- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 6 BC – AD 30
The Life of Jesus
The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.
या कालखंडातील वचने
- योहान १२:४०सुमारे इ.स. ३३
“म्हणून परमेश्वराने त्यांचे डोळे आंधळे केले आहेत आणि त्यांची हृदये कठोर केली होती, म्हणजे त्यांना डोळ्यांनी दिसू नये, किंवा अंतःकरणाने समजू नये, किंवा ते वळू नये—जेणे करून मी त्यांना बरे करेन.”
- योहान १२:४१सुमारे इ.स. ३३
यशायाहने येशूंचे गौरव पाहिले म्हणून तो त्यांच्याविषयी बोलला.
- योहान १२:४२सुमारे इ.स. ३३
त्याच वेळेला पुष्कळांनी आणि पुढार्यांपैकी अनेकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. परंतु परूश्यांमुळे ते आपला विश्वास व्यक्त करीत नव्हते. आपण सभागृहातून बहिष्कृत केले जाऊ असे त्यांना भय वाटत होते;
- योहान १२:४३सुमारे इ.स. ३३
कारण परमेश्वराकडून मिळणार्या स्तुतीपेक्षा त्यांना मानवाकडून मिळणारी स्तुती अधिक प्रिय होती.
- योहान १२:४४सुमारे इ.स. ३३
नंतर येशू मोठ्याने म्हणाले, “जे कोणी मजवर विश्वास ठेवतात ते फक्त मजवरच विश्वास ठेवतात असे नाही, तर ज्यांनी मला पाठविले त्यांच्यावर ठेवतात;
- योहान १२:४५सुमारे इ.स. ३३
जे मला पाहतात ते वास्तविक ज्यांनी मला पाठविले त्यांनाच पाहतात.
- योहान १२:४६सुमारे इ.स. ३३
मी या जगात प्रकाश म्हणून आलो आहे, यासाठी की जे मजवर विश्वास ठेवतात त्यांनी अंधारात राहू नये.
- योहान १२:४७सुमारे इ.स. ३३
“जर कोणी माझी वचने ऐकून ती पाळीत नाही, तर मी त्या व्यक्तीचा न्याय करीत नाही. कारण मी या जगाचा न्याय करण्यासाठी आलो नसून, जगाचे तारण करण्यासाठी आलो आहे.
- योहान १२:४८सुमारे इ.स. ३३
जे मला नाकारतात व माझ्या वचनांचा स्वीकार करीत नाही; त्यांचा न्याय करणारे एकच आहे; जी वचने मी बोललो होतो तीच त्यांचा न्याय करतील.
- योहान १२:४९सुमारे इ.स. ३३
कारण मी माझे स्वतःचे बोलत नाही, ज्या पित्याने मला पाठविले, त्यांनी मी काय सांगावे व काय बोलावे याची मला आज्ञा दिली आहे.
- योहान १२:५०सुमारे इ.स. ३३
त्यांच्या आज्ञा सार्वकालिक जीवनाकडे नेणार्या आहेत. यास्तव जे काही मी बोलतो, ते पित्याने मला सांगितल्याप्रमाणे बोलतो.”
- योहान १३:१सुमारे इ.स. ३३
वल्हांडण सण सुरू होण्यास थोडा अवधी होता. येशूंना माहीत होते की हे जग सोडून पित्याकडे जाण्याची त्यांची वेळ जवळ आली आहे. जगात जे त्यांचे लोक होते, त्यांच्यावर त्यांनी प्रीती केली व शेवटपर्यंत प्रीती केली.
- योहान १३:२सुमारे इ.स. ३३
संध्याकाळचे भोजन चालू असताना, येशूंचा विश्वासघात करावा असा विचार सैतानाने शिमोनाचा पुत्र यहूदाह इस्कर्योतच्या मनात घातला होता.
- योहान १३:३सुमारे इ.स. ३३
येशूंना माहीत होते की, पित्याने सर्वगोष्टी त्यांच्या सत्तेखाली ठेवल्या आहेत आणि ते परमेश्वरापासून आले आहेत व त्यांच्याकडे परत जाणार आहेत;
- योहान १३:४सुमारे इ.स. ३३
म्हणून येशू भोजनावरून उठले आणि आपली बाहेरील वस्त्रे काढून ठेवली आणि रुमाल कमरेस बांधला.
- योहान १३:५सुमारे इ.स. ३३
त्यानंतर त्यांनी मोठ्या गंगाळात पाणी ओतले आणि ते आपल्या शिष्यांचे पाय धुऊ लागले आणि आपल्या कमरेभोवती असलेल्या रुमालाने पुसू लागले.
- योहान १३:६सुमारे इ.स. ३३
ते शिमोन पेत्राकडे आले, तो त्यांना म्हणाला, “प्रभू, तुम्ही माझे पाय धुणार आहात काय?”
- योहान १३:७सुमारे इ.स. ३३
येशूंनी उत्तर दिले, “मी काय करीत आहे, हे तुला आता कळणार नाही, पण नंतर कळेल.”
- योहान १३:८सुमारे इ.स. ३३
पेत्र म्हणाला, “नाही, मी तुम्हाला माझे पाय कधीही धुऊ देणार नाही.” येशू म्हणाले, “मी तुला धुतले नाही, तर तुला माझ्याबरोबर वाटा नाही.”
- योहान १३:९सुमारे इ.स. ३३
शिमोन पेत्राने म्हटले, “प्रभू, केवळ माझे पायच नव्हे तर हात व डोके देखील धुवा!”
- योहान १३:१०सुमारे इ.स. ३३
यावर येशू म्हणाले, “ज्यांची आंघोळ झाली आहे त्याला फक्त पाय धुण्याची गरज असते, कारण त्यांचे पूर्ण शरीर स्वच्छ असते. आता तू शुद्ध झाला आहेस, परंतु तुम्ही सर्वच शुद्ध नाहीत.”
- योहान १३:११सुमारे इ.स. ३३
आपला विश्वासघात करणारा कोण आहे ते येशूंना माहीत होते आणि म्हणूनच ते म्हणाले, तुम्ही सर्वच शुद्ध नाही.
- योहान १३:१२सुमारे इ.स. ३३
त्यांचे पाय धुतल्यावर त्यांनी कपडे पुन्हा अंगावर घातले आणि आपल्या जागी परत आले व आपल्या शिष्यांना विचारले, “मी तुमच्यासाठी काय केले हे तुम्हाला समजले का?
- योहान १३:१३सुमारे इ.स. ३३
तुम्ही मला ‘गुरुजी’ आणि ‘प्रभूजी’ असे संबोधता आणि ते खरे आहे, यासाठी की तो मी आहे.
- योहान १३:१४सुमारे इ.स. ३३
आता ज्याअर्थी मी तुमचा प्रभू व गुरू असूनही तुमचे पाय धुतले, तसेच तुम्ही सुद्धा एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत.