मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ओबद्याह १:४सुमारे इ.स.पू. ५८७

    तू गरुडांप्रमाणे उंच भरार्‍या मारीत असलास किंवा आपले घरटे तार्‍यांमध्ये बांधत असलास, तरी तिथून मी तुला खाली आणेन,” असे याहवेह जाहीर करतात.

  2. ओबद्याह १:५सुमारे इ.स.पू. ५८७

    “जरी तुमच्याकडे चोर आले, जरी रात्री लुटारू आले तर पाहा, संकट कसे तुमची वाट पाहत आहे! त्यांना हवे तेवढेच चोरत नाहीत काय? जर द्राक्ष वेचणारे तुमच्याकडे आले, तर ते थोडी द्राक्षे सोडणार नाहीत काय?

  3. ओबद्याह १:६सुमारे इ.स.पू. ५८७

    परंतु एसावला लुटण्यात येईल, आणि त्याचा गुप्त खजिना हस्तगत केला जाईल!

  4. ओबद्याह १:७सुमारे इ.स.पू. ५८७

    तुझ्यासोबत करार केलेले सर्व मित्र राष्ट्रे तुला तुझ्या सीमेपर्यंत ढकलतील; तुझे मित्र तुला फसवतील आणि तुझा ताबा घेतील; जे तुझी भाकरी खातात, तेच तुझ्यासाठी सापळा रचतील, परंतु तुला ते कळणारही नाही.”

  5. ओबद्याह १:८सुमारे इ.स.पू. ५८७

    याहवेह असे जाहीर करतात, “त्या दिवशी, मी एदोमच्या ज्ञानी पुरुषांचा, एसावच्या डोंगरावर जे समजूतदार आहेत, त्यांचा नाश करणार नाही काय?

  6. ओबद्याह १:९सुमारे इ.स.पू. ५८७

    तेमान, तुझे योद्धे घाबरून जातील, आणि एसावाच्या डोंगरांमध्ये असलेला प्रत्येकजण कापला जाईल.

  7. ओबद्याह १:१०सुमारे इ.स.पू. ५८७

    तुझा भाऊ याकोब याच्यावर केलेल्या अत्याचारामुळे, तू लाजेने झाकून जाशील; आणि तुझा कायमचा नाश करण्यात येईल.

  8. ओबद्याह १:११सुमारे इ.स.पू. ५८७

    अनोळखी लोकांनी जेव्हा त्याची संपत्ती पळवून नेली त्या दिवशी तू अलिप्त राहिला आणि परदेशी लोक त्याच्या वेशीत शिरले आणि यरुशलेमसाठी चिठ्ठ्या टाकल्या, तेव्हा तू त्यांच्यापैकी एक होतास.

  9. ओबद्याह १:१२सुमारे इ.स.पू. ५८७

    आपल्या भावाच्या दुःखाच्या दिवशी त्याच्याबद्दल आनंद करू नकोस, किंवा यहूदीयाच्या रहिवाशांवर आनंद मानू नकोस, त्यांच्या संकटाच्या दिवशी अधिक गर्व करू नकोस.

  10. ओबद्याह १:१३सुमारे इ.स.पू. ५८७

    तुम्ही माझ्या लोकांच्या संकटाच्या दिवशी माझ्या लोकांच्या नगरात प्रवेश करू नका, किंवा त्यांच्या आपत्तीच्या दिवशी त्यावर आनंद करू नका, किंवा त्यांच्या विपत्तीच्या दिवशी. त्यांच्या संपत्तीवर ताबा मिळवू नका.

  11. ओबद्याह १:१४सुमारे इ.स.पू. ५८७

    त्यांच्या फरार झालेल्यांना मारण्यासाठी चौकात उभा राहू नको किंवा त्यांच्या संकटाच्या वेळी त्यांच्या शत्रूच्या स्वाधीन करू नको.

  12. ओबद्याह १:१५सुमारे इ.स.पू. ५८७

    “सर्व राष्ट्रांसाठी नेमलेला याहवेहचा दिवस जवळ आला आहे. जसे तू केलेस, तसे तुझ्यासोबतही केले जाईल होईल; तुझ्याद्वारे करण्यात आलेली दुष्कर्मे तुझ्याच माथ्यावर उलटतील.

