मुख्य मजकुरावर जा

circa 6 BC – AD 30

The Life of Jesus

The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.

3,779 वचने · 4 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. योहान १४:२सुमारे इ.स. ३३

    माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या अनेक खोल्या आहेत आणि तसे नसते तर, मी तुमच्यासाठी जागा तयार करण्यासाठी जात आहे असे तुम्हाला सांगितले असते का?

  2. योहान १४:३सुमारे इ.स. ३३

    आणि जर मी गेलो व तुमच्यासाठी जागा तयार केली की, मी पुन्हा येईन व तुम्हाला बरोबर घेऊन जाईन, म्हणजे जिथे मी आहे तिथे तुम्हीही असावे.

  3. योहान १४:४सुमारे इ.स. ३३

    मी ज्या ठिकाणी जाणार आहे, तिथे जाण्याचा मार्ग तुम्हाला ठाऊक आहे.”

  4. योहान १४:५सुमारे इ.स. ३३

    थोमा त्यांना म्हणाला, “प्रभूजी, आपण कुठे जात आहात हे आम्हास माहीत नाही, तर मार्ग आम्हास कसा माहीत असणार?”

  5. योहान १४:६सुमारे इ.स. ३३

    येशूंनी उत्तर दिले, “मार्ग आणि सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणीही येऊ शकत नाही.

  6. योहान १४:७सुमारे इ.स. ३३

    जर तुम्ही मला खरोखर ओळखले असते, तर माझ्या पित्यालाही ओळखले असते. आता यापुढे तुम्ही त्यांना ओळखता व त्यांना पाहिलेही आहे.”

  7. योहान १४:८सुमारे इ.स. ३३

    फिलिप्प म्हणाला, “प्रभूजी, आम्हाला पिता दाखवा म्हणजे पुरे आहे.”

  8. योहान १४:९सुमारे इ.स. ३३

    येशूंनी उत्तर दिले: “फिलिप्पा, मी इतका काळ तुम्हाजवळ असूनही तू मला ओळखत नाही काय? ज्याने मला पाहिले आहे, त्याने पित्यालाही पाहिले आहे. तर मग, ‘पिता दाखवा असे तू कसे म्हणतोस’?

  9. योहान १४:१०सुमारे इ.स. ३३

    मी पित्यामध्ये आहे व पिता मजमध्ये आहे, यावर तुझा विश्वास नाही काय? जी वचने मी तुला सांगतो, ते मी माझ्या स्वतःच्या अधिकाराने सांगत नाही. खरेतर, माझ्यामध्ये वसणारा पिताच हे कार्य करीत आहे.

  10. योहान १४:११सुमारे इ.स. ३३

    फक्त विश्वास ठेवा की मी पित्यामध्ये आहे आणि पिता मजमध्ये आहे; अथवा प्रत्यक्ष कार्याच्या पुराव्यावर तरी विश्वास ठेवा.

  11. योहान १४:१२सुमारे इ.स. ३३

    मी तुम्हाला निश्चित सांगतो, मी जी कृत्ये करतो ती मजवर विश्वास ठेवणाराही करेल, किंबहुना त्यापेक्षाही मोठी करेल, कारण मी पित्याकडे जात आहे.

  12. योहान १४:१३सुमारे इ.स. ३३

    आणि तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करेन, यासाठी की पुत्रामध्ये पित्याचे गौरव व्हावे.

  13. योहान १४:१४सुमारे इ.स. ३३

    तुम्ही माझ्या नावाने मजजवळ जे काहीही मागाल, ते मी तुम्हासाठी करेन.

  14. योहान १४:१५सुमारे इ.स. ३३

    “जर तुमची मजवर प्रीती असेल, तर माझ्या आज्ञा पाळा.

  15. योहान १४:१६सुमारे इ.स. ३३

    आणि मी पित्याजवळ मागेन, ते तुम्हाला मदत करण्यासाठी दुसरा कैवारी देतील, जो तुम्हाबरोबर सर्वकाळ राहील—

  16. योहान १४:१७सुमारे इ.स. ३३

    सत्याचा आत्मा. त्याला जग स्वीकारणार नाही, कारण जग त्याला पाहत नाही व ओळखत नाही. परंतु तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुम्हाबरोबर राहतो आणि तुम्हामध्ये राहील.

  17. योहान १४:१८सुमारे इ.स. ३३

    मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही; मी तुमच्याकडे येईन.

  18. योहान १४:१९सुमारे इ.स. ३३

    आता थोड्याच वेळात, जग मला आणखी पाहणार नाही, परंतु तुम्ही मला पाहाल. मी जिवंत आहे, म्हणून तुम्हीही जिवंत राहाल.

  19. योहान १४:२०सुमारे इ.स. ३३

    त्या दिवशी तुम्हाला समजेल की मी पित्यामध्ये आहे व तुम्ही मजमध्ये आहात व मी तुम्हामध्ये आहे.

  20. योहान १४:२१सुमारे इ.स. ३३

    ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळतो तोच मजवर प्रीती करतो. जो मजवर प्रीती करतो त्यावर माझे पिताही प्रीती करतील आणि मी देखील त्याजवर प्रीती करेन व स्वतः त्यांना प्रकट होईन.”

  21. योहान १४:२२सुमारे इ.स. ३३

    नंतर यहूदाह (यहूदाह इस्कर्योत नव्हे) म्हणाला, “पण प्रभूजी, आपण फक्त आम्हाला प्रकट होणार पण जगाला का प्रकट होणार नाही?”

  22. योहान १४:२३सुमारे इ.स. ३३

    येशूंनी उत्तर दिले, “कारण जो कोणी मजवर प्रीती करतो तो माझे शिक्षण आचरणात आणेल. माझे पितादेखील त्यांच्यावर प्रीती करतील आणि आम्ही त्यांच्याकडे येऊ व त्यांच्याबरोबर वस्ती करू.

  23. योहान १४:२४सुमारे इ.स. ३३

    जो कोणी माझ्यावर प्रीती करीत नाही, तो माझे शिक्षण पाळीत नाही. माझी जी वचने तुम्ही ऐकत आहात ती माझी स्वतःची नाहीत; तर ज्याने मला पाठविले त्या पित्याची आहेत.

  24. योहान १४:२५सुमारे इ.स. ३३

    “मी तुमच्याबरोबर असताना, हे सर्व तुम्हाला सांगितले आहे.

  25. योहान १४:२६सुमारे इ.स. ३३

    परंतु तो कैवारी, पवित्र आत्मा, ज्याला पिता माझ्या नावाने पाठवतील, तो तुम्हाला सर्वकाही शिकवेल आणि मी सांगितलेल्या सर्व गोष्टींची आठवण करून देईल.