मुख्य मजकुरावर जा

Kings बद्दल बायबलमधील वचने: Athaliah, mother of Ahaziah (usurper)

6 वचने · 175 पैलू

Athaliah, mother of Ahaziah (usurper) बद्दल वचने

  1. जेव्हा अहज्याहची आई अथल्याहने पाहिले की तिचा पुत्र मरण पावला आहे, तेव्हा ती राजघराण्याचा नाश करण्यास निघाली.

  2. परंतु यहोराम राजाची कन्या आणि अहज्याहची बहीण यहोशेबाने अहज्याहचा पुत्र योआशला घेतले आणि ज्या राजपुत्रांची कत्तल करण्यात येणार होती त्यामधून त्याला चोरले. त्याला आणि त्याच्या दाईला विश्रांतिगृहात अथल्याहपासून लपवून ठेवले; म्हणून त्याचा वध झाला नाही.

  3. अथल्याहने देशावर राज्य केले त्या सहा वर्षापर्यंत तो व त्याच्या दाईस याहवेहच्या मंदिरात लपवून ठेवण्यात आले होते.

  4. जेव्हा अहज्याहची आई अथल्याहने पाहिले की तिचा पुत्र मरण पावला आहे, तेव्हा ती यहूदीयाच्या सर्व राजघराण्याचा नाश करण्यास निघाली.

  5. परंतु यहोशेबा, यहोराम राजाची कन्या हिने अहज्याहचा पुत्र योआश याला घेतले आणि ज्या राजपुत्रांची कत्तल करण्यात येणार होती त्यामधून त्याला चोरले. आणि त्याला आणि त्याच्या दाईला एका विश्रांतिगृहात ठेवले. कारण यहोराम राजाची कन्या आणि याजक यहोयादाची पत्नी, यहोशेबा ही अहज्याहची बहीण होती, म्हणून तिने मुलाला अथल्याहपासून लपवून ठेवले. त्यामुळे ती त्याचा वध करू शकली नाही.

  6. अथल्याहने देशावर राज्य केले त्या सहा वर्षापर्यंत त्याला परमेश्वराच्या मंदिरात लपवून ठेवण्यात आले होते.