- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- आमोस ८:८सुमारे इ.स.पू. ७८७
“यामुळे पृथ्वी थरथर कापणार नाही काय, आणि तिच्यात राहणारे सर्व शोक करणार नाहीत काय? संपूर्ण पृथ्वी नाईल नदीसारखी उठेल; ती नील नदीप्रमाणे खवळेल आणि मग इजिप्तच्या नदीप्रमाणे बुडून जाईल.
- आमोस ८:९सुमारे इ.स.पू. ७८७
“त्या दिवशी,” सार्वभौम याहवेह घोषणा करतात, “दुपारच्या वेळी मी सूर्यास्त करेन आणि भरदिवसा पृथ्वीला अंधकारमय करेन.
- आमोस ८:१०सुमारे इ.स.पू. ७८७
मी तुमचे धार्मिक उत्सव शोकामध्ये उलटवेन आणि तुमची सर्व गीते विलापात बदलून टाकीन. मी तुम्हा सर्वांना गोणपाट घालेन आणि तुमचे मुंडण करेन. मी तो काळ एकुलत्या एक मुलासाठी विलाप करण्यासारखा आणि त्याचा शेवट कडू दिवसासारखा करेन.
- आमोस ८:११सुमारे इ.स.पू. ७८७
“असे दिवस येत आहेत,” सार्वभौम याहवेह घोषित करतात, “मी देशावर दुष्काळ आणेन— तो अन्नाचा दुष्काळ किंवा पाण्याची तहान नव्हे, तर याहवेहचे वचन ऐकण्याचा दुष्काळ पाडेन—
- आमोस ८:१२सुमारे इ.स.पू. ७८७
आणि लोक याहवेहच्या वचनाच्या शोधात समुद्रापासून समुद्रापर्यंत आणि उत्तरेपासून पूर्वेकडे भटकतील, पण त्यांना ते सापडणार नाही.
- आमोस ८:१३सुमारे इ.स.पू. ७८७
“त्या दिवसात “तहानेने व्याकूळ होऊन सुंदर कुमारी आणि उमदे तरुण निस्तेज होऊन जातील.
- आमोस ८:१४सुमारे इ.स.पू. ७८७
जे शोमरोनच्या पापाची शपथ घेतात; जे म्हणतात, ‘हे दान, तुझ्या दैवतेची शपथ’ किंवा ‘बेअर-शेबाच्या दैवतेची शपथ,’— ते असे पडतील की पुन्हा कधीही उठणार नाहीत.”
- आमोस ९:१सुमारे इ.स.पू. ७८७
मी प्रभूला वेदीजवळ उभे असलेले पाहिले आणि ते म्हणाले: “खांबांच्या वरच्या भागावर प्रहार करा म्हणजे उंबरठे हलतील. आणि ते सर्व लोकांच्या डोक्यावर खाली पाड; जे त्यातून वाचतील त्यांना मी तलवारीने मारून टाकीन. एक सुद्धा वाचणार नाही, कोणीही निसटणार नाही.
- आमोस ९:२सुमारे इ.स.पू. ७८७
खोल खणीत ते अधोलोकापर्यंत जाऊन पोहोचले, तरी तिथे जाऊन माझ्या हात त्यांना वर ओढून आणेन; वर चढत ते आकाशापर्यंत आले, तरी तिथूनही मी त्यांना खाली आणेन.
- आमोस ९:३सुमारे इ.स.पू. ७८७
कर्मेल पर्वताच्या शिखरावर ते लपून राहिले, तरी मी त्यांची शिकार करून त्यांना पकडेन. ते महासागराच्या तळाशी माझ्या दृष्टिआड लपून बसले तरी, मी सर्पाला त्यांना चावा घेण्याची आज्ञा देईन.
- आमोस ९:४सुमारे इ.स.पू. ७८७
जरी शत्रूंनी त्यांना कैद करून बंदिवासात नेले, तरी मी तलवारीला त्यांना ठार मारण्याची आज्ञा देईन. “मी त्यांच्यावर माझी नजर ठेवेन ती तर हानीसाठी असणार भल्यासाठी नाही.”
- आमोस ९:५सुमारे इ.स.पू. ७८७
प्रभू, सेनाधीश याहवेह— भूमीला स्पर्श करतात आणि ती विरघळून जाते, आणि त्यामध्ये राहणारे सर्व लोक शोक करतात. संपूर्ण देश नाईल नदीसारखा वर येतो आणि इजिप्तच्या नदीप्रमाणे खाली बुडतो;
- आमोस ९:६सुमारे इ.स.पू. ७८७
ते आकाशात आपले भव्य राजवाडे बांधतात आणि त्याचा पाया पृथ्वीवर ठेवतात; ते समुद्राच्या पाण्याला बोलवितात आणि ते पृथ्वीच्या पृष्ठभागावर ओततात; याहवेह हे त्यांचे नाव आहे.
