Kings बद्दल बायबलमधील वचने: Amon
Amon बद्दल वचने
वयाच्या बावीसाव्या वर्षी आमोन राजा झाला आणि त्याने यरुशलेमात दोन वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव मेशुल्लेमेथ असे होते, ती यटबाह हारूसची कन्या होती.
त्याने आपला पिता मनश्शेहप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते केले.
त्याचा पिता ज्या मार्गात चालला त्याचे त्याने पूर्णतः पालन केले, ज्या मूर्तीची उपासना त्याचा पिता करीत असे, त्याच मूर्तीची त्यानेही उपासना केली आणि त्यांना नमन केले.
त्याने याहवेह आपल्या पूर्वजांच्या परमेश्वराला सोडले आणि त्यांच्या मार्गात चालला नाही.
आमोनच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याविरुद्ध कट रचला आणि राजाची त्याच्या राजवाड्यात हत्या केली.
तेव्हा त्या देशातील लोकांनी आमोन राजाविरुद्ध ज्यांनी कट रचला होता, त्या सर्वांना ठार मारले आणि त्यांनी त्याचा पुत्र योशीयाहला त्याच्या जागेवर राजा केले.
आमोनाच्या कारकिर्दीतील इतर घटना, आणि त्याने जे सर्व केले, हे यहूदीयाच्या राजांचा इतिहासग्रंथात नमूद केलेले नाही काय?
उज्जाच्या बागेत त्याला त्याच्याच कबरेत मूठमाती देण्यात आली. आणि त्याच्या ठिकाणी त्याचा पुत्र योशीयाह राजा झाला.
वयाच्या बावीसाव्या वर्षी आमोन राजा झाला आणि त्याने यरुशलेमात दोन वर्षे राज्य केले.
त्याने आपला पिता मनश्शेह याच्याप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते केले. मनश्शेहने तयार केलेल्या त्या सर्व मूर्तींची आमोनने पूजा केली आणि त्यांना बलिदाने अर्पण केली.
परंतु त्याचे वडील मनश्शेह याच्या उलट, त्याने याहवेहपुढे स्वतःला नम्र केले नाही; आमोनाने त्याचे अपराध वाढविले.
आमोनच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याविरुद्ध कट रचला आणि त्याच्या राजवाड्यात त्याची हत्या केली.
तेव्हा त्या देशातील लोकांनी आमोन राजाविरुद्ध ज्यांनी कट रचला होता, त्या सर्वांना ठार मारले आणि त्यांनी त्याचा पुत्र योशीयाह याला त्याच्या जागेवर राजा केले.