- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- आमोस ४:४सुमारे इ.स.पू. ७८७
“बेथेलास जा आणि पाप करा; गिलगालास जाऊन आणि अधिक पाप करा. रोज सकाळी आपली अर्पणे, दर तीन वर्षांनी आपला दशांश आणा.
- आमोस ४:५सुमारे इ.स.पू. ७८७
उपकारस्तुती म्हणून खमिराची भाकरी जाळून टाका आणि तुमच्या स्वैच्छिक अर्पणांची फुशारकी मारा; इस्राएली लोकहो तुम्ही याविषयी बढाई मिरवा, कारण असेच करणे तुम्हाला आवडते.” असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
- आमोस ४:६सुमारे इ.स.पू. ७८७
“मी तुम्हाला प्रत्येक शहरात उपाशी पोटी ठेवले आणि प्रत्येक नगरात भाकरीची कमतरता केली, तरीही तुम्ही मजकडे वळला नाही.” असे याहवेह जाहीर करतात.
- आमोस ४:७सुमारे इ.स.पू. ७८७
“हंगामाच्या आधी तीन महिने मी पाऊस रोखून धरला. मी एका नगरावर पाऊस पाडला, पण दुसर्यावर पाडला नाही. एका शेतावर पाऊस पडला; दुसर्या शेतावर पाऊस नव्हता आणि ते सुकून गेले.
- आमोस ४:८सुमारे इ.स.पू. ७८७
पाण्यासाठी लोक नगरोनगरी भटकले परंतु त्यांना पिण्यास पुरेसे मिळाले नाही, तरीही तुम्ही मजकडे वळला नाही.” असे याहवेह जाहीर करतात.
- आमोस ४:९सुमारे इ.स.पू. ७८७
“मी तुमच्या शेतांवर व द्राक्षमळ्यांवर तांबेरा आणि भेरड हे रोग पाठविले; टोळांनी तुमची अंजिराची व जैतुनाची झाडे खाऊन टाकली, आणि तरीही तुम्ही माझ्याकडे वळला नाही,” असे याहवेह जाहीर करतात.
- आमोस ४:१०सुमारे इ.स.पू. ७८७
“इजिप्तमध्ये पाठविल्या तशा पीडा मी तुमच्यामध्ये पाठविल्या. मी तुमच्या तरुणांना तुमच्या लुटलेल्या घोड्यांसहित तलवारीने मारून टाकले. तुमच्या छावणीतील दुर्गंध तुमच्या नाकात भरला, तरीही तुम्ही माझ्याकडे वळला नाही,” असे याहवेह जाहीर करतात.
- आमोस ४:११सुमारे इ.स.पू. ७८७
“तुमच्यातील काहींचा नाश असा केला जसा मी, परमेश्वराने, सदोम आणि गमोराचा केला. तुम्ही अग्नीच्या भट्टीतून ओढून काढलेल्या जळत्या काठीप्रमाणे होता, तरीही तुम्ही माझ्याकडे वळला नाही,” असे याहवेह जाहीर करतात.
- आमोस ४:१२सुमारे इ.स.पू. ७८७
“म्हणून हे इस्राएला, मी तझ्यासोबत असेच करणार आहे, कारण मी तुझ्याशी असे करणार आहे, म्हणून तुझ्या परमेश्वराला भेटण्यास तयार हो.”
- आमोस ४:१३सुमारे इ.स.पू. ७८७
ज्यांनी पर्वतांची रचना केली, ज्यांनी वारे निर्माण केले, आणि जे आपले विचार मानवजातीला प्रकट करतात, जे प्रभात समयाला अंधकारात बदलतात आणि पर्वताला आपल्या पायाखाली तुडवितात; याहवेह सर्वसमर्थ परमेश्वर, हे त्यांचे नाव आहे.
- आमोस ५:१सुमारे इ.स.पू. ७८७
हे इस्राएला, या वचनास ऐक, मी तुझ्याबद्दल विलाप करतो:
- आमोस ५:२सुमारे इ.स.पू. ७८७
“इस्राएलची कुमारी पडली आहे, ती पुन्हा कधीही उठणार नाही, तिच्या स्वतःच्या भूमीत उजाड आहे, तिला उठविणारा कोणीही नाही.”
