मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आमोस ५:१६सुमारे इ.स.पू. ७८७

    यास्तव प्रभू, याहवेह सर्वसमर्थ परमेश्वर असे म्हणतात: “सर्व रस्त्यांवर विलाप होईल आणि प्रत्येक चौकात आक्रंदन होईल. तुमच्याबरोबर शोक करण्यासाठी शेतकर्‍यांनाही बोलाविले जाईल; रडण्यासाठी शोक करणार्‍यांना बोलाविले जाईल.

  2. आमोस ५:१७सुमारे इ.स.पू. ७८७

    प्रत्येक द्राक्षमळ्यामध्ये आक्रंदन होईल, कारण मी तुमच्यामधून जाईन,” असे याहवेह म्हणतात.

  3. आमोस ५:१८सुमारे इ.स.पू. ७८७

    जे याहवेहच्या दिवसाची इच्छा बाळगतात त्यांच्या धिक्कार असो! तुम्ही याहवेहच्या दिवसाची इच्छा का बाळगता? कारण तो दिवस प्रकाशाचा नाही तर अंधाराचा असेल.

  4. आमोस ५:१९सुमारे इ.स.पू. ७८७

    जसे काय एखादा मनुष्य सिंहापासून पळाला आणि त्याला अस्वलाने गाठले, किंवा जसे काय आपल्या घरात येऊन त्याने हात भिंतीला टेकविला आणि त्याला साप चावला.

  5. आमोस ५:२०सुमारे इ.स.पू. ७८७

    याहवेहचा दिवस हा प्रकाशाचा नसून अंधकाराचा दिवस असेल; गडद अंधकार, प्रकाशाचा एकही किरण नसेल?

  6. आमोस ५:२१सुमारे इ.स.पू. ७८७

    “मला तुमच्या धार्मिक उत्सवांचा तिरस्कार वाटतो; तुमच्या सभा माझ्यासाठी दुर्गंधीप्रमाणे आहेत.

  7. आमोस ५:२२सुमारे इ.स.पू. ७८७

    तुमची गोऱ्ह्यांची होमार्पणे व उपकारस्तुतीची अर्पणे आणली तरीही मी स्वीकारणार नाही. तुमच्या उत्तम शांत्यर्पणामुळे मी संतुष्ट होणार नाही.

  8. आमोस ५:२३सुमारे इ.स.पू. ७८७

    तुमच्या गीतांचा गोंगाट माझ्यापासून दूर ठेवा! मी तुमच्या वीणांचे संगीत ऐकणार नाही.

  9. आमोस ५:२४सुमारे इ.स.पू. ७८७

    परंतु न्याय नदीप्रमाणे व नीतिमत्ता प्रचंड लोंढ्याप्रमाणे वाहू द्या!

  10. आमोस ५:२५सुमारे इ.स.पू. ७८७

    “अहो इस्राएल लोकहो, रानात असताना चाळीस वर्षे तुम्ही मला अर्पणे आणली व होम केले काय?

  11. आमोस ५:२६सुमारे इ.स.पू. ७८७

    तुम्ही तुमच्या राजाचा देव्हारा, तुमच्या काइवान मूर्तीची बैठक, तुमच्या दैवताचा तारा उंचाविला; जो तुम्ही तुमच्यासाठी बनविला.

  12. आमोस ५:२७सुमारे इ.स.पू. ७८७

    म्हणून मी तुम्हाला, दिमिष्कच्या पलीकडे बंदिवासात पाठवेन,” असे याहवेह म्हणतात, ज्यांचे नाव सर्वसमर्थ परमेश्वर आहे.

  13. आमोस ६:१सुमारे इ.स.पू. ७८७

    तुम्ही जे सीयोनेत आरामात राहता, आणि शोमरोनच्या पर्वतावर निश्चिंत असण्याचा विचार करता की तुम्ही जे राष्ट्रातील मुख्य लोक आहात, ज्यांच्याजवळ इस्राएलचे लोक येतात, त्या तुमचा धिक्कार असो!

  14. आमोस ६:२सुमारे इ.स.पू. ७८७

    कालनेह येथे जा आणि तिला पाहा; तिथून महान हमाथास जा, आणि तिथून खाली पलिष्ट्यांच्या गथ येथे जा. हे तुमच्या दोन राज्याहून अधिक उत्तम आहेत काय? त्यांचा देश तुमच्या देशाहून मोठा आहे काय?

  15. आमोस ६:३सुमारे इ.स.पू. ७८७

    तुम्ही विपत्तीचे दिवस बाजूला सारता, आणि दहशतीचे राज्य जवळ आणता.

  16. आमोस ६:४सुमारे इ.स.पू. ७८७

    तुम्ही हस्तिदंतांनी सजविलेल्या पलंगावर लोळता; आणि तुम्ही अंथरुणावर पडून राहतात. उत्तम कोकरे आणि चरबीयुक्त वासरे खाता.

  17. आमोस ६:५सुमारे इ.स.पू. ७८७

    तुम्ही वीणेच्या सुरावर निरर्थक गाणी गाता, आणि दावीदासारखे आहोत याची भ्रामक कल्पना करता.

  18. आमोस ६:६सुमारे इ.स.पू. ७८७

    तुम्ही वाट्या भरून द्राक्षारस पिता. उत्तम तेलांनी स्वतःला माखता, परंतु तुम्ही योसेफाच्या नाशाबद्दल दुःख करत नाही.

  19. आमोस ६:७सुमारे इ.स.पू. ७८७

    म्हणून तुम्ही प्रथम बंदिवासात जाल; आणि तुमची चैनबाजी आणि मौज मस्ती नाहीशी होईल.

  20. आमोस ६:८सुमारे इ.स.पू. ७८७

    सार्वभौम याहवेहनी स्वतः शपथ घेतली आहे—याहवेह सर्वसमर्थ परमेश्वर घोषणा करतात: “याकोबाच्या गर्वाचा मी तिरस्कार करतो आणि त्यांचे किल्ले मी घृणास्पद मानतो; मी या शहराला आणि तिच्यातील सर्वकाही शत्रूंच्या हाती देईन.”

  21. आमोस ६:९सुमारे इ.स.पू. ७८७

    जर एका घरात फक्त दहाच लोक उरले असले तरीही ते सर्व मरतील.

  22. आमोस ६:१०सुमारे इ.स.पू. ७८७

    आणि मृतदेह जाळण्यासाठी घरातून बाहेर काढायला आलेल्या त्याच्या नातेवाईकांनी तिथे लपून बसलेल्या कोणाला विचारले तर तुझ्यासोबत आणखी कोणी आहे काय? आणि तो म्हणेल, “नाही,” तो त्याला पुढे म्हणेल, “गप्प राहा, याहवेहचे नाव घेऊ नको.”

  23. आमोस ६:११सुमारे इ.स.पू. ७८७

    कारण याहवेहने अशी आज्ञा दिली आहे, आणि ते मोठ्या घरांचे तुकडे तुकडे आणि लहान घरांना चक्काचूर करतील.

  24. आमोस ६:१२सुमारे इ.स.पू. ७८७

    घोडे खडकाळ कडांवर पळतात काय? बैल घेऊन कोणी समुद्र नांगरतो काय? पण तुम्ही न्यायाला विषामध्ये आणि नीतिमत्तेच्या फळाला कडवटपणामध्ये बदलले आहे;

  25. आमोस ६:१३सुमारे इ.स.पू. ७८७

    लो-देबारला आपल्या ताब्यात घेण्यात तुम्ही आनंद मानता आणि म्हणता, “आम्ही स्वतःच्या बळाने करनाईम घेतला नाही काय?”