- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- आमोस ६:१४सुमारे इ.स.पू. ७८७
याहवेह, सर्वसमर्थ परमेश्वर जाहीर करतात, “हे इस्राएला, मी तुझ्याविरुद्ध एक राष्ट्र उठवेन, लेबो हमाथपासून अराबाच्या ओहोळापर्यंत ते तुझ्यावर जुलूम करेल.”
- आमोस ७:१सुमारे इ.स.पू. ७८७
सार्वभौम याहवेहने मला जे दाखविले, ते हे आहे: जेव्हा राजाच्या पिकांची कापणी झाली आणि पुढचे पीक येणार होते, तेव्हा याहवेह टोळांची एक प्रचंड झुंड तयार करीत होते.
- आमोस ७:२सुमारे इ.स.पू. ७८७
जेव्हा त्यांनी जमीन साफ केली, तेव्हा मी मोठ्याने ओरडलो, “सार्वभौम याहवेह, क्षमा करा! याकोब कसा टिकू शकेल? तो फार लहान आहे!”
- आमोस ७:३सुमारे इ.स.पू. ७८७
तेव्हा याहवेहचे मन द्रवले, “पुन्हा हे घडणार नाही,” याहवेह असे म्हणाले.
- आमोस ७:४सुमारे इ.स.पू. ७८७
सार्वभौम याहवेहने हे मला दाखविले: सार्वभौम याहवेहने अग्नीला न्याय करण्यास बोलाविले; त्यांनी खोल समुद्र कोरडा केला आहे आणि त्यांनी भूमी गिळंकृत केली आहे.
- आमोस ७:५सुमारे इ.स.पू. ७८७
तेव्हा मी म्हणालो, “अहो सार्वभौम याहवेह, मी तुम्हाला विनंती करतो, थांबा! याकोब कसा वाचेल? तो फार लहान आहे!”
- आमोस ७:६सुमारे इ.स.पू. ७८७
मग याहवेहचे मन द्रवले. आणि सार्वभौम याहवेह म्हणाले, “हे देखील घडणार नाही.”
- आमोस ७:७सुमारे इ.स.पू. ७८७
त्यांनी मला हे दाखविले: ओळंबा लावून बांधलेल्या एका भिंतीच्या जवळ, प्रभू हातात ओळंबा घेऊन उभे होते.
- आमोस ७:८सुमारे इ.स.पू. ७८७
आणि याहवेहने मला विचारले, “आमोस, तुला काय दिसते?” मी म्हणालो, “ओळंबा!” नंतर प्रभू म्हणाले, “पाहा मी माझे लोक इस्राएल यांच्यामध्ये ओळंबा धरणार आहे; यापुढे मी त्यांची गय करणार नाही.
- आमोस ७:९सुमारे इ.स.पू. ७८७
“इसहाकाचे उच्च पूजास्थाने नाश करण्यात येतील आणि इस्राएलची पवित्रस्थाने पाडण्यात येतील; मी माझ्या तलवारीने यरोबोअमाच्या विरुद्ध उठेन.”
- आमोस ७:१०सुमारे इ.स.पू. ७८७
तेव्हा बेथेलचा याजक, अमस्याहने इस्राएलचा राजा यरोबोअमाला हा निरोप पाठविला: आमोस इस्राएलच्या हृदयात तुमच्याविरुद्ध कट रचीत आहे. त्याचेही सर्व शब्द देशासाठी असह्य आहेत.
- आमोस ७:११सुमारे इ.स.पू. ७८७
कारण आमोस असे म्हणत आहे: “ ‘यरोबोअम हा तलवारीने मरणार आहे, आणि इस्राएल खात्रीने, आपल्या भूमीवरून दूर बंदिवासात जाईल.’ ”
- आमोस ७:१२सुमारे इ.स.पू. ७८७
नंतर अमस्याह आमोसला म्हणाला, “हे संदेष्ट्या, येथून यहूदीया प्रांतात परत जा आणि तिथे जाऊन आपली भाकर कमव आणि तुझे संदेश तिथे सांगत राहा!
