मुख्य मजकुरावर जा

Kings बद्दल बायबलमधील वचने: Rehoboam (latter part of his reign)

15 वचने · 175 पैलू

Rehoboam (latter part of his reign) बद्दल वचने

  1. जेव्हा रेहोबोअम यरुशलेमास आला, तेव्हा त्याने यहूदाह व बिन्यामीनच्या गोत्रातील सर्व लोकांना जमा केले; इस्राएलशी युद्ध करून शलोमोनचा पुत्र रेहोबोअमसाठी राज्य पुन्हा मिळवून देतील असे एक लाख ऐंशी हजार सक्षम तरुण पुरुष होते.

  2. परंतु परमेश्वराचा मनुष्य शमायाह याच्याकडे परमेश्वराचे वचन आले:

  3. “शलोमोनचा पुत्र यहूदीयाचा राजा रेहोबोअम, यहूदाह आणि बिन्यामीन व बाकीच्या लोकांना सांग,

  4. ‘याहवेह असे म्हणतात: इस्राएल जे तुमचे बांधव आहेत त्यांच्याविरुद्ध लढाईस जाऊ नका. तुम्ही प्रत्येकजण आपआपल्या घरी जा, कारण हे माझ्यापासून आहे.’ ” म्हणून त्यांनी याहवेहचा शब्द मानला आणि याहवेहने दिलेल्या आदेशाप्रमाणे आपआपल्या घरी परत गेले.

  5. त्यावेळी शलोमोनचा पुत्र रेहोबोअम हा यहूदीयाचा राजा होता. तो राजा झाला त्यावेळी तो एकेचाळीस वर्षांचा होता आणि आपले नाव द्यावे म्हणून याहवेहने सर्व इस्राएलच्या गोत्रांतून ज्या शहराची निवड केली त्या यरुशलेमात त्याने राज्य केले. त्याच्या आईचे नाव नामाह होते; ती अम्मोनी होती.

  6. याहवेहच्या दृष्टीत जे वाईट ते यहूदीयाच्या लोकांनी केले. आणि जी पापे त्यांनी केली त्यामुळे त्यांच्या पूर्वी होऊन गेलेल्या लोकांपेक्षा त्यांनी याहवेहला अधिक क्रोधित केले.

  7. प्रत्येक पसरलेल्या झाडाखाली त्यांनी त्यांच्यासाठी पूजास्थाने, पवित्र धोंडे व अशेराची खांब बनविली.

  8. त्यावेळी देशात मंदिरामध्ये पुरुषगामीही होती; जे सर्व याहवेहने इस्राएलातून काढून टाकले होते, त्या सर्वप्रकारच्या अमंगळ कृत्यांमध्ये लोक भाग घेत होते.

  9. रेहोबोअम राजाच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षी, इजिप्तचा राजा शिशाकने यरुशलेमवर हल्ला केला.

  10. त्याने याहवेहच्या मंदिरातील भांडारे व राजवाड्यातील भांडारे लुटून नेली. शलोमोनने बनविलेल्या सोन्याच्या ढालींसहीत त्याने सर्वकाही घेतले.

  11. म्हणून रेहोबोअम राजाने त्या सोन्याच्या ढालींच्या ऐवजी कास्याच्या ढाली तयार केल्या व राजवाड्यातील पहारेकर्‍यांच्या कामगिरीवर असलेल्यांच्या हाती त्या स्वाधीन केल्या.

  12. जेव्हा राजा याहवेहच्या मंदिरात जात असे, तेव्हा पहारेकरी त्या ढाली घेऊन उभे राहत असत आणि नंतर त्या त्यांच्या चौकीत ठेवत असत.

  13. रेहोबोअमच्या कारकिर्दीतील इतर घटना आणि त्याने केलेली कृत्ये यहूदीयाच्या राजांच्या पुस्तकात लिहून ठेवल्या आहेत की नाही?

  14. रेहोबोअम व यरोबोअम यांच्यामध्ये सतत युद्ध होत राहिले.

  15. रेहोबोअम त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला दावीदाच्या शहरात त्याच्या पूर्वजांजवळ पुरण्यात आले. त्याच्या आईचे नाव नामाह होते; ती अम्मोनी होती. त्याचा पुत्र अबीयाह राजा म्हणून त्याचा वारस झाला.