- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- मीखाह १:१०सुमारे इ.स.पू. ७५०
गथ मध्ये ही बातमी देऊ नका; अजिबात रडू नका. बेथ‑ले‑अफ्राह मध्ये जाऊन धुळीत लोळ.
- मीखाह १:११सुमारे इ.स.पू. ७५०
शाफीर मध्ये राहणारे तुम्ही वस्त्रहीन आणि निर्लज्जपणे निघून जा. जे झानन मध्ये राहतात ते बाहेर जाणार नाहीत. बेथ‑एसल विलाप करीत आहे; ते तुम्हाला यापुढे संरक्षण देऊ शकत नाही.
- मीखाह १:१२सुमारे इ.स.पू. ७५०
मारोथ मध्ये राहणारे लोक वेदनांनी रडत आहेत, आणि मदतीची वाट पाहत आहेत, कारण यरुशलेमच्या प्रवेशद्वारापर्यंत पीडा याहवेहने पाठविलेली आहे.
- मीखाह १:१३सुमारे इ.स.पू. ७५०
लाखीशमध्ये राहणार्यांनो, वेगवान घोडे रथाला जुंपा. तुझ्यापासून सीयोनच्या कन्येचे पाप सुरू झाले, कारण तुझ्यामध्ये इस्राएलचे अपराध आढळून आले.
- मीखाह १:१४सुमारे इ.स.पू. ७५०
त्यामुळे तू मोरेशेथ-गथला निरोपाची भेट देशील. अकजीब चे रहिवासी इस्राएलच्या राजांना फसविणारी ठरतील.
- मीखाह १:१५सुमारे इ.स.पू. ७५०
मारेशाहच्या रहिवाशांनो, मी तुमच्यावर विजय मिळविणारा पाठवेन. इस्राएलचे प्रतिष्ठित लोक अदुल्लामला पळून जातील.
- मीखाह १:१६सुमारे इ.स.पू. ७५०
ज्या मुलांमध्ये तुम्ही आनंदी आहात त्यांच्यासाठी शोक करताना आपले डोके मुंडण करा; गिधाडासारखे तुमच्या डोक्याचे मुंडण करा, कारण ते तुमच्यापासून गुलाम म्हणून जातील.
- मीखाह २:१सुमारे इ.स.पू. ७३०
जे वाईट कृत्याची योजना करतात, जे आपल्या अंथरुणावर कट रचतात, त्यांचा धिक्कार असो! पहाट होताच ते त्यांचा कट पूर्ण करतात कारण हे सामर्थ्य त्यांच्या हातात असते.
- मीखाह २:२सुमारे इ.स.पू. ७३०
ते लोभीपणाने इतरांची शेते बळकावतात, दुसऱ्यांची घरेही हिसकावून घेतात. ते कपटाने लोकांची घरे बळकावतात आणि त्यांच्या पूर्वजांची संपत्ती लुटतात.
- मीखाह २:३सुमारे इ.स.पू. ७३०
म्हणून याहवेह म्हणतात: “मी या लोकांविरुद्ध विपत्ती योजत आहे, ज्यापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकत नाही. तुम्ही पुन्हा कधीही गर्वाने चालणार नाही, कारण तो आपत्तीचा काळ असेल.
- मीखाह २:४सुमारे इ.स.पू. ७३०
त्या दिवशी लोकांकरिता तुम्ही चेष्टेचा विषय व्हाल; ते तुम्हाला या विलाप गीताने टोमणे मारतील: ‘आमचा संपूर्ण नाश झाला आहे; माझ्या लोकांच्या मालमत्तेची विभागणी झाली आहे. ते ती माझ्यापासून काढून घेतात! ते आमची शेते बंडखोरांना देतात.’ ”
- मीखाह २:५सुमारे इ.स.पू. ७३०
म्हणून याहवेहच्या सभेत चिठ्ठ्या टाकून सूत्राने जमिनीची वाटणी करण्यास तुमच्याकडे कोणी राहणार नाही.
- मीखाह २:६सुमारे इ.स.पू. ७३०
त्यांचे संदेष्टे म्हणतात, “संदेश देऊ नका, या गोष्टींबद्दल संदेश देऊ नका; आमच्यावर अप्रतिष्ठा येणार नाही.”
