मुख्य मजकुरावर जा

Kings बद्दल बायबलमधील वचने: Rendered hereditary in the family of David

8 वचने · 175 पैलू

Rendered hereditary in the family of David बद्दल वचने

  1. जेव्हा तुझे दिवस भरतील आणि तू आपल्या पूर्वजांबरोबर निजशील, तेव्हा मी तुझे संतान म्हणजे तुझ्या पोटचा वंश उभा करून त्याला तुझा उत्तराधिकारी बनवीन, मी त्याचे राज्य प्रस्थापित करेन.

  2. तोच माझ्या नावाकरिता घर बांधेल आणि मी त्याचे राजासन सर्वकाळासाठी स्थापित करेन.

  3. मी त्याचा पिता होईन आणि तो माझा पुत्र होईल. तो जेव्हा चूक करेल, तेव्हा मी त्याला मनुष्याच्या काठीने, मानवांच्या फटक्यांनी शिक्षा करेन.

  4. परंतु तुझ्यासमोरून काढून टाकलेल्या शौलावरची प्रीती मी जशी दूर केली, तशी तुझ्या संतानावरची माझी प्रीती काढून टाकली जाणार नाही.

  5. तुझे घराणे आणि तुझे राज्य माझ्यासमोर सर्वकाळ टिकून राहेल; तुझे राजासन सर्वकाळासाठी स्थापित केले जाईल.’ ”

  6. सर्वकाळासाठी एकदाच दावीदाला माझ्या पवित्रतेची शपथ दिली— मी दावीदाशी खोटे बोलणार नाही—

  7. दावीदाचा वंश सर्वकाळ टिकेल आणि त्याचे सिंहासन माझ्यासमोर सूर्यासमान काळाच्या अंतापर्यंत राहील.

  8. आकाशातील विश्वसनीय साक्षीदार चंद्राप्रमाणे त्याचे सिंहासन युगानुयुग सुस्थिर राहील.” सेला