मुख्य मजकुरावर जा

Kings बद्दल बायबलमधील वचने

580 वचने · 175 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तेव्हा जिम्री आत आला व त्याच्यावर वार करून त्याला मारून टाकले आणि त्याचा उत्तराधिकारी म्हणून राजा झाला. यहूदीयाचा राजा आसाच्या सत्ताविसाव्या वर्षी असे झाले.

  2. तो राजा झाला व राजासनावर बसताच, त्याने बाशाच्या संपूर्ण कुटुंबाला मारून टाकले. कोणीही पुरुष, नातेवाईक किंवा मित्र त्याने जिवंत सोडला नाही.

  3. याप्रकारे बाशाविरुद्ध याहवेहचे जे वचन येहू संदेष्ट्याच्या द्वारे सांगितले गेले होते त्यानुसार, जिम्रीने बाशाच्या संपूर्ण घराण्याचा नाश केला;

  4. कारण बाशाने व त्याचा पुत्र एलाहनी जी पापे केली आणि इस्राएली लोकांना देखील ती पापे करावयाला भाग पाडले होते, म्हणून त्यांनी त्यांच्या व्यर्थ मूर्तींमुळे याहवेह इस्राएलच्या परमेश्वराचा क्रोध भडकविला होता.

  5. एलाहच्या कारकिर्दीच्या इतर घटना आणि त्याने जे काही केले, ते इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिल्या नाहीत काय?

  6. यहूदीयाचा राजा आसाच्या कारकिर्दीच्या एकतिसाव्या वर्षी ओमरी इस्राएलवर राज्य करू लागला आणि त्याने बारा वर्षे राज्य केले, त्यापैकी सहा वर्षे तिरजाह येथे राज्य केले.

  7. त्याने शेमेर नावाच्या व्यक्तीकडून शोमरोन डोंगर चांदीचे दोन तालांत देऊन विकत घेतले आणि त्या डोंगरावर नगर बांधले व त्या डोंगराचा आधीचा मालक शेमेर याच्या नावानुसार शोमरोन असे नाव दिले.

  8. पण ओमरीने सुद्धा याहवेहच्या दृष्टीत जे वाईट ते केले आणि त्याच्यापूर्वी होऊन गेलेल्यांपेक्षा अधिक पाप केले.

  9. त्याने पूर्णपणे नेबाटाचा पुत्र यरोबोअमचे अनुसरण केले होते, यरोबोअमने इस्राएली लोकांना जी पापे करावयाला भाग पाडले, ती त्याने केली आणि त्यांनी त्यांच्या व्यर्थ मूर्तींमुळे याहवेह इस्राएलच्या परमेश्वराचा क्रोध भडकविला.

  10. ओमरीच्या कारकिर्दीच्या इतर घटना, त्याने केलेल्या गोष्टी व त्याची यशप्राप्ती इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिल्या आहेत की नाही?

  11. ओमरी आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला शोमरोनात पुरले गेले. आणि त्याचा पुत्र अहाब त्याचा वारस म्हणून राजा झाला.

  12. “खाली जाऊन इस्राएलचा राजा अहाब, जो शोमरोनमध्ये राज्य करतो त्याला भेट, आता तो नाबोथच्या द्राक्षमळ्यात आहे, तो आपल्या ताब्यात घ्यावा म्हणून तो तिथे गेला आहे.

  13. त्याला सांग, ‘याहवेह असे म्हणतात: तू एका मनुष्याचा खून करून त्याची मालमत्ता ताब्यात घेतली नाही काय?’ तेव्हा त्याला सांग, ‘याहवेह असे म्हणतात: ज्या ठिकाणी कुत्र्यांनी नाबोथचे रक्त चाटले, त्याच ठिकाणी कुत्रे तुझे रक्त; होय, तुझेच रक्त चाटतील!’ ”

  14. अहाब एलीयाहला म्हणाला, “हे माझ्या वैर्‍या, शेवटी तू मला शोधलेच!” तो म्हणाला, “मी तुला शोधलेच, कारण याहवेहच्या दृष्टीत जे वाईट ते करण्यास तू स्वतःस विकून टाकले आहेस.

  15. याहवेह म्हणतात, ‘मी तुझ्यावर अरिष्ट आणणार आहे. मी तुझी संतती नष्ट करून टाकीन व इस्राएलात अहाबाच्या कुटुंबातून प्रत्येक शेवटचा पुरुष; तो गुलाम असो किंवा स्वतंत्र असो, तो मी उपटून टाकीन.

  16. मी तुझ्या कुटुंबाचे नेबाटाचा पुत्र यरोबोअम व अहीयाहचा पुत्र बाशा यांच्याप्रमाणे करेन, कारण तू माझा क्रोध भडकविला आहेस आणि इस्राएलास पाप करण्यास भाग पाडले आहे.’

  17. “आणि ईजबेलविषयी याहवेह म्हणतात: ‘येज्रीलच्या भिंतीजवळ ईजबेलला कुत्रे खातील.’

  18. “अहाबाच्या संबंधातील लोक जे शहरात मरतील त्यांना कुत्रे खातील, आणि वेशीच्या बाहेर जे मरतील त्यांना आकाशातील पक्षी खातील.”

  19. इस्राएलचा राजा अहाबाच्या चौथ्या वर्षी आसाचा पुत्र यहोशाफाट यहूदीयाचा राजा झाला.

  20. यहोशाफाट राजा झाला तेव्हा तो पस्तीस वर्षांचा होता आणि त्याने यरुशलेमात पंचवीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव अजुबाह होते, जी शिल्हीची कन्या होती.

  21. त्याने आपला पिता आसाचे सर्व मार्गात अनुसरण केले आणि त्यापासून तो वळला नाही; याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते त्याने केले. तरी त्याने डोंगरावरील उच्चस्थळे नष्ट केली नव्हती आणि लोक तिथे जाऊन यज्ञ करीत व धूप जाळीत असत.

  22. यहोशाफाट व इस्राएलचा राजा यांच्यात शांती होती.

  23. यहोशाफाटच्या राज्याच्या इतर घटना, त्याने हस्तगत केलेल्या गोष्टी, त्याचे लष्करी कार्य या सर्वांचे वर्णन यहूदीयाच्या राजांच्या पुस्तकात केलेले नाही काय?

  24. त्याचा पिता आसाच्या कारकिर्दीच्या नंतरही चालू असलेली मंदिरातील पुरुषगामी यातून त्याने देशाला मुक्त केले.

  25. त्यानंतर एदोमात राजा नव्हता; प्रांताधिकारी तेथील कारभार चालवित होता.