्र अबीयाह राजा म्हणून त्याचा वारस झाला.

  22. नेबाटाचा पुत्र यरोबोअमच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी अबीयाह यहूदीयाचा राजा झाला,

  23. त्याने यरुशलेमात तीन वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव माकाह होते जी अबशालोमची कन्या होती.

  24. त्याच्या वडिलांनी त्याच्यापूर्वी जी पापे केली होती ती सर्व पापे त्याने केली; त्याचा पूर्वज दावीदाप्रमाणे त्याचे हृदय याहवेह त्याच्या परमेश्वराशी पूर्णपणे समर्पित नव्हते.

  25. तरीपण दावीदाप्रित्यर्थ याहवेह त्याचे परमेश्वर यांनी त्याला त्याचा वारस म्हणून यरुशलेमात त्याला दीप दिला व यरुशलेमास बलवान बनविले.