मुख्य मजकुरावर जा

circa 6 BC – AD 30

The Life of Jesus

The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.

3,779 वचने · 4 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. योहान १३:१५सुमारे इ.स. ३३

    जसे मी तुम्हासाठी केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हाला नमुना घालून दिला आहे.

  2. योहान १३:१६सुमारे इ.स. ३३

    मी खरोखर तुम्हाला सांगतो, दास आपल्या धन्यापेक्षा थोर नाही, संदेशवाहक ज्याने त्याला पाठविले त्यापेक्षा मोठा नाही.

  3. योहान १३:१७सुमारे इ.स. ३३

    आता तुम्हाला या गोष्टी समजल्या आहेत, तुम्ही त्याप्रमाणे कराल तर तुम्ही आशीर्वादित व्हाल.

  4. योहान १३:१८सुमारे इ.स. ३३

    “मी तुम्हा सर्वांबद्दल बोलत नाही; मी ज्यांची निवड केली आहे ते मला माहीत आहेत. परंतु यासाठी की, ‘ज्याने माझ्याबरोबर भाकर खाल्ली तो माझ्यावर उलटला आहे.’ हा शास्त्रलेखाचा भाग पूर्ण होण्यासाठी असे झाले आहे.

  5. योहान १३:१९सुमारे इ.स. ३३

    “मी तुम्हाला हे आताच, घडून येण्यापूर्वी सांगत आहे, ते यासाठी की जेव्हा तसे घडून येईल, तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा की मी तो आहे.

  6. योहान १३:२०सुमारे इ.स. ३३

    मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जे कोणी ज्याला मी पाठविले त्याला स्वीकारतात, ते मला स्वीकारतात आणि जे कोणी मला स्वीकारतात ते ज्याने मला पाठविले त्याला स्वीकारतात.”

  7. योहान १३:२१सुमारे इ.स. ३३

    असे बोलल्यानंतर, येशू आपल्या आत्म्यामध्ये व्याकूळ होऊन उत्तरले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो, तुम्हातील एकजण मला विश्वासघाताने धरून देईल.”

  8. योहान १३:२२सुमारे इ.स. ३३

    त्यांचे शिष्य एकमेकांकडे रोखून पाहू लागले, येशू नेमके कोणाबद्दल बोलत आहेत हे त्यांना समजेना.

  9. योहान १३:२३सुमारे इ.स. ३३

    त्यांच्यापैकी ज्या शिष्यावर येशूंची प्रीती होती तो शिष्य, येशूंच्या उराशी टेकलेला होता.

  10. योहान १३:२४सुमारे इ.स. ३३

    “कोणाविषयी सांगत आहे हे विचारून आम्हास सांग,” असे शिमोन पेत्राने त्या शिष्याला खुणावून विचारले.

  11. योहान १३:२५सुमारे इ.स. ३३

    तो येशूंच्या उराशी टेकलेला असता, म्हणाला, “प्रभूजी, तो कोण आहे?”

  12. योहान १३:२६सुमारे इ.स. ३३

    येशू उत्तरले, “ज्या एकाला मी हा भाकरीचा तुकडा ताटात बुडवून देईल तोच तो आहे.” मग ताटात भाकरीचा तुकडा बुडविल्यानंतर त्यांनी तो शिमोनाचा पुत्र यहूदाह इस्कर्योतला दिला.

  13. योहान १३:२७सुमारे इ.स. ३३

    यहूदाहने ती भाकर घेतल्याबरोबर सैतान त्याजमध्ये शिरला. येशूंनी त्याला म्हटले, “जे तू करणार आहेस, ते आता त्वरेने कर.”

  14. योहान १३:२८सुमारे इ.स. ३३

    येशू कशाला तसे म्हणाले हे भोजनास बसलेल्यातील कोणालाही समजले नाही.

  15. योहान १३:२९सुमारे इ.स. ३३

    काहींना वाटले की यहूदाहच्या हाती पैशाचा कारभार असल्यामुळे सणासाठी काही विकत घ्यावे किंवा गरिबांना काही द्यावे म्हणून येशूने सांगितले असेल.

  16. योहान १३:३०सुमारे इ.स. ३३

    मग तो भाकरीचा तुकडा घेतल्याबरोबर, यहूदाह बाहेर निघून गेला. तेव्हा रात्र होती.

  17. योहान १३:३१सुमारे इ.स. ३३

    तो निघून गेल्याबरोबर, येशू म्हणाले, “आता मानवपुत्राचे गौरव झाले आहे आणि परमेश्वराचे त्यामध्ये गौरव झाले आहे;

  18. योहान १३:३२सुमारे इ.स. ३३

    जर परमेश्वराचे गौरव त्यांच्यामध्ये झाले तर परमेश्वर आपल्यामध्ये पुत्राचे गौरव करतील आणि लवकरच गौरव करतील.

  19. योहान १३:३३सुमारे इ.स. ३३

    “माझ्या मुलांनो, मी अजून थोडा वेळ तुम्हाबरोबर आहे. मग तुम्ही माझा शोध कराल आणि जसे मी यहूदी पुढार्‍यांना सांगितले, तसेच आता तुम्हालाही सांगतो: मी जिथे जाणार, तिथे तुम्हाला येता येणार नाही.

  20. योहान १३:३४सुमारे इ.स. ३३

    “मी तुम्हाला एक नवीन आज्ञा देत आहे: तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. जशी मी तुम्हावर प्रीती केली, तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती केलीच पाहिजे.

  21. योहान १३:३५सुमारे इ.स. ३३

    तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्वजण ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात.”

  22. योहान १३:३६सुमारे इ.स. ३३

    शिमोन पेत्राने त्यांना विचारले, “प्रभूजी, आपण कुठे जाणार आहात?” येशूंनी उत्तर दिले, “मी जिथे जातो, तिथे आता तुला माझ्यामागे येता येणार नाही, परंतु नंतर तू माझ्यामागे येशील.”

  23. योहान १३:३७सुमारे इ.स. ३३

    त्यावर पेत्र म्हणाला, “प्रभू, मला आताच तुम्हाला का अनुसरता येणार नाही? मी आपल्यासाठी माझा प्राण देईन.”

  24. योहान १३:३८सुमारे इ.स. ३३

    येशूंनी उत्तर दिले, “माझ्यासाठी तू खरोखर आपला जीव देशील काय? मी तुला निश्चित सांगतो, कोंबडा आरवण्यापूर्वी, तू मला तीन वेळा नाकारशील!

  25. योहान १४:१सुमारे इ.स. ३३

    “तुमची हृदये अस्वस्थ होऊ देऊ नका. तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवा; आणि माझ्यावरसुद्धा विश्वास ठेवा.