- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- योएल २:२८सुमारे इ.स.पू. ८००
“आणि त्यानंतर, मी माझा आत्मा सर्व लोकांवर ओतेन. तुमचे पुत्र व तुमच्या कन्या भविष्यवाणी सांगतील, व तुमचे वृद्ध स्वप्ने पाहतील, तुमचे तरुण दृष्टान्त पाहतील.
- योएल २:२९सुमारे इ.स.पू. ८००
माझ्या दासांवर म्हणजेच, स्त्री आणि पुरुष दोघांवरही, त्या दिवसांत मी माझा आत्मा ओतेन.
- योएल २:३०सुमारे इ.स.पू. ८००
आकाशात व पृथ्वीवर, रक्त व अग्नी व धुरांचे स्तंभ अशी विलक्षण चिन्हे मी दाखवेन.
- योएल २:३१सुमारे इ.स.पू. ८००
याहवेहचा महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल.
- योएल २:३२सुमारे इ.स.पू. ८००
आणि प्रत्येकजण जो प्रभूच्या नावाने त्यांचा धावा करेल तोच वाचेल; कारण याहवेहने म्हटले आहे सीयोन डोंगरावर आणि यरुशलेममध्ये व जे उरलेले असतील ते वाचतील आणि ज्यांना याहवेहने बोलाविले ते सुद्धा तारण पावतील.
- योएल ३:१सुमारे इ.स.पू. ८००
“त्या दिवसात आणि त्या समयी जेव्हा मी यहूदाह व यरुशलेम भविष्य पुनर्संचयित करेन,
- योएल ३:२सुमारे इ.स.पू. ८००
मी सर्व राष्ट्रांना एकत्र करेन आणि त्यांना खाली यहोशाफाट च्या खोऱ्यात आणेन. त्यांनी माझ्या वतनास, माझ्या इस्राएली लोकांशी जे केले त्याबद्दल मी त्यांची परीक्षा घेईन. कारण त्यांनी माझ्या लोकांना राष्ट्रांमध्ये विखुरले आहे आणि माझ्या देशाचे विभाजन केले आहे.
- योएल ३:३सुमारे इ.स.पू. ८००
त्यांनी माझ्या लोकांकरिता चिठ्ठ्या टाकल्या आणि वेश्यांसाठी मुलांचा व्यापार केला; मद्द्याकरिता आपल्या मुलींना विकले.
- योएल ३:४सुमारे इ.स.पू. ८००
“अहो सोर आणि सीदोन, पलेशेथच्या शहरांनो, आता तुमच्याजवळ माझ्याविरुद्ध काय आहे? मी जे काही केले आहे त्याची परतफेड मला करीत आहात काय? तुम्ही मजवर सूड उगविण्याचा प्रयत्न करीत आहात काय? कारण मी त्वरेने उलट प्रहार करेन आणि तुमचेच कृत्य तुमच्या माथ्यावर उलटवेन.
- योएल ३:५सुमारे इ.स.पू. ८००
तुम्ही माझे रूप आणि सोने हरण केले आहे आणि माझी सर्व मोलवान भांडारे घेऊन ती तुमच्या मंदिरात ठेवली आहेत.
- योएल ३:६सुमारे इ.स.पू. ८००
तुम्ही यहूदीयाच्या आणि यरुशलेमच्या लोकांना त्यांच्या देशापासून दूर नेण्यासाठी यावानी लोकांना विकले.
- योएल ३:७सुमारे इ.स.पू. ८००
“परंतु जिथे तुम्ही त्यास विकून पाठविले, त्या सर्व ठिकाणांहून मी त्यांना परत आणेन आणि तुम्ही जे हे सर्व केले त्याची परतफेड तुमच्या माथ्यावर फेडीन.
- योएल ३:८सुमारे इ.स.पू. ८००
मी तुमचे पुत्र व तुमच्या कन्या यहूदीयातील लोकांना विकून टाकेन आणि ते त्यांना दूरच्या शबाई लोकांस विकतील.” याहवेहने हे म्हटले आहे.
- योएल ३:९सुमारे इ.स.पू. ८००
राष्ट्रांमध्ये ही घोषणा करा: युद्धासाठी सुसज्ज व्हा! योद्ध्यांना आव्हान करा! तुमचे सर्व लढवय्ये जवळ या आणि हल्ला करा.
- योएल ३:१०सुमारे इ.स.पू. ८००
तुमचा फाळ वितळवून त्यांच्या तलवारी तयार करा आणि तुमच्या कोयत्यांचे भाले बनवा. दुर्बल असे म्हणो, “मी सबल आहे!”
- योएल ३:११सुमारे इ.स.पू. ८००
सभोवतालच्या राष्ट्रांनो, तुम्ही लवकर या, आणि तिथे एकत्र व्हा. हे याहवेह, तुमचे योद्धे खाली आणा!
- योएल ३:१२सुमारे इ.स.पू. ८००
“राष्ट्रे जागृत व्हावी; त्यांनी यहोशाफाटाच्या खोर्यात यावे, कारण तिथे मी न्यायासनावर बसून चारही बाजूंच्या सर्व राष्ट्रांचा न्याय करणार आहे.
- योएल ३:१३सुमारे इ.स.पू. ८००
आता विळा चालवा, कारण पीक तयार झाले आहे. या, द्राक्षांचा घाणा तुडवा, कारण द्राक्षकुंडे भरली आहेत आणि कुंडे ओसंडून वाहत आहेत— कारण त्यांची दुष्टाई फार मोठी आहे!”
- योएल ३:१४सुमारे इ.स.पू. ८००
निर्णयाच्या खोर्यात लोकांची गर्दीच गर्दी आहे! कारण निर्णयाच्या खोऱ्यात याहवेहचा दिवस येऊन ठेपला आहे.
- योएल ३:१५सुमारे इ.स.पू. ८००
सूर्य व चंद्र काळे पडतील आणि तारे यापुढे प्रकाशणार नाही.
- योएल ३:१६सुमारे इ.स.पू. ८००
याहवेह सीयोनातून गर्जना करतील आणि यरुशलेमातून गडगडाट होईल; पृथ्वी व आकाश थरथर कापतील. परंतु याहवेह त्याच्या लोकांसाठी आश्रयस्थान आणि इस्राएल लोकांसाठी दुर्ग असतील.
- योएल ३:१७सुमारे इ.स.पू. ८००
“तेव्हा तुम्हाला कळून येईल की सीयोनात, माझ्या पवित्र पर्वतावर, राहणारा मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे. यरुशलेम पवित्र होईल; परकीय लोक तिच्यावर पुन्हा कधीही आक्रमण करणार नाहीत.
- योएल ३:१८सुमारे इ.स.पू. ८००
“त्या दिवशी नवीन द्राक्षारस पर्वतांवरून पाझरेल, आणि टेकड्यांवरून दूध वाहील; यहूदीयातील ओहोळांची कोरडी पात्रे पाण्याने भरून वाहतील आणि याहवेहच्या मंदिरातून एक झरा निघेल व तो शिट्टीमच्या खोर्यात पाणी पुरवेल.
- योएल ३:१९सुमारे इ.स.पू. ८००
इजिप्त देश उजाड होईल आणि एदोम देश ओसाड होईल, कारण त्यांनी यहूदीयाच्या लोकांवर अत्याचार केला त्यांच्या देशात त्यांनी निर्दोष रक्त पाडले आहे.
- योएल ३:२०सुमारे इ.स.पू. ८००
परंतु यहूदाह सदासर्वकाळ आणि यरुशलेम पिढ्यान् पिढ्या वसलेले राहील.