मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मीखाह ३:६सुमारे इ.स.पू. ७१०

    म्हणूनच तुझ्यावर रात्र येईल, दृष्टान्त दिसणार नाही, आणि अंधार येईल, तुम्ही दैवप्रश्न पाहिल्याशिवाय! या संदेष्ट्यांसाठी सूर्यास्त होईल आणि दिवस असता त्यांच्यावर अंधार पडेल.

  2. मीखाह ३:७सुमारे इ.स.पू. ७१०

    द्रष्ट्यांना लाज वाटेल आणि दैवप्रश्न करणारे फजीत होतील. ते सर्व आपली मुखे झाकतील कारण त्यांना परमेश्वराकडून उत्तर आलेले नाही.”

  3. मीखाह ३:८सुमारे इ.स.पू. ७१०

    परंतु माझ्याबाबतीत म्हणाल, तर याकोबाला त्याचे अपराध आणि इस्राएलला त्याचे पाप सांगण्यासाठी मी याहवेहच्या आत्म्याने, न्यायाने आणि सामर्थ्याने परिपूर्ण आहे.

  4. मीखाह ३:९सुमारे इ.स.पू. ७१०

    अहो याकोबाच्या पुढार्‍यांनो, इस्राएलाच्या अधिकाऱ्यांनो, माझे ऐका, तुम्ही न्यायाला तुच्छ लेखता आणि चांगल्या गोष्टी विकृत करता;

  5. मीखाह ३:१०सुमारे इ.स.पू. ७१०

    सीयोनला रक्तपाताने आणि यरुशलेमला दुष्टपणाने बांधले आहे.

  6. मीखाह ३:११सुमारे इ.स.पू. ७१०

    तिचे पुढारी लाच घेऊन न्याय करतात, तिचे याजक किंमत घेऊन शिकवितात, व तिचे संदेष्टे पैशासाठी भविष्य सांगतात. तरीही ते याहवेहच्या मदतीसाठी आसुसलेले असतात आणि म्हणतात, “याहवेह आपल्यामध्ये नाहीत काय? आमच्यावर कोणतेही संकट येणार नाही.”

  7. मीखाह ३:१२सुमारे इ.स.पू. ७१०

    म्हणून तुमच्यामुळे, सीयोन शेताप्रमाणे नांगरला जाईल, यरुशलेम दगडांचा ढिगारा होईल, मंदिराच्या टेकडीवर दाटीने झाडेझुडपे वाढतील.

  8. मीखाह ४:१सुमारे इ.स.पू. ७१०

    पण शेवटच्या दिवसात याहवेहच्या मंदिराचे पर्वत बळकट व उंच असे स्थापित केले जातील; सर्व पर्वतांपेक्षा ते उंचावले जातील, आणि लोकांचा लोंढा त्याकडे एकत्र येईल.

  9. मीखाह ४:२सुमारे इ.स.पू. ७१०

    अनेक राष्ट्रे येतील आणि म्हणतील, “चला, आपण याहवेहच्या पर्वताकडे, याकोबाच्या परमेश्वराच्या मंदिराला जाऊ. ते आपले मार्ग आम्हाला शिकवतील, म्हणजे आम्ही त्या मार्गावर चालू.” कारण सीयोनमधून नियमशास्त्र, यरुशलेमातून याहवेहचे वचन बाहेर जाईल.

  10. मीखाह ४:३सुमारे इ.स.पू. ७१०

    ते देशांमधील अनेक लोकांचा न्याय करतील, दूरदूरच्या बलाढ्य राष्ट्रांमधील वाद मिटवतील. ते आपल्या तलवारी ठोकून त्यांचे नांगराचे फाळ करतील, व भाल्यांचे आकडे बनवतील. एक देश दुसऱ्या देशाविरुद्ध तलवार उगारणार नाही, तसेच ते यापुढे लष्करी प्रशिक्षण देणार नाहीत.

  11. मीखाह ४:४सुमारे इ.स.पू. ७१०

    प्रत्येकजण आपआपल्या द्राक्षवेलीखाली आणि आपआपल्या अंजिराच्या झाडाखाली बसेल, आणि कोणीही त्यांना घाबरविणार नाही, कारण सर्वसमर्थ याहवेहने म्हटले आहे.

  12. मीखाह ४:५सुमारे इ.स.पू. ७१०

    सर्व राष्ट्रे आपआपल्या दैवतांच्या नावाने चालतील, पण आम्ही नेहमी याहवेह आमच्या परमेश्वराच्या नावाने चालत राहू.

  13. मीखाह ४:६सुमारे इ.स.पू. ७१०

    याहवेह घोषित करतात, “त्या दिवशी, मी लंगड्यांना एकत्र करेन; बहिष्कृत लोकांना आणि ज्यांना मी दुखविले आहे त्यांनाही एकत्र करेन.

