Skip to content

Kings बद्दल बायबलमधील वचने

580 वचने · 175 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तर आता दुष्ट पुरुषांनी एका निर्दोष व्यक्तीला त्याच्या घरात, त्याच्याच पलंगावर जिवे मारले आहे; मी किती विशेषकरून तुमच्या हातून त्याच्या रक्ताचा जाब घ्यावा आणि तुम्हाला या पृथ्वीतून नष्ट करावे!”

  2. तेव्हा दावीदाने त्याच्या माणसांना आज्ञा दिली आणि त्यांनी त्यांना जिवे मारले. त्यांनी त्यांचे हात आणि पाय तोडून टाकले आणि त्यांची शरीरे हेब्रोन येथील तळ्याजवळ टांगली. परंतु त्यांनी इश-बोशेथचे डोके घेतले आणि ते हेब्रोन येथे अबनेरच्या कबरेत पुरले.

  3. जेव्हा तुझे दिवस भरतील आणि तू आपल्या पूर्वजांबरोबर निजशील, तेव्हा मी तुझे संतान म्हणजे तुझ्या पोटचा वंश उभा करून त्याला तुझा उत्तराधिकारी बनवीन, मी त्याचे राज्य प्रस्थापित करेन.

  4. तोच माझ्या नावाकरिता घर बांधेल आणि मी त्याचे राजासन सर्वकाळासाठी स्थापित करेन.

  5. मी त्याचा पिता होईन आणि तो माझा पुत्र होईल. तो जेव्हा चूक करेल, तेव्हा मी त्याला मनुष्याच्या काठीने, मानवांच्या फटक्यांनी शिक्षा करेन.

  6. परंतु तुझ्यासमोरून काढून टाकलेल्या शौलावरची प्रीती मी जशी दूर केली, तशी तुझ्या संतानावरची माझी प्रीती काढून टाकली जाणार नाही.

  7. तुझे घराणे आणि तुझे राज्य माझ्यासमोर सर्वकाळ टिकून राहेल; तुझे राजासन सर्वकाळासाठी स्थापित केले जाईल.’ ”

  8. दावीद त्याला म्हणाला, “भिऊ नकोस! कारण तुझा पिता योनाथान याच्याप्रीत्यर्थ मी तुझ्यावर अवश्य दया करेन. तुझे आजोबा शौल यांच्या मालकीची सर्व जमीन मी तुला परत देईन आणि तू नेहमी माझ्या मेजावर भोजन करशील.”

  9. मेफीबोशेथ दंडवत घालीत म्हणाला, “तुमचा सेवक कोण आहे की, माझ्यासारख्या मेलेल्या कुत्र्याची तुम्ही नोंद घ्यावी?”

  10. नंतर राजाने शौलाचा सेवक सीबा याला बोलावून घेतले आणि त्याला म्हणाला, “शौलाचे व त्याच्या घराण्याचे जे काही होते ते सर्व मी तुझ्या धन्याच्या नातवाला दिले आहे.

  11. तू, तुझे पुत्र आणि तुझे चाकर यांनी त्याच्यासाठी त्या जमिनीची मशागत करावी आणि तुझ्या धन्याच्या नातवाला पुरवठा असावा म्हणून ते पीक आणावे. आणि मेफीबोशेथ, तुझ्या धन्याचा नातू, नेहमीच माझ्या मेजावर भोजन करेल.” (सीबाची पंधरा मुले आणि वीस चाकर होते.)

  12. तेव्हा सीबा राजाला म्हणाला, “माझ्या धनीराजाने आपल्या सेवकाला दिलेल्या आज्ञेनुसार आपला सेवक करेल.” याप्रमाणे राजाच्या पुत्रांसारखा मेफीबोशेथ दावीदाच्या मेजावर भोजन करीत असे.

  13. मेफीबोशेथला मीखा नावाचा एक लहान पुत्र होता आणि सीबाच्या घरातील प्रत्येकजण मेफीबोशेथचे चाकर होते.

  14. आणि मेफीबोशेथ यरुशलेम येथे राहिला कारण तो नेहमी राजाच्या मेजावर भोजन करीत असे; तो दोन्ही पायांनी अधू होता.

  15. तेव्हा नाथान दावीदाला म्हणाला, “तो मनुष्य तूच आहेस! याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘मी तुझा इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक केला आणि तुला शौलाच्या हातातून सोडविले.

  16. तुझ्या धन्याचे घर मी तुला दिले आणि तुझ्या धन्याच्या स्त्रिया तुझ्या बाहूंमध्ये दिल्या. मी तुला संपूर्ण इस्राएल आणि यहूदीया दिले. आणि हे सर्व फार थोडेच होते तर, मी तुला अधिक दिले असते.

  17. याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते करून तू याहवेहचा शब्द का अवमानीत केला आहेस? उरीयाह हिथी याला तू तलवारीने मारून टाकलेस आणि त्याची पत्नी तू आपली स्वतःची पत्नी म्हणून घेतली आहेस. तू त्याला अम्मोन्यांच्या तलवारीने ठार मारलेस.

  18. तर आता, तलवार तुझ्या घराण्याला कधीही सोडणार नाही, कारण तू मला तुच्छ लेखले आणि उरीयाह हिथीची पत्नी तू स्वतःची पत्नी म्हणून घेतली आहेस.’

  19. “याहवेह असे म्हणतात: ‘तुझ्याच घराण्यातून मी तुझ्यावर अरिष्ट आणणार आहे. तुझ्या डोळ्यांसमोर मी तुझ्या स्त्रिया घेऊन तुझ्या जिवलगाला देईन आणि तो दिवसाच्या प्रकाशात तुझ्या स्त्रियांशी संबंध ठेवील.

  20. तू हे गुप्तपणे केलेस, परंतु मी हे दिवसाच्या प्रकाशात सर्व इस्राएलसमोर करेन.’ ”

  21. त्यावेळी अदोनियाह, ज्याच्या आईचे नाव हग्गीथ होते, त्याने स्वतःला पुढे करीत म्हटले, “मी राजा होणार.” म्हणून त्याने रथ आणि घोडे तयार केले आणि त्याच्यापुढे धावण्यासाठी पन्नास माणसे घेतली.

  22. (“तू जे काही करतोस ते का करतोस?” असे त्याच्या वडिलांनी त्याला कधीही खडसावून विचारले नाही. तो सुद्धा फार रूपवान होता आणि अबशालोमच्या नंतर तो जन्मला होता.)

  23. जेरुइयाहचा पुत्र योआब आणि अबीयाथार याजक यांच्याशी अदोनियाहने चर्चा केली आणि त्यांनी त्याला पाठिंबा दिला.

  24. शलोमोनने सर्व इस्राएलात बारा जिल्हाधिकारीही नेमले होते. ते राजाला आणि राजघराण्याला अन्नसामुग्री पुरवित असत. प्रत्येकाला वर्षातून एकदा, महिनाभर सामुग्री पुरवावी लागत असे.

  25. त्यांची नावे ही होती: बेन-हूर हा एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशावर होता;