- मीखाह २:७सुमारे इ.स.पू. ७३०
हे याकोबाच्या घराण्या, “असे म्हटले जावे काय, याहवेह अधीर होतात काय? ते अशी कामे करतात काय? “ज्याचे मार्ग सरळ आहेत त्याचे माझे शब्द भले करत नाहीत काय?
- मीखाह २:८सुमारे इ.स.पू. ७३०
अलीकडे माझे लोक शत्रूसारखे उठले आहेत. जे लोक निष्काळजीपणे जवळून जातात त्यांचे किमती कपडे तुम्ही काढून घेता, जसे युद्धातून परत येणारे पुरुष करतात.
- मीखाह २:९सुमारे इ.स.पू. ७३०
तुम्ही माझ्या लोकांच्या स्त्रियांना त्यांच्या सुखी घरातून हाकलून देतात. तुम्ही त्यांच्या मुलांकडून माझे आशीर्वाद कायमचे हिरावून घेता.
- मीखाह २:१०सुमारे इ.स.पू. ७३०
उठा, चालते व्हा! कारण हे तुमचे विश्रांतिस्थान नाही, कारण हे अशुद्ध झाले आहे, सर्व उपायांच्या पलीकडे, ते उद्ध्वस्त झाले आहे.
- मीखाह २:११सुमारे इ.स.पू. ७३०
जर एखादा लबाड आणि फसवणूक करणारा येऊन म्हणाला, ‘मी तुम्हाला भरपूर द्राक्षारस व मद्याची भविष्यवाणी करेन,’ तर अशीच व्यक्ती या लोकांसाठी योग्य संदेष्टा होईल!
- मीखाह २:१२सुमारे इ.स.पू. ७३०
“हे याकोबा, मी तुम्हा सर्वांना निश्चित गोळा करेन; इस्राएलच्या उरलेल्यांना मी खचित गोळा करेन. जसे मेंढवाड्यात मेंढरे, जसे कुरणात कळप, तसे मी त्यांना एकत्र गोळा करेन; आणि ती जागा लोकांनी फुलून जाईल.
- मीखाह २:१३सुमारे इ.स.पू. ७३०
जे कुंपण तोडून मार्ग उघडणारे त्यांच्या पुढे जातील; ते द्वार तोडून त्यातून बाहेर जातील. त्यांचा राजा त्यांच्या पुढे जाईल, याहवेह त्यांचे पुढारी असतील.”
- मीखाह ३:१सुमारे इ.स.पू. ७१०
तेव्हा मी म्हणालो, याकोबाच्या पुढार्यांनो, इस्राएलाच्या अधिकाऱ्यांनो, ऐका. तुम्ही न्यायाला स्वीकारू नये काय,
- मीखाह ३:२सुमारे इ.स.पू. ७१०
तुम्ही जो चांगल्याचा द्वेष करता व वाईटावर प्रीती करता; तुम्ही माझ्या लोकांची कातडी सोलता, आणि त्यांच्या हाडापर्यंतच्या मांसाचे लचके तोडता;
- मीखाह ३:३सुमारे इ.स.पू. ७१०
तुम्ही जे माझ्या लोकांचे मांस खाता, त्यांची कातडी सोलता आणि त्यांची हाडे मोडता, आणि पातेल्यात शिजविण्यासाठी मांसाचे तुकडे करावेत तसे त्यांचे तुकडे करता.
- मीखाह ३:४सुमारे इ.स.पू. ७१०
मग ते याहवेहचा धावा करतील, पण याहवेह त्यांचे ऐकणार नाही. त्यावेळी त्यांच्या वाईट कृत्यांमुळे याहवेह त्यांच्यापासून आपला चेहरा लपवतील.
- मीखाह ३:५सुमारे इ.स.पू. ७१०
याहवेह असे म्हणतात: “माझ्या लोकांना चुकीच्या मार्गाने नेणारे संदेष्टे, त्यांना काही खायला मिळाल्यास ते ‘शांती’ ची घोषणा करतात. परंतु जो त्यांना खाण्याचे देण्यास नकार देतो त्याच्याशी युद्ध करण्यास सुसज्ज राहतात.