  13. ओबद्याह १:१६सुमारे इ.स.पू. ५८७

    जसा तू माझ्या पवित्र पर्वतावर प्याला, तसेच सर्व राष्ट्रे सतत पीत राहतील; ते पितील आणि पीत राहतील आणि जसे ते कधीच नव्हते तसे बनतील.

  14. ओबद्याह १:१७सुमारे इ.स.पू. ५८७

    पण सीयोन पर्वतावर तारण होईल; ते पवित्र होईल, आणि याकोबास त्याचे वतन मिळेल.

  15. ओबद्याह १:१८सुमारे इ.स.पू. ५८७

    याकोब अग्नीसारखा आणि योसेफ ज्वालासारखे असतील; एसाव उरलेल्या भुशासारखे होतील, आणि ते त्यांना जाळून नष्ट करतील. एसावच्या वंशजांपैकी कोणीही जिवंत राहणार नाही.” याहवेहने हे म्हटले आहे.

  16. ओबद्याह १:१९सुमारे इ.स.पू. ५८७

    एसावाचा पर्वत दक्षिणेतील लोक ताब्यात घेतील, आणि पलिष्टी लोकांच्या देशाला डोंगराच्या पायथ्याशी राहणारे आपल्या ताब्यात घेतील. ते एफ्राईम आणि शोमरोनच्या भूमीचा ताबा घेतील आणि बिन्यामीन गिलआद प्रांत व्यापून घेतील.

  17. ओबद्याह १:२०सुमारे इ.स.पू. ५८७

    बंदिवान इस्राएल लोकांचा हा गट, जो कनानमध्ये आहे, तो कनानी लोकांचा सारेफथपर्यंतचा प्रदेश ताब्यात घेतील; यरुशलेमेचे बंदिवान, जे सफारदात शहरात आहेत, ते नेगेवची शहरे ताब्यात घेतील.

  18. ओबद्याह १:२१सुमारे इ.स.पू. ५८७

    सुटका करणारे एसाव पर्वतावर राज्य करण्यासाठी सीयोन पर्वतावर चढतील. आणि ते याहवेहचे राज्य असेल.

  19. योनाह १:१सुमारे इ.स.पू. ८६२

    याहवेहचे वचन अमित्तयाचा पुत्र योनाहकडे आले:

  20. योनाह १:२सुमारे इ.स.पू. ८६२

    “महान शहर निनवेहस जा आणि त्याविरुद्ध संदेश दे, कारण त्यांची दुष्टाई माझ्यासमोर आली आहे.”

  21. योनाह १:३सुमारे इ.स.पू. ८६२

    परंतु योनाह याहवेहपासून पळाला आणि तार्शीशला गेला. तो पुढे खाली याफो येथे गेला, तिथे त्याला त्या बंदरात बांधलेले एक जहाज सापडले. भाडे दिल्यानंतर, तो जहाजावर चढला आणि याहवेहपासून पळून जाण्यासाठी तार्शीशकडे जहाजाचा प्रवास प्रारंभ गेला.

  22. योनाह १:४सुमारे इ.स.पू. ८६२

    मग याहवेहने समुद्रावर एक प्रचंड वारा सोडला आणि इतके भयंकर वादळ उठले की जहाज फुटण्याचे भय उद्भवले.

  23. योनाह १:५सुमारे इ.स.पू. ८६२

    सर्व खलाशी घाबरले आणि प्रत्येकजण आपआपल्या दैवतांचा धावा करू लागला. आणि जहाजाचा भार कमी व्हावा म्हणून त्यांनी जहाजात भरलेले साहित्य समुद्रात टाकण्यास सुरुवात केली. पण योनाह मात्र जहाजाच्या तळघरात अगदी गाढ झोपला होता.

  24. योनाह १:६सुमारे इ.स.पू. ८६२

    तेव्हा जहाजाचा कप्तान खाली तळघरात त्याच्याकडे गेला आणि म्हणाला, “अशा वेळी तू कसा झोपू शकतोस? चल, ऊठ आणि तुझ्या दैवताला हाक मार आणि ते आपल्याकडे लक्ष देतील व कृपा करतील म्हणजे आपला नाश होणार नाही.”

  25. योनाह १:७सुमारे इ.स.पू. ८६२

    तेव्हा खलाशी एकमेकांना म्हणाले, “आपण चिठ्ठ्या टाकून कोणामुळे हे संकट आले आहे ते शोधू या.” मग त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या आणि योनाहच्या नावाने चिठ्ठी निघाली.