- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- मीखाह ५:६सुमारे इ.स.पू. ७१०
अश्शूर देशावर तलवारीने, निम्रोदाच्या देशावर उपसलेल्या तलवारीने कोण शासन करेल. अश्शूरचे लोक जेव्हा आपल्या देशावर आक्रमण करतील आणि आपली सीमा ओलांडतील तेव्हा याहवेह आपल्याला त्यांच्यापासून सोडवतील.
- मीखाह ५:७सुमारे इ.स.पू. ७१०
याकोबाचे उरलेले लोक अनेक लोकांमध्ये असतील, ते याहवेहने पाठविलेल्या दहिवराप्रमाणे, गवतावर पडणाऱ्या पावसाप्रमाणे असतील, जे कोणाचीही वाट पाहत नाही आणि कोणा मनष्यावर अवलंबून राहत नाही.
- मीखाह ५:८सुमारे इ.स.पू. ७१०
याकोबाचे अवशेष राष्ट्रांमध्ये आणि अनेक लोकांमध्ये असणार, जंगली श्वापदांमध्ये सिंहासारखे आणि मेंढरांच्या कळपामध्ये तरुण सिंहासारखे असतील, ते त्यांच्यावर झेप घेतील आणि त्यांना ठार करीत पुढे जातील आणि कोणीही त्यांना वाचवू शकत नाही.
- मीखाह ५:९सुमारे इ.स.पू. ७१०
तुझ्या शत्रूंवर विजय मिळवून तुझा हात उंच होईल आणि तुझ्या सर्व शत्रूंचा नाश होईल.
- मीखाह ५:१०सुमारे इ.स.पू. ७१०
“त्या दिवशी,” याहवेह ही घोषणा करतात, “मी तुमच्या घोड्यांचा तुमच्यामध्ये नाश करेन आणि तुमच्या रथांनाही नष्ट करेन.
- मीखाह ५:११सुमारे इ.स.पू. ७१०
मी तुझ्या देशातील शहरांचा नाश करेन आणि तुझे किल्ले उद्ध्वस्त करेन.
- मीखाह ५:१२सुमारे इ.स.पू. ७१०
मी तुमच्यातील चेटके नष्ट करेन आणि यापुढे तुझ्यामध्ये कोणीही शकुन पाहणार नाही.
- मीखाह ५:१३सुमारे इ.स.पू. ७१०
मी तुमच्या मूर्ती आणि तुमच्यातील पवित्र दगडांचा नाश करेन; तुमच्या हस्तकृतींना तुम्ही पुन्हा दंडवत करणार नाही.
- मीखाह ५:१४सुमारे इ.स.पू. ७१०
जेव्हा मी तुझी नगरे उद्ध्वस्त करेन, तेव्हा तुझे अशेरा स्तंभ उपटून टाकीन.
- मीखाह ५:१५सुमारे इ.स.पू. ७१०
ज्या राष्ट्रांनी माझी आज्ञा पाळली नाही, त्यांचा मी रागाने आणि क्रोधाने सूड उगवेन.”
- मीखाह ६:१सुमारे इ.स.पू. ७१०
याहवेह काय म्हणतात ते ऐका: “उभे राहा, पर्वतांसमोर माझ्या दावा मांडा; आणि तुला काय बोलायचे आहे ते टेकड्या ऐको.
- मीखाह ६:२सुमारे इ.स.पू. ७१०
“हे पर्वतांनो, याहवेहने केलेल्या आरोपाकडे लक्ष द्या; हे पृथ्वीच्या अढळ पाया, तूही ऐक. कारण याहवेहचा त्यांच्या लोकांविरुद्ध एक दावा आहे. ते इस्राएली लोकांविरुद्ध वाद दाखल करीत आहेत.
- मीखाह ६:३सुमारे इ.स.पू. ७१०
“हे माझ्या लोकांनो, मी तुम्हाला काय केले आहे? मी तुमच्यावर कोणते ओझे टाकले आहे? मला उत्तर द्या.
