मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. योनाह १:८सुमारे इ.स.पू. ८६२

    यावर त्यांनी योनाहला विचारले, “आम्हाला सांग, आमच्यावर हे संकट कोणामुळे आले आहे? तू काय काम करतो? तू कुठे राहतो? तुझा देश कोणता? तू कोणत्या लोकांपैकी आहेस?”

  2. योनाह १:९सुमारे इ.स.पू. ८६२

    योनाहने त्यांना उत्तर दिले, “मी एक इब्री आहे आणि मी स्वर्गातील याहवेह परमेश्वराची उपासना करतो, ज्यांनी समुद्र आणि कोरडी जमीन निर्माण केली.”

  3. योनाह १:१०सुमारे इ.स.पू. ८६२

    हे ऐकून ते घाबरले आणि योनाहला म्हणाले, “तू हे काय केलेस?” (कारण योनाहने त्यांना सांगितले होते की तो याहवेहच्या उपस्थितीतून पळून जात आहे.)

  4. योनाह १:११सुमारे इ.स.पू. ८६२

    मग त्यांनी योनाहला विचारले, “आम्ही तुझ्यासोबत काय करावे जेणेकरून समुद्र आमच्यासाठी शांत होईल?” कारण समुद्र तर अधिकाधिक उग्र होत होता.

  5. योनाह १:१२सुमारे इ.स.पू. ८६२

    तेव्हा त्याने त्यांना उत्तर दिले, “मला समुद्रात फेकून द्या, म्हणजे समुद्र पुन्हा शांत होईल. कारण माझ्या चुकीमुळेच हे भयंकर वादळ तुमच्यावर आले आहे, हे मला ठाऊक आहे.”

  6. योनाह १:१३सुमारे इ.स.पू. ८६२

    तरीही खलाश्यांनी जहाज किनाऱ्यावर नेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण ते यशस्वी झाले नाहीत, कारण समुद्र पूर्वीपेक्षा जास्त उग्र होत होता.

  7. योनाह १:१४सुमारे इ.स.पू. ८६२

    मग ते मोठ्या आवाजात याहवेहचा धावा करत म्हणाले, “याहवेह, कृपया या मनुष्याचा जीव घेतल्याने आमचा नाश होऊ देऊ नका. एका निरपराध व्यक्तीला मारल्याबद्दल आम्हाला दोष देऊ नका, कारण तुम्हाला जे आवडले ते तुम्ही केले आहे.”

  8. योनाह १:१५सुमारे इ.स.पू. ८६२

    मग त्यांनी योनाहला उचलले आणि जहाजावरून समुद्रात फेकून दिले, आणि उग्र समुद्र तत्काळ शांत झाला!

  9. योनाह १:१६सुमारे इ.स.पू. ८६२

    यामुळे त्या लोकांना याहवेहची भीती वाटली आणि त्यांनी याहवेहला यज्ञ केला आणि नवस केला.

  10. योनाह १:१७सुमारे इ.स.पू. ८६२

    याहवेहने एक मोठा मासा नेमला ज्याने योनाहला गिळंकृत केले आणि योनाह त्या माशाच्या पोटात तीन दिवस आणि तीन रात्री राहिला.

  11. योनाह २:१सुमारे इ.स.पू. ८६२

    मग माशाच्या पोटातून योनाहने याहवेह त्याच्या परमेश्वराची प्रार्थना केली.

  12. योनाह २:२सुमारे इ.स.पू. ८६२

    तो म्हणाला: “माझ्या संकटात मी याहवेहचा धावा केला आणि त्यांनी मला उत्तर दिले. मृत्यूच्या खोल अधोलोकातून मी मदतीसाठी हाक मारली आणि तुम्ही माझी हाक ऐकली.

  13. योनाह २:३सुमारे इ.स.पू. ८६२

    तुम्ही मला खोलवर, समुद्राच्या अगदी हृदयात फेकून दिले आणि प्रवाहाने मला घेरले; आणि तुमच्या बेफाम लाटा आणि कल्लोळ यांनी मला झाकून टाकले.

  14. योनाह २:४सुमारे इ.स.पू. ८६२

    मी म्हणालो, ‘मला तुमच्या नजरेसमोरून दूर करण्यात आले आहे; तरीही मी तुमच्या पवित्र मंदिराकडे दृष्टी लावेन.’

  15. योनाह २:५सुमारे इ.स.पू. ८६२

    बुडविणार्‍या पाण्याने मला घाबरविले, माझ्या सभोवताली खोल डोह होता; माझे डोके समुद्राच्या शेवाळाने गुंडाळले होते.

  16. योनाह २:६सुमारे इ.स.पू. ८६२

    मी पर्वतांच्या मुळाशी पोहोचलो होतो; मी कायमचा जमिनीत बंदिस्त झालो होतो. तरीसुद्धा, हे याहवेह माझ्या परमेश्वरा, तुम्ही माझा जीव खड्ड्यातून वर आणला.

  17. योनाह २:७सुमारे इ.स.पू. ८६२

    “जेव्हा माझे जीवन क्षीण होत होते, तेव्हा मी याहवेहचे स्मरण केले, आणि माझी प्रार्थना वर तुमच्याकडे, तुमच्या पवित्र मंदिराकडे पोहोचली.

  18. योनाह २:८सुमारे इ.स.पू. ८६२

    “जे निरुपयोगी मूर्तींना कवटाळून राहतात ते स्वतःला परमेश्वराच्या प्रीतीपासून दूर ठेवतात.

  19. योनाह २:९सुमारे इ.स.पू. ८६२

    परंतु मी, उपकारस्तुतीच्या जयघोषाने, तुमच्यासाठी यज्ञ अर्पण करेन. मी जो नवस केला होता, तो मी पूर्ण करेन. मी म्हणेन, ‘तारण याहवेहकडून येते.’ ”

  20. योनाह २:१०सुमारे इ.स.पू. ८६२

    मग याहवेहने माशाला आज्ञा केली आणि त्याने योनाहला कोरड्या भूमीवर ओकून टाकले.

  21. योनाह ३:१सुमारे इ.स.पू. ८६२

    मग याहवेहचे वचन दुसऱ्या वेळेस योनाहकडे आले:

  22. योनाह ३:२सुमारे इ.स.पू. ८६२

    “ऊठ, त्या महान निनवेह शहरात जा आणि मी जो संदेश तुला देत आहे त्याची घोषणा कर.”

  23. योनाह ३:३सुमारे इ.स.पू. ८६२

    तेव्हा योनाहने याहवेहच्या वचनाप्रमाणे केले आणि निनवेह शहरास गेला. आता निनवेह हे फारच मोठे शहर होते. ते पार करण्यास तीन दिवस लागत होते.

  24. योनाह ३:४सुमारे इ.स.पू. ८६२

    जेव्हा योनाहने शहरात एक दिवसाचा प्रवास सुरू केला आणि घोषणा केली, “आतापासून चाळीस दिवसांनी निनवेहचा नाश होईल.”

  25. योनाह ३:५सुमारे इ.स.पू. ८६२

    तेव्हा निनवेहच्या लोकांनी परमेश्वरावर विश्वास ठेवला. सर्वत्र उपवास जाहीर केला आणि त्या सर्वांनी, मोठ्यांपासून लहानापर्यंत सर्वांनी गोणपाट परिधान केले.