- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Kings बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
यहोरामाने फर्मान दिला, “माझा रथ तयार करा.” मग इस्राएलाचा राजा योराम आणि यहूदीयाचा राजा अहज्याह आपआपल्या रथात बसून येहूला भेटावयास निघाले. ते येहूला येज्रीली नाबोथच्या शेतात भेटले.
जेव्हा यहोरामाने येहूस पाहिले, तेव्हा त्याने विचारले, “येहू, तुम्ही शांतीने आला आहात का?” येहूने उत्तर दिले, “कशी राहील शांती, जेव्हा तुमची आई ईजबेलचे व्यभिचार आणि चेटके एवढे अधिक आहेत तोपर्यंत कशी शांती असेल?”
ते ऐकताच यहोराम मागे फिरला आणि अहज्याहला ओरडून म्हणाला, “अहज्याह, विद्रोह, विद्रोह!”
येहूने आपला धनुष्य सर्व शक्तिनिशी ओढला आणि यहोरामाच्या दोन्ही बाहूंच्यामध्ये मारला. बाण त्याच्या हृदयात शिरला, आणि तो रथातच कोसळून पडला.
तेव्हा येहूने आपला साथीदार बिदकर याला म्हटले, “त्याला उचल आणि येज्रीली नाबोथच्या भूमीत फेकून दे, कारण स्मरण कर की मी आणि तू मिळून त्याचा पिता अहाब याच्यामागून रथामधून चाललो असताना याहवेहने ही भविष्यवाणी त्याच्या विरोधात केली होती:
याहवेह जाहीर करतात, ‘मी काल नाबोथचे रक्त आणि त्याच्या पुत्रांचे रक्त पाहिले आहे आणि याच भूमीवर मी याची परतफेड करेन, असे याहवेह जाहीर करतात. वध केल्याबद्दल मी त्याचा बदला अहाबाला या नाबोथच्याच भूमीवर देईन.’ म्हणून आता याहवेहच्या वचनानुसार, त्याला उचल आणि त्याला त्या भूमीवर फेकून दे.”
काय झाले ते पाहून, जेव्हा यहूदीयाचा राजा अहज्याह बेथ-हागानकडे जाणार्या मार्गाने पळाला. येहू त्याचा पाठलाग करता करता ओरडून म्हणाला, “त्यालाही मारा!” मग त्यांनी त्याला इब्लामजवळच्या गुर येथील चढणीवर रथातच घायाळ केले; तो मगिद्दोपर्यंत पळाला आणि तिथे तो मरण पावला.
त्याच्या सेवकांनी त्याला रथामधूनच यरुशलेमास नेले व दावीदनगरीत त्याच्या पूर्वजांच्या थडग्यात त्याला मूठमाती दिली.
(अहाबाचा पुत्र योरामच्या अकराव्या वर्षी अहज्याह यहूदीयाचा राजा झाला होता.)
जेव्हा अहज्याहची आई अथल्याहने पाहिले की तिचा पुत्र मरण पावला आहे, तेव्हा ती राजघराण्याचा नाश करण्यास निघाली.
परंतु यहोराम राजाची कन्या आणि अहज्याहची बहीण यहोशेबाने अहज्याहचा पुत्र योआशला घेतले आणि ज्या राजपुत्रांची कत्तल करण्यात येणार होती त्यामधून त्याला चोरले. त्याला आणि त्याच्या दाईला विश्रांतिगृहात अथल्याहपासून लपवून ठेवले; म्हणून त्याचा वध झाला नाही.
अथल्याहने देशावर राज्य केले त्या सहा वर्षापर्यंत तो व त्याच्या दाईस याहवेहच्या मंदिरात लपवून ठेवण्यात आले होते.
यहूदीयाचा राजा अहज्याहचा पुत्र योआशच्या कारकिर्दीच्या तेविसाव्या वर्षी येहूचा पुत्र यहोआहाज शोमरोनमध्ये इस्राएलावर राज्य करू लागला आणि त्याने सतरा वर्षे राज्य केले.
पण त्याने याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले. नेबाटाचा पुत्र यरोबोअमने इस्राएलांकडून जी पातके करविली ती त्याने अनुसरली आणि त्यापासून तो मागे फिरला नाही.
त्याच्या पातकांमुळे याहवेहचा क्रोध इस्राएलावर भडकला आणि त्यांनी त्याला अरामचा राजा हजाएल आणि त्याचा पुत्र बेन-हदादच्या अधीनतेमध्ये बराच काळ ठेवले.
तेव्हा यहोआहाजाने याहवेहकडे विनवणी केली आणि याहवेहने त्याचे ऐकले, कारण अरामचा राजा इस्राएलाचा अत्यंत क्रूरपणे छळ करीत होता हे त्यांनी पाहिले.
याहवेहने इस्राएली लोकांना सोडविणारा पाठविला आणि त्यांची अरामी लोकांपासून सुटका झाली. त्यानंतर इस्राएली लोक पूर्वीप्रमाणेच आपआपल्या घरात राहू लागले.
परंतु ते यरोबोअमाच्या घराण्याने इस्राएली लोकांना जी पातके करण्यास लावली होती, त्या पातकांपासून मागे फिरले नाहीत. शोमरोनात अशेरा मूर्तीचे स्तंभ देखील उभे होते.
यहोआहाजाकडे पन्नास घोडेस्वार, दहा रथ आणि दहा हजार पायदळ याशिवाय काही शिल्लक राहिले नाही, कारण अरामी राजाने त्याच्या बाकीच्या सैन्याचा पायांखालील धुळीच्या कणांप्रमाणे संहार केला होता.
यहोआहाजाच्या कारकिर्दीच्या इतर घटना, त्याने जे सर्व केले आणि त्याचे पराक्रम इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात नमूद केलेले नाहीत काय?
यहोआहाज आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला आणि त्याला शोमरोनात मूठमाती देण्यात आली. त्याच्यानंतर त्याचा पुत्र योआश त्याच्या जागी राज्य करू लागला.
यहूदीयाचा राजा यहोआशच्या कारकिर्दीच्या सदतिसाव्या वर्षी यहोआहाजाचा पुत्र योआश शोमरोनात इस्राएलावर राज्य करू लागला आणि त्याने सोळा वर्षे राज्य केले.
त्याने याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले आणि नेबाटाचा पुत्र यरोबोअमच्या पातकांपासून मागे फिरला नाही; जी पातके त्याने इस्राएली लोकांना करण्यास लावली होती, ती तो करत राहिला.
योआशाच्या कारकिर्दीचा बाकीचा इतिहास आणि यहूदीयाचा राजा अमस्याहबरोबर झालेले त्याचे युद्ध व त्याचे पराक्रम यांची नोंद इस्राएली राजांचा इतिहास या ग्रंथात केला नाही काय?
योआश आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला आणि यरोबोअम त्याच्या राजासनावर बसला. योआशाला शोमरोनात इस्राएलांच्या राजांसोबत मूठमाती देण्यात आली.