- आमोस ९:७सुमारे इ.स.पू. ७८७
“तुम्ही इस्राएली लोक माझ्यासाठी कूशी लोकांसारखेच नाहीत काय?” असे याहवेह घोषित करतात. “मी इस्राएल लोकांना इजिप्त देशातून, पलिष्ट्यांना कफतोरातून आणि अरामी लोकांना कीर देशातून बाहेर काढले नाही काय?
- आमोस ९:८सुमारे इ.स.पू. ७८७
“खचितच, सार्वभौम याहवेहची दृष्टी या पापी राज्यावर आहे. आणि मी त्यांचा पृथ्वीच्या पृष्ठभागावरून नाश करेन; तरीसुद्धा मी याकोबाच्या संतानांचा कायमचा नाश करणार नाही,” असे याहवेह घोषित करतात.
- आमोस ९:९सुमारे इ.स.पू. ७८७
“तर पाहा, मी आज्ञा करेन आणि जसे चाळणीने धान्य चाळावे त्याप्रमाणे इस्राएलला इतर राष्ट्रांनी चाळावे, पण त्याचा एक खडाही भूमीवर पडणार नाही.
- आमोस ९:१०सुमारे इ.स.पू. ७८७
माझ्या लोकांतील जे सर्व पापी म्हणतात, ‘संकटे आमच्यावर येणार नाही वा आम्हाला गाठणार नाहीत, ते तलवारीने मरतील.’
- आमोस ९:११सुमारे इ.स.पू. ७८७
“त्या दिवशी “दावीदाचा पतन झालेला आश्रय मी पुनर्स्थापित करेन; मी तिची तुटलेली तटबंदी दुरुस्त करेन, आणि तिचे अवशेष दुरुस्त करेन— आणि पूर्वीसारखीच तिची पुनर्बांधणी करेन,
- आमोस ९:१२सुमारे इ.स.पू. ७८७
यासाठी की त्यांनी एदोमच्या अवशेषांवर व माझे नाव धारण करणार्या सर्व राष्ट्रांचा ताबा घ्यावा,” ही कार्ये करणारे याहवेह ही घोषणा करतात.
- आमोस ९:१३सुमारे इ.स.पू. ७८७
“ते दिवस येत आहेत,” याहवेह जाहीर करतात, “जेव्हा नांगरणारा कापणी करणार्याला आणि द्राक्षे तुडविणारा बी पेरणार्याला मागे टाकेल. नवीन द्राक्षारस पर्वतांवरून गळू लागेल आणि ते सर्व टेकड्यांवरून वाहू लागेल,
- आमोस ९:१४सुमारे इ.स.पू. ७८७
मी माझ्या इस्राएली लोकांना बंदिवासातून परत आणेन. “ते त्यांच्या उद्ध्वस्त झालेल्या नगरांची पुनर्बांधणी करून त्यात राहतील. ते द्राक्षमळे लावतील आणि त्याचा द्राक्षारस पितील; ते बागा लावतील आणि त्याची फळे खातील.
- आमोस ९:१५सुमारे इ.स.पू. ७८७
मी इस्राएलला त्यांच्या स्वतःच्या भूमीमध्ये पेरीन, मी त्यांना दिलेल्या भूमीतून त्यांना पुन्हा उपटून टाकण्यात येणार नाही.” असे याहवेह तुमचे परमेश्वर म्हणतात.
- ओबद्याह १:१सुमारे इ.स.पू. ५८७
ओबद्याहचा दृष्टान्त हा. एदोमाबद्दल सार्वभौम याहवेह असे म्हणतात; आम्ही याहवेहकडून हा संदेश ऐकला: राष्ट्रांना सांगण्यासाठी एक दूत पाठविण्यात आला होता, “उठा, आपण तिच्याविरुद्ध युद्ध करण्यास जाऊ.”
- ओबद्याह १:२सुमारे इ.स.पू. ५८७
“पाहा, राष्ट्रांमध्ये मी तुला लहान करेन; तुझा पूर्णपणे तिरस्कार करण्यात येईल.
- ओबद्याह १:३सुमारे इ.स.पू. ५८७
तुमच्या अंतःकरणाच्या गर्विष्ठपणाने तुमची फसवणूक केली आहे, तुम्ही जे खडकांच्या कपारीत राहता आणि तुमचे घर उंचावर बांधता, तुम्ही जे स्वतःला म्हणता, ‘मला खाली जमिनीवर कोण आणू शकेल?’