Kings बद्दल बायबलमधील वचने: Pekah
Pekah बद्दल वचने
यहूदीयाचा राजा अजर्याहच्या बावन्नाव्या वर्षी रमाल्याहचा पुत्र पेकह शोमरोनात इस्राएलावर राज्य करू लागला आणि त्याने वीस वर्ष राज्य केले.
त्याने याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले. नेबाटाचा पुत्र यरोबोअमाने जी पातके इस्राएलास करावयास लावली तो त्या पातकांपासून मागे फिरला नाही.
इस्राएलचा राजा पेकहच्या कारकिर्दीत अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर याने इस्राएलवर स्वारी केली आणि इय्योन, आबेल-बेथ-माकाह, यानोहा, केदेश, हासोर, गिलआद, गालील व नफतालीचा सर्व भाग जिंकला आणि लोकांना कैद करून अश्शूरास नेले.
नंतर एलाहचा पुत्र होशेने रमाल्याहचा पुत्र पेकहाच्या विरुद्ध कट रचला. त्याने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला ठार केले व त्याच्या ठिकाणी राज्य करू लागला. ही घटना उज्जीयाहचा पुत्र योथामाच्या कारकिर्दीच्या विसाव्या वर्षी घडली.
पेकहच्या राजवटीतील इतर घटना आणि त्याने जे सर्व केले ते इस्राएली राजांच्या इतिहासग्रंथात नमूद केलेले नाही काय?