- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- आमोस २:१०सुमारे इ.स.पू. ७८७
अमोर्यांचा देश तुम्हाला द्यावा म्हणून मी तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले व चाळीस वर्षे तुम्हाला रानात चालविले.
- आमोस २:११सुमारे इ.स.पू. ७८७
“तुमच्या मुलांपैकी काहींना संदेष्टे म्हणून आणि तरुणांतील काहींना नाजीर होण्याकरिता वाढवले आहे. अहो इस्राएलच्या लोकांनो, हे खरे नाही काय?” असे याहवेह जाहीर करतात.
- आमोस २:१२सुमारे इ.स.पू. ७८७
“पण तुम्ही नाजीरांना द्राक्षारस पिण्यास आणि संदेष्ट्यांना भविष्य न सांगण्याची आज्ञा दिली.
- आमोस २:१३सुमारे इ.स.पू. ७८७
“म्हणून धान्याच्या पेंढ्यांखाली गच्च भरलेली गाडी जशी दबते, तसे मी तुम्हाला दाबेन आणि तुम्ही कण्हाल.
- आमोस २:१४सुमारे इ.स.पू. ७८७
चपळ निसटून जाणार नाहीत, शक्तिमानाला आपले सामर्थ्य लावता येणार नाही, आणि वीराला आपला जीव वाचविता येणार नाही.
- आमोस २:१५सुमारे इ.स.पू. ७८७
धनुर्धार्याला आपल्या भूमीवर उभे राहता येणार नाही, अत्यंत वेगाने धावणारा सैनिक सुटणार नाही, आणि घोडेस्वाराला आपला जीव वाचवता येणार नाही.
- आमोस २:१६सुमारे इ.स.पू. ७८७
वीरांपैकी महाधैर्यवानही त्या दिवशी वस्त्रे टाकून पळतील.” याहवेह असे जाहीर करतात.
- आमोस ३:१सुमारे इ.स.पू. ७८७
इस्राएलच्या लोकांनो, हे वचन ऐका, जे याहवेह तुमच्याविरुद्ध बोलले आहेत—त्या संपूर्ण घराण्याविरुद्ध आहे ज्यांना मी इजिप्तमधून बाहेर आणले आहे:
- आमोस ३:२सुमारे इ.स.पू. ७८७
“पृथ्वीवरील सर्व राष्ट्रातील लोकांमधून मी फक्त तुझीच निवड केली आहे; म्हणून तुझ्या सर्व पापांबद्दल मी तुला शिक्षा करेन.”
- आमोस ३:३सुमारे इ.स.पू. ७८७
दोन व्यक्ती एकमताचे झाल्यावाचून ते सोबत चालू शकतील काय?
- आमोस ३:४सुमारे इ.स.पू. ७८७
शिकार नसली तर सिंह गर्जना करेन काय? काही धरल्याशिवाय तो त्याच्या गुहेत गुरगुरणार काय?
- आमोस ३:५सुमारे इ.स.पू. ७८७
अमिष नसताना पक्षी भूमीवरील सापळ्यात अडकतो काय? जर सापळ्यात काही अडकले नसेल तर ते भूमीवरून उडेल काय?
- आमोस ३:६सुमारे इ.स.पू. ७८७
नगरात जेव्हा रणशिंगाचा आवाज येतो, तेव्हा लोक घाबरत नाही काय? शहरात विपत्ती आली तर, ती याहवेहने घडवून आणली नाही काय?
- आमोस ३:७सुमारे इ.स.पू. ७८७
सार्वभौम याहवेह आपल्या सेवक संदेष्ट्यांना त्याच्या योजना प्रकट केल्याशिवाय निश्चितच काहीही करणार नाही.
- आमोस ३:८सुमारे इ.स.पू. ७८७
सिंहाने गर्जना केली आहे— कोण भिणार नाही? सार्वभौम याहवेहने बोलले आहेत; तर मग संदेश दिल्यावाचून कोणी राहील काय?
- आमोस ३:९सुमारे इ.स.पू. ७८७
अश्दोदच्या गडांना आणि इजिप्तच्या गडांना ही घोषणा करा: “शोमरोनच्या पर्वतावर एकत्र व्हा; तिच्यामधील गोंधळ आणि तिच्या लोकांवरील अत्याचाराकडे पाहा.”
- आमोस ३:१०सुमारे इ.स.पू. ७८७
“जे योग्य ते कसे करावे हे त्यांना माहीत नाही,” याहवेह जाहीर करतात, “त्यांनी लुटलेला व चोरी केलेला माल त्यांच्या महालात कोणी साठवून ठेवला आहे.”
- आमोस ३:११सुमारे इ.स.पू. ७८७
यास्तव सार्वभौम याहवेह असे म्हणतात, “एक शत्रू जो तुमचा देश व्यापून टाकेल, तो तुमचे किल्ले कोसळून टाकेल आणि तुमचे गड लुटेल.”
- आमोस ३:१२सुमारे इ.स.पू. ७८७
याहवेह असे म्हणतात: “जसा मेंढपाळ सिंहाच्या तोंडातून केवळ दोन तंगड्या आणि कानाचा एक तुकडा सोडवितो, तसे शोमरोनातील इस्राएल लोक जे पलंगाच्या शीरपट्टीने आणि बिछान्यावरील रेशमी कापडाच्या तुकड्याने सोडविले जातील.”
- आमोस ३:१३सुमारे इ.स.पू. ७८७
“हे ऐका आणि याकोबाच्या घराण्याविरुद्ध साक्ष द्या,” असे याहवेह सर्वसमर्थ परमेश्वर म्हणतात:
- आमोस ३:१४सुमारे इ.स.पू. ७८७
“ज्या दिवशी मी इस्राएलला तिच्या पातकाबद्दल शिक्षा करेन, त्याच दिवशी मी बेथेलमधल्या वेद्यांचा नाश करेन; वेद्यांची शिंगे कापून टाकण्यात येतील आणि ती जमिनीवर पडतील.
- आमोस ३:१५सुमारे इ.स.पू. ७८७
मी ग्रीष्मकालीनघर आणि उष्मकालीनघर पाडून टाकेन; हस्तिदंताने सजविलेल्या घरांचा विध्वंस होईल भवने जमीनदोस्त होतील,” असे याहवेह जाहीर करतात.
- आमोस ४:१सुमारे इ.स.पू. ७८७
शोमरोनच्या डोंगरावर राहणार्या बाशानच्या गाईंनो हे वचन ऐका, तुम्ही स्त्रिया, ज्या तुम्ही गरिबांवर अत्याचार करता आणि गरजवंतांना चिरडता आणि आपल्या नवर्यांना म्हणता, “आम्हाला काही पेय आणा!”
- आमोस ४:२सुमारे इ.स.पू. ७८७
सार्वभौम याहवेहने आपल्या पवित्रतेची शपथ घेऊन म्हटले आहे: “खचितच अशी वेळ येईल जेव्हा तुम्हाला आकड्यांनी आणि तुमच्यातील शिल्लक राहिलेल्यांना मासे धरण्याच्या गळांनी ओढून नेतील.
- आमोस ४:३सुमारे इ.स.पू. ७८७
तुमच्यातील प्रत्येक भिंतीच्या भगदाडातून सरळ निघून जाल. तुम्ही हर्मोनात आपणाला टाकाल.” असे याहवेह म्हणतात.