Kings बद्दल बायबलमधील वचने: Zachariah
Zachariah बद्दल वचने
यहूदीयाचा राजा अजर्याहच्या अडतिसाव्या वर्षी यरोबोअमाचा पुत्र जखर्याह शोमरोनात इस्राएलावर राजा झाला आणि त्याने सहा महिने राज्य केले.
आपल्या पूर्वजांप्रमाणेच याहवेहच्या दृष्टीने वाईट ते त्याने केले. नेबाटाचा पुत्र यरोबोअमाने जी पातके इस्राएलास करावयास लावली तो त्या पातकांपासून मागे फिरला नाही.
याबेशाचा पुत्र शल्लूमाने जखर्याहविरुद्ध कट रचला. त्याने लोकांसमोर त्याच्यावर हल्ला करून ठार त्याला केले आणि तो त्याच्या ठिकाणी राज्य करू लागला.
जखर्याहच्या कारकिर्दीतील इतर घटना इस्राएली राजांच्या इतिहासग्रंथात लिहिलेल्या नाहीत काय?
याहवेहने येहूला दिलेले वचन पूर्ण झाले: “चौथ्या पिढीपर्यंत तुझे वंशज इस्राएलच्या राजासनावर बसतील.”