  14. मीखाह ४:७सुमारे इ.स.पू. ७१०

    मी लंगड्यांना माझे अवशेष करेन, आणि बहिष्कृत लोकांना एक बलाढ्य राष्ट्र करेन. त्या दिवसापासून याहवेह सीयोन पर्वतावरून सदासर्वदा राज्य करतील.

  15. मीखाह ४:८सुमारे इ.स.पू. ७१०

    आणि तू, कळपाच्या टेहळणीच्या बुरुजा, सीयोन कन्येच्या मजबूत किल्ल्या, तुझे पूर्वीचे राज्य तुला परत देण्यात येईल; यरुशलेमच्या कन्येला सिंहासन दिले जाईल.”

  16. मीखाह ४:९सुमारे इ.स.पू. ७१०

    तू आता मोठ्याने का रडत आहेस— तुला राजा नाही काय? तुमचा अधिकारी नष्ट झाला आहे काय, म्हणून तुम्ही स्त्रीच्या प्रसूती वेदनांप्रमाणे व्याकूळ झाला आहात काय?

  17. मीखाह ४:१०सुमारे इ.स.पू. ७१०

    हे सीयोनच्या कन्ये, बाळंतपणाच्या प्रसूती वेदनांनी कण्हत राहा, कारण तू आता शहर सोडून मोकळ्या मैदानात तळ ठोकला पाहिजे. तू बाबेलला जाशील; आणि तिथे तुझी सुटका होईल आणि याहवेह तिथून तुम्हाला तुमच्या शत्रूंच्या हातातून मुक्त करतील.

  18. मीखाह ४:११सुमारे इ.स.पू. ७१०

    पण आता पुष्कळ राष्ट्रे तुमच्याविरुद्ध एकत्र झाली आहेत. ते म्हणतात, “तिला अशुद्ध होऊ द्या, आपण सीयोनेवर दुष्ट नजर टाकून आनंद करू!”

  19. मीखाह ४:१२सुमारे इ.स.पू. ७१०

    पण त्यांना याहवेहचे विचार माहीत नाहीत; त्यांना याहवेहच्या योजना समजत नाही, खळ्यातील पेंढ्यांप्रमाणे याहवेहने त्यांना गोळा केले आहे.

  20. मीखाह ४:१३सुमारे इ.स.पू. ७१०

    “अगे सीयोनकन्ये, ऊठ, मळणी कर; कारण मी तुला लोखंडाची शिंगे व कास्याचे खूर देईन, आणि तू अनेक राष्ट्रांचे तुकडे करशील.” त्यांची लूट तू याहवेहला, त्यांची संपत्ती सर्व पृथ्वीच्या प्रभूला अर्पण करशील.

  21. मीखाह ५:१सुमारे इ.स.पू. ७१०

    हे सैन्याच्या नगरी, आता आपल्या सैन्याला एकत्र करा, कारण आमच्याविरुद्ध वेढा पडला आहे. ते काठीने इस्राएलाच्या शासकाच्या गालावर मारतील.

  22. मीखाह ५:२सुमारे इ.स.पू. ७१०

    “परंतु, तू हे बेथलेहेम एफ्राथा, तू जरी यहूदीयाच्या वंशजांपैकी सर्वात लहान आहेस, तरी तुझ्यातून माझ्यासाठी इस्राएलचा शासक उदय पावेल, ज्याची उत्पत्ती प्राचीन काळातील आहे.”

  23. मीखाह ५:३सुमारे इ.स.पू. ७१०

    म्हणून प्रसूती वेदनेत असलेली एका मुलाला जन्म देईपर्यंत आणि तिचे बाकीचे भाऊ परत इस्राएल लोकांमध्ये येईपर्यंत इस्राएलचा त्याग केला जाईल.

  24. मीखाह ५:४सुमारे इ.स.पू. ७१०

    तो याहवेहच्या सामर्थ्याने, याहवेह त्याच्या परमेश्वराच्या नावाच्या वैभवात उठेल आणि आपल्या कळपाचा मेंढपाळ होईल आणि ते सुरक्षित राहतील, कारण तेव्हा पृथ्वीच्या टोकापर्यंतच्या लोकांना याहवेहची महानता कळेल.

  25. मीखाह ५:५सुमारे इ.स.पू. ७१०

    ते पुरुष आपली शांती असतील जेव्हा अश्शूरी आपल्या देशावर हल्ला करतील आणि आपल्या किल्ल्यांमध्ये प्रवेश करतील, तेव्हा आम्ही त्यांच्याविरुद्ध सात मेंढपाळ, आठ देखील सेनापती उभे करू,