मुख्य मजकुरावर जा

Kings बद्दल बायबलमधील वचने: Promote the interests of the Church

15 वचने · 175 पैलू

Promote the interests of the Church बद्दल वचने

  1. “पर्शियाचा राजा कोरेश, असे जाहीर करतो की: “ ‘याहवेह, जे स्वर्गाचे परमेश्वर आहेत, त्यांनी पृथ्वीवरील सर्व राज्ये माझ्याकडे दिली आहेत आणि यहूदीयातील यरुशलेमात त्यांचे मंदिर बांधण्यास माझी नियुक्ती केली आहे.

  2. तुमच्यातील जे याहवेहचे लोक आहेत त्यांनी वर यहूदीयातील यरुशलेमास जाऊन याहवेह इस्राएलचे परमेश्वर, परमेश्वर जे यरुशलेमात आहेत त्यांचे मंदिर बांधावे आणि त्यांचे परमेश्वर त्यांच्याबरोबर असोत.

  3. आणि उरलेले जे यहूदी लोक जिथे कुठे असतील त्यांनी यरुशलेमला जाणार्‍या यहूदी लोकांना सोने, चांदी, अन्य वस्तू आणि पशू, तसेच यरुशलेमातील परमेश्वराच्या मंदिरासाठी स्वैच्छिक अर्पणेही पुरवावी.’ ”

  4. म्हणून दारयावेश राजाने आज्ञा दिली की, जिथे कागदपत्रे राखून ठेवली जात त्या बाबेलच्या दप्तरखान्यात कसून शोध केला जावा.

  5. शेवटी त्या चर्मपत्राची गुंडाळी मेदिया प्रांतातील अखमथा नगरातील राजवाड्यात सापडली, त्यात असे लिहिले होते: लेखात म्हटले होते:

  6. कोरेश राजाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी, यरुशलेम येथील परमेश्वराच्या मंदिरासंबंधी एक हुकूमनामा पाठविला गेला होता: तिथे अर्पणे करण्याकरिता ते मंदिर परत बांधले जावे आणि त्याची पायाभरणी करावी. त्याची उंची साठ हात व रुंदी साठ हात असावी.

  7. पायांमध्ये मोठ्या दगडांचे तीन थर असतील व त्यांच्यावर एक लाकडाचा थर असेल. त्याचा सर्व खर्च राजकीय खजिन्यातून दिला जाईल;

  8. आणि जी सोन्याचांदीची पात्रे नबुखद्नेस्सर राजाने परमेश्वराच्या मंदिरातून बाबेलला नेली होती, ती सर्व यरुशलेमला परत नेण्यात येतील व पूर्वीसारखी परमेश्वराच्या मंदिरात ठेवली जातील.

  9. म्हणून फरात नदीच्या पलीकडील प्रदेशाचे राज्यपाल ततनइ, शथर-बोजनइ आणि त्या प्रदेशाच्या इतर अधिकाऱ्यांना सांगण्यात येते की, या स्थानापासून दूर राहा.

  10. परमेश्वराच्या मंदिराच्या बांधकामात अडथळे आणू नका. यहूदीयाचा राज्यपाल आणि इतर यहूदी पुढाऱ्यांनी पूर्वीच्याच जागेवर ते मंदिर बांधावे.

  11. एवढेच नव्हे, तर परमेश्वराच्या मंदिराच्या बांधकामाकरिता यहूद्यांच्या मदतीसाठी हे करण्याची मी तुम्हाला आज्ञा देतो: मंदिर बांधण्यास येणारा सर्व खर्च फरात नदीच्या पलीकडील प्रदेशाच्या राजकीय खजिन्यातून त्यांच्या मागणीनुसार देण्यात यावा, जेणेकरून कामास विलंब होणार नाही.

  12. स्वर्गातील परमेश्वराला होमार्पणे करण्यासाठी गोर्‍हे, मेंढरे व कोकरे द्यावीत, आणखी त्यांना गहू, द्राक्षारस, मीठ आणि जैतुनाचे तेल हे पदार्थ यरुशलेमातील याजकांच्या मागणीनुसार प्रत्येक दिवशी न चुकता द्यावेत.

  13. मग ते त्यांच्या स्वर्गातील परमेश्वराला मान्य होतील अशी अर्पणे देऊ शकतील आणि राजा व त्याच्या पुत्रांच्या कल्याणासाठी प्रार्थना करू शकतील.

  14. कोणी या संदेशातील मजकूर कोणत्याही प्रकारे बदलण्याचा प्रयत्न करेल, तर त्याच्या घराच्या तुळया उपसून काढल्या जातील व त्या तुळयांवर त्याला फाशी देण्यात येईल आणि त्याच्या घराचा उकिरडा केला जाईल.

  15. ज्या परमेश्वराने त्यांच्या नावाचे वसतिस्थान व्हावे यासाठी यरुशलेम नगरी निवडली आहे, ते हा हुकूम बदलणार्‍या व मंदिराचा नाश करणार्‍या कोणत्याही राजाचा आणि लोकांचा सर्वनाश करतील. मी, दारयावेशने हे फर्मान काढले आहे व त्याची अंमलबजावणी तत्परतेने व्हावी.