- मीखाह ६:४सुमारे इ.स.पू. ७१०
मी तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर काढले आणि तुम्हाला गुलामगिरीतून देशातून मुक्त केले. मी मोशेला तुमचे नेतृत्व करण्यास पाठवले, अहरोन आणि मिर्यामलाही पाठवले.
- मीखाह ६:५सुमारे इ.स.पू. ७१०
माझ्या लोकांनो, मोआबाचा राजा बालाक याने काय कट केला आणि बौराचा पुत्र बलाम याने काय उत्तर दिले ते स्मरणात ठेवा. शिट्टीम ते गिलगालपर्यंतचा तुमचा प्रवास स्मरणात ठेवा, म्हणजे याहवेहच्या न्यायीपणाच्या कृती तुम्हाला कळतील.”
- मीखाह ६:६सुमारे इ.स.पू. ७१०
मी याहवेहसमोर काय आणावे आणि स्तुतीस पात्र असलेल्या परमेश्वरासमोर मी नमन करावे? होमार्पणासाठी मी एक वर्षाचे वासरू घेऊन त्यांच्यासमोर येऊ का?
- मीखाह ६:७सुमारे इ.स.पू. ७१०
एक हजार मेंढे किंवा जैतून तेलाच्या दहा हजार नद्यांनी याहवेह संतुष्ट होतील काय? माझ्या अपराधाचे प्रायश्चित्त म्हणून मी माझा ज्येष्ठपुत्र अर्पावा काय, माझ्या आत्म्याच्या पापासाठी माझ्या शरीराचे फळ द्यावे काय?
- मीखाह ६:८सुमारे इ.स.पू. ७१०
हे मनुष्या, त्यांनी तुला चांगले काय ते दाखविले आहे. आणि याहवेह तुझ्याकडून काय अपेक्षा करतात? नीतीने वागणे आणि दयेने प्रीती करणे आणि तुझ्या परमेश्वराबरोबर नम्रपणे चालणे.
- मीखाह ६:९सुमारे इ.स.पू. ७१०
ऐका! याहवेह नगराला हाक मारीत आहेत— आणि तुमच्या नावाचे भय बाळगणे हे ज्ञान आहे— “काठी आणि त्यास नियुक्त करणाऱ्याचे ऐका.
- मीखाह ६:१०सुमारे इ.स.पू. ७१०
हे दुष्ट घरा, अजूनही तुझी अन्यायाने मिळवलेली संपत्ती, आणि उणे एफा माप जे शापित आहे त्यास विसरेन काय?
- मीखाह ६:११सुमारे इ.स.पू. ७१०
चुकीच्या वजनाच्या पिशवीने, कपटाच्या वजनांनी मी कोणाची सुटका करू काय?
- मीखाह ६:१२सुमारे इ.स.पू. ७१०
तुमचे श्रीमंत लोक हिंसा करतात; तुमचे रहिवासी लबाड आहेत आणि त्यांची जीभ कपटी गोष्ट बोलते.
- मीखाह ६:१३सुमारे इ.स.पू. ७१०
म्हणून तुमच्या पातकांमुळे तुमचा नायनाट व नाश करण्यास मी सुरुवात केली आहे.
- मीखाह ६:१४सुमारे इ.स.पू. ७१०
तू खाशील तृप्त होणार नाही; खाल्ल्यानंतरही तुझे पोट रिकामे राहील. तू साठवून ठेवशील, पण काहीही उरणार नाही, कारण मी तुझी बचत तलवारीला देईन.
- मीखाह ६:१५सुमारे इ.स.पू. ७१०
तू पेरणी करशील पण कापणी करणार नाही; तुम्ही जैतून फळे तुडवाल, पण ते तेल वापरणार नाही, तू द्राक्षे चिरडशील, पण त्याचा द्राक्षारस पिणार नाही.