- आमोस ५:३सुमारे इ.स.पू. ७८७
कारण सार्वभौम याहवेह इस्राएलास असे म्हणतात: “तुमच्या शहरातून एक हजार शूर निघतात, त्यातील शंभरच उरतील; तुमच्या शहरातून शंभर निघतात, त्यातील दहाच उरतील.”
- आमोस ५:४सुमारे इ.स.पू. ७८७
याहवेह इस्राएलाच्या लोकांना असे म्हणतात, “मला शोधा म्हणजे तुम्ही जिवंत राहाल.
- आमोस ५:५सुमारे इ.स.पू. ७८७
बेथेलचा शोध करू नका, गिलगाल येथे जाऊ नका, किंवा बेअर-शेबा येथे प्रवास करू नका. कारण गिलगाल खचितच बंदिवासात जाईल, आणि बेथेलचा पूर्ण नाश होईल”
- आमोस ५:६सुमारे इ.स.पू. ७८७
याहवेहचा शोध करा म्हणजे तुम्ही वाचाल, नाहीतर याहवेह योसेफाच्या गोत्रावर अग्नीसारखे भडकतील; आणि त्याला भस्म करून टाकील, आणि बेथेलमध्ये त्याला विझवणारा कोणीही नसेल.
- आमोस ५:७सुमारे इ.स.पू. ७८७
असे लोक आहेत जे न्यायाला कडूपणात बदलतात आणि नीतिमत्ता धुळीस मिळवितात.
- आमोस ५:८सुमारे इ.स.पू. ७८७
ज्यांनी कृत्तिका नक्षत्रे व मृगशीर्ष नक्षत्रे निर्माण केले, जे मध्यरात्रीचे रूपांतर पहाटेत करतात, आणि जे दिवसाचे रूपांतर रात्रीत करतात, जे समुद्राच्या पाण्यास बोलवितात आणि ते जमिनीच्या पृष्ठभागावर ओततात— याहवेह, हे त्यांचे नाव आहे.
- आमोस ५:९सुमारे इ.स.पू. ७८७
अंधारी आणणाऱ्या क्षणिक प्रकाशाने ते किल्ला उद्ध्वस्त करतात आणि तटबंदी असलेल्या शहराचा नाश करतात.
- आमोस ५:१०सुमारे इ.स.पू. ७८७
असे लोक आहे जे न्यायालयात न्यायाची बाजू घेणार्यांचा द्वेष आणि सत्य बोलणार्यांचा तिरस्कार करतात.
- आमोस ५:११सुमारे इ.स.पू. ७८७
तुम्ही गरिबांच्या पेंढ्यावरही कर लावता आणि त्यांच्या धान्यावरही कर लावता. म्हणून जरी स्वतःसाठी चिरेबंदी भवन बांधले असतील तरी त्यामध्ये कधीही राहणार नाही, किंवा तुम्ही लावत असलेल्या भरघोस पीक देणार्या रमणीय जरी तुम्ही कसदार द्राक्षमळा लावला तरी त्यातील द्राक्षारस कधीच पिऊ शकणार नाही.
- आमोस ५:१२सुमारे इ.स.पू. ७८७
कारण तुमचे अपराध किती अधिक आणि तुमची पातके किती घोर आहेत हे मला माहीत आहे. निरपराधांवर अत्याचार करून लाच घेतात व गरिबांना न्यायालयात न्याय मिळण्यापासून वंचित करतात असेही लोक आहेत.
- आमोस ५:१३सुमारे इ.स.पू. ७८७
अशा वेळी जे शहाणे आहेत ते मौन धरतात, कारण वेळ वाईट आहे.
- आमोस ५:१४सुमारे इ.स.पू. ७८७
वाईट नको, तर चांगले ते शोधा, म्हणजे तुम्ही जगाल. तुम्ही जसे ते म्हणतात त्याचप्रमाणे याहवेह सर्वसमर्थ परमेश्वर तुमच्यासोबत असतील.
- आमोस ५:१५सुमारे इ.स.पू. ७८७
दुष्टाईचा द्वेष करा, चांगल्यावर प्रीती करा; न्यायालयात न्याय स्थापित करा. मग कदाचित याहवेह सर्वसमर्थ परमेश्वर योसेफाच्या उरलेल्या लोकांवर दया करतील.