मुख्य मजकुरावर जा

Kings बद्दल बायबलमधील वचने

580 वचने · 175 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याहवेहच्या मंदिरातील आणि राजवाड्याच्या तिजोरीतून सर्व सोने, चांदी व सापडतील ती पात्रे त्याने घेतली, त्याने कैद्यांना सुद्धा घेतले आणि तो शोमरोनास परतला.

  2. यहोआशाचा बाकीचा इतिहास, त्याने काय केले आणि त्याचे पराक्रम, तसेच यहूदीयाच्या अमस्याह राजाबरोबर झालेले त्याचे युद्ध यांची नोंद इस्राएली राजांचा इतिहासग्रंथात नमूद केलेली नाही काय?

  3. यहोआश आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला आणि त्याला इस्राएली राजांसोबत शोमरोनात मूठमाती देण्यात आली. आणि त्याच्यानंतर त्याचा पुत्र यरोबोअम हा त्याच्या जागी राज्य करू लागला.

  4. इस्राएलचा राजा यहोआहाजचा पुत्र यहोआशच्या मृत्यूनंतर यहूदीयाचा राजा योआशचा पुत्र अमस्याह पंधरा वर्षे जगला.

  5. अमस्याहाच्या राज्यकाळातील इतर घटना, यहूदीयाच्या राजांच्या इतिहासग्रंथात लिहिलेल्या नाहीत काय?

  6. त्यांनी यरुशलेममध्ये त्याच्याविरुद्ध कट रचला आणि तो लाखीशकडे पळून गेला, परंतु त्यांनी त्याच्यामागे लाखीशकडे माणसे पाठवून दिली आणि त्याला तिथे मारले.

  7. त्याला घोड्यावरून परत आणण्यात आले आणि यरुशलेममध्ये दावीदाच्या शहरात त्याच्या पूर्वजांबरोबर पुरण्यात आले.

  8. यहूदीयाचा राजा योआशाचा पुत्र अमस्याहच्या कारकिर्दीच्या पंधराव्या वर्षी इस्राएलाचा राजा योआशचा पुत्र यरोबोअम शोमरोनात राज्य करू लागला आणि त्याने एकेचाळीस वर्षे राज्य केले.

  9. त्याने याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले, नेबाटाचा पुत्र यरोबोअमाने जी पातके इस्राएलास करावयास लावली तो त्या पातकांपासून मागे फिरला नाही.

  10. त्याने इस्राएलाची सीमा लेबो हमाथपासून अराबाच्या समुद्रापर्यंत पुनः स्थापित केली. याहवेह इस्राएलांच्या परमेश्वराच्या वचनाप्रमाणे गथ-हेफेर येथील संदेष्टा अमित्तयाचा पुत्र योनाहद्वारे हे भविष्य केले होते.

  11. इस्राएलातील प्रत्येकजण, मग तो गुलाम असो वा स्वतंत्र असो, त्यांचा फार छळ होत आहे हे याहवेहने पाहिले; त्यांना साहाय्य करणारे कोणीही नव्हते.

  12. आणि इस्राएलचे नाव पृथ्वीवरून पुसून टाकीन असे याहवेहने कधीच म्हटले नाही, मग याहवेहने योआशाचा पुत्र यरोबोअमद्वारे त्यांची सुटका केली.

  13. यरोबोअमचे बाकीचे जीवनचरित्र, त्याने केलेली कृत्ये, त्याचे थोर सामर्थ्य, त्याचे युद्ध आणि त्याने पूर्वी यहूदीयाने काबीज केलेले दिमिष्क व हमाथ परत कसे मिळविले या सर्व हकिकतीचे वर्णन, इस्राएली राजांच्या इतिहासग्रंथात लिहून ठेवले नाही काय?

  14. यरोबोअम त्याचे पूर्वज इस्राएली राजांना मिळाला. आणि त्याच्यानंतर त्याचा पुत्र जखर्‍याह त्याच्या जागी इस्राएलावर राज्य करू लागला.

  15. इस्राएलाचा राजा यरोबोअमच्या कारकिर्दीच्या सत्ताविसाव्या वर्षी यहूदीयाचा राजा अमस्याहाचा पुत्र अजर्‍याह राज्य करू लागला.

  16. तो वयाच्या सोळाव्या वर्षी राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये बावन्न वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यकोल्याह. ती यरुशलेम येथील होती.

  17. त्याने त्याचा पिता अमस्याहप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते केले.

  18. तरी त्याने डोंगरावरील उच्चस्थळे नष्ट केली नाहीत आणि लोक तिथे जाऊन यज्ञ करीत व धूप जाळीत असत.

  19. याहवेहने राजाला पीडले आणि तो मरेपर्यंत त्याला कुष्ठरोग होता. तो वेगळ्या घरात राहिला. राजाचा पुत्र योथामाकडे राजवाड्याचा कारभार होता आणि तो देशाच्या जनतेवर शासन करीत असे.

  20. अजर्‍याहच्या कारकिर्दीतील इतर घटना आणि त्याने जे काही केले ते यहूदीयाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिलेले नाही काय?

  21. अजर्‍याह आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला त्यांच्याजवळ दावीदनगरीत पुरण्यात आले. आणि त्याचा वारस म्हणून त्याचा पुत्र योथाम राजा झाला.

  22. यहूदीयाचा राजा अजर्‍याहच्या अडतिसाव्या वर्षी यरोबोअमाचा पुत्र जखर्‍याह शोमरोनात इस्राएलावर राजा झाला आणि त्याने सहा महिने राज्य केले.

  23. आपल्या पूर्वजांप्रमाणेच याहवेहच्या दृष्टीने वाईट ते त्याने केले. नेबाटाचा पुत्र यरोबोअमाने जी पातके इस्राएलास करावयास लावली तो त्या पातकांपासून मागे फिरला नाही.

  24. याबेशाचा पुत्र शल्लूमाने जखर्‍याहविरुद्ध कट रचला. त्याने लोकांसमोर त्याच्यावर हल्ला करून ठार त्याला केले आणि तो त्याच्या ठिकाणी राज्य करू लागला.

  25. जखर्‍याहच्या कारकिर्दीतील इतर घटना इस्राएली राजांच्या इतिहासग्रंथात लिहिलेल्या नाहीत काय?