मुख्य मजकुरावर जा

circa 6 BC – AD 30

The Life of Jesus

The eternal Son of God enters history: born in Bethlehem, baptized in the Jordan, crucified at Golgotha, raised on the third day.

3,779 वचने · 4 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. योहान १५:२१सुमारे इ.स. ३३

    माझ्या नावामुळे ते तुमच्याशी असे वागतील, कारण ज्यांनी मला पाठविले त्यांना ते ओळखीत नाहीत.

  2. योहान १५:२२सुमारे इ.स. ३३

    मी आलो नसतो व त्यांच्याशी बोललो नसतो, तर त्यांच्यावर पापाचा दोष नसता; परंतु आता त्यांना त्यांच्या पापासाठी काहीही सबब सांगता येणार नाही.

  3. योहान १५:२३सुमारे इ.स. ३३

    जो कोणी माझा द्वेष करतो, तो माझ्या पित्याचाही द्वेष करतो.

  4. योहान १५:२४सुमारे इ.स. ३३

    जे कोणीही केले नाही, ते कार्य मी त्यांच्यामध्ये केले नसते, तर ते दोषी समजले गेले नसते. परंतु वस्तुस्थिती ही आहे की, त्यांनी आम्हा दोघांचा, म्हणजे माझा व माझ्या पित्याचा द्वेष केला आहे.

  5. योहान १५:२५सुमारे इ.स. ३३

    ‘विनाकारण त्यांनी माझा द्वेष केला,’ असे त्यांच्या नियमात जे म्हटले आहे, ते पूर्ण झाले आहे.

  6. योहान १५:२६सुमारे इ.स. ३३

    “जेव्हा कैवारी येईल, ज्याला मी पित्यापासून तुम्हाकडे पाठवेन, तो सत्याचा आत्मा जो पित्याकडून येतो—तो माझ्याविषयी साक्ष देईल.

  7. योहान १५:२७सुमारे इ.स. ३३

    परंतु तुम्हीदेखील साक्ष दिलीच पाहिजे, कारण आरंभापासून तुम्ही मजबरोबर राहिला आहात.

  8. योहान १६:१सुमारे इ.स. ३३

    “तुम्ही बहकविले जाऊ नये म्हणून मी तुम्हाला हे सर्व सांगितले आहे.

  9. योहान १६:२सुमारे इ.स. ३३

    कारण ते तुम्हाला सभागृहामधून काढून टाकतील आणि खरोखर, अशी वेळ येत आहे की, जे कोणी तुम्हाला जिवे मारतील त्यांना आपण परमेश्वराला सेवेचा यज्ञ अर्पण करीत आहोत असे वाटेल.

  10. योहान १६:३सुमारे इ.स. ३३

    ते अशा गोष्टी करतील कारण त्यांनी कधीही पित्याला किंवा मला ओळखले नाही.

  11. योहान १६:४सुमारे इ.स. ३३

    मी तुम्हाला हे सांगत आहे, ते यासाठी की जेव्हा ते घडेल, तेव्हा तुम्हाला आठवेल की मी आधी तुम्हाला त्यासंबंधी इशारा दिला होता. मी या गोष्टी यापूर्वी तुम्हाला सांगितल्या नाहीत, कारण मी प्रत्यक्ष तुम्हाबरोबर होतो,

  12. योहान १६:५सुमारे इ.स. ३३

    परंतु आता ज्यांनी मला पाठविले त्यांच्याकडे मी परत जात आहे. तरी तुम्हापैकी कोणीही, ‘आपण कुठे जाता?’ असे विचारीत नाही

  13. योहान १६:६सुमारे इ.स. ३३

    खरे सांगावयाचे तर, मी या गोष्टी सांगितल्या आहेत म्हणून तुमची हृदये दुःखाने भरून गेलेली आहेत.

  14. योहान १६:७सुमारे इ.स. ३३

    परंतु खरी गोष्ट सांगतो की, माझे जाणे हे तुमच्या हितासाठीच आहे. मी जर गेलो नाही, तर कैवारी तुमच्याकडे येणार नाही; पण मी जर गेलो तर मी त्याला तुमच्याकडे पाठवेन.

  15. योहान १६:८सुमारे इ.स. ३३

    जेव्हा तो येईल, तेव्हा पापाविषयी, नीतिमत्त्वाविषयी व न्यायनिवाड्या विषयी जग कशी चूक करत आहे हे तो सिद्ध करेल.

  16. योहान १६:९सुमारे इ.स. ३३

    पापाविषयी, कारण जगातले लोक मजवर विश्वास ठेवीत नाहीत;

  17. योहान १६:१०सुमारे इ.स. ३३

    नीतिमत्त्वाविषयी, कारण मी पित्याकडे जात आहे आणि तुम्ही मला यापुढे पाहणार नाही;

  18. योहान १६:११सुमारे इ.स. ३३

    न्यायनिवाड्या विषयी, कारण या जगाच्या अधिपतीला दोषी ठरविण्यात आले आहे.

  19. योहान १६:१२सुमारे इ.स. ३३

    “मला तुम्हाला बरेच काही सांगावयाचे आहे, पण आता ते तुमच्याने ग्रहण होणार नाही.

  20. योहान १६:१३सुमारे इ.स. ३३

    परंतु जेव्हा तो सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो तुम्हाला मार्गदर्शन करून पूर्ण सत्यात नेईल, कारण तो आपल्या स्वतःचे काहीही सांगणार नाही; तर त्याने जे काही ऐकले आहे, तेच तुम्हाला सांगेल. तो तुम्हाला जे काही घडणार आहे ते सांगेल.

  21. योहान १६:१४सुमारे इ.स. ३३

    कारण तो माझ्यापासून आहे, म्हणून माझे गौरव करेल आणि माझ्यापासून जे त्याला मिळेल ते तो तुम्हाला प्रकट करेल.

  22. योहान १६:१५सुमारे इ.स. ३३

    पित्याचे जे सर्व आहे ते माझे आहे. यासाठी मी म्हणालो की आत्मा जे माझ्याकडून स्वीकारेल ते तो तुम्हाला प्रकट करेल.”

  23. योहान १६:१६सुमारे इ.स. ३३

    येशू वारंवार म्हणत होते, “थोड्या वेळाने मी तुम्हाला दिसणार नाही, परंतु त्यानंतर थोड्या वेळाने तुम्ही मला पुन्हा पाहाल.”

  24. योहान १६:१७सुमारे इ.स. ३३

    यावरून, त्यांचे काही शिष्य एकमेकास विचारू लागले, “मी पित्याकडे जातो म्हणून थोड्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल याचा अर्थ काय?”

  25. योहान १६:१८सुमारे इ.स. ३३

    तेव्हा ते विचारू लागले, “थोड्या वेळाने, असे जे येशू म्हणत आहेत, हे आम्हास समजत नाही.”