- आमोस ७:१३सुमारे इ.स.पू. ७८७
याच्यापुढे बेथेल येथे संदेश देऊ नकोस, कारण हे राजकीय भवन आहे आणि राज्याचे मंदिर आहे.”
- आमोस ७:१४सुमारे इ.स.पू. ७८७
आमोसने अमस्याहला उत्तर दिले, “मी तर संदेष्टा नाही आणि मी संदेष्ट्याचा पुत्रही नाही, मी तर मेंढपाळ आणि उंबरांच्या झाडांची निगा राखणारा होतो.
- आमोस ७:१५सुमारे इ.स.पू. ७८७
परंतु मी गुरांची राखण करीत असताना याहवेहने मला दूर नेले आणि मला म्हणाले, ‘जा, आणि माझ्या इस्राएली लोकांना संदेश सांग.’
- आमोस ७:१६सुमारे इ.स.पू. ७८७
म्हणून आता तुम्ही याहवेहचे वचन ऐका, व तुम्ही म्हणतात, “ ‘इस्राएलविरुद्ध भविष्यवाणी करू नकोस, आणि इसहाकाच्या घराण्याविरुद्ध प्रचार करणे थांबव.’
- आमोस ७:१७सुमारे इ.स.पू. ७८७
“म्हणून याहवेह असे म्हणतात: “ ‘तुझी पत्नी शहरात वेश्या होईल, तुझे पुत्र व कन्या तलवारीने मरतील, तुझी जमीन मोजण्यात येईल आणि सूत्राने विभागली जाईल, आणि तू स्वत: अपवित्र देशात मरशील. इस्राएलचे लोक निश्चितच आपल्या देशातून दूर बंदिवासात गुलाम म्हणून जातील.’ ”
- आमोस ८:१सुमारे इ.स.पू. ७८७
सार्वभौम याहवेहने मला हे दाखविले: पिकलेल्या फळांनी भरलेली एक टोपली दाखविली.
- आमोस ८:२सुमारे इ.स.पू. ७८७
“आमोसा, तुला काय दिसते?” त्यांनी विचारले. मी उत्तर दिले, “मला पिकलेल्या फळांची एक टोपली दिसते.” मग याहवेह मला म्हणाले, “माझ्या इस्राएली लोकांचा समय परिपक्व झाला आहे; मी त्यांची गय करणार नाही.”
- आमोस ८:३सुमारे इ.स.पू. ७८७
सार्वभौम याहवेह घोषित करतात, “त्या दिवशी, मंदिरातील त्यांचे गीत मी आकांतात बदलेन. सर्वत्र अनेक मृतदेह मौन धरून पडलेली असतील!”
- आमोस ८:४सुमारे इ.स.पू. ७८७
जे तुम्ही गरजवंतांना तुडवितात आणि देशाच्या गरिबांना दूर लोटता,
- आमोस ८:५सुमारे इ.स.पू. ७८७
असे म्हणता, “अमावस्या केव्हा निघून जाईल म्हणजे आम्ही धान्य विकू शकू? आणि शब्बाथ केव्हा निघून जाईल, म्हणजे आम्ही धान्याचे कोठार उघडू?” तराजूत लबाडी करून, लबाडीच्या मापाने, किंमत वाढवू.
- आमोस ८:६सुमारे इ.स.पू. ७८७
म्हणजे चांदीच्या मापात गरिबांना आणि पायतणाच्या एका जोडीसाठी गरजूंना विकत घेऊ, आणि गव्हाचा भुसाही विकायचा.
- आमोस ८:७सुमारे इ.स.पू. ७८७
याकोबाचे वैभव असलेले याहवेह यांनी स्वतःची शपथ घेऊन सांगितले आहेः “मी त्यांनी जे केले ते कधीही विसरणार नाही!