मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मीखाह ६:१६सुमारे इ.स.पू. ७१०

    तू ओमरीचे नियम आणि अहाबाच्या घराण्याच्या सर्व चालीरीती पाळल्या आहेत; तुम्हीही त्यांच्या रूढी पाळल्या आहेत. म्हणून मी तुझा नाश करेन व तुझ्या प्रजेची थट्टा करेन; तू राष्ट्रांची निंदा सहन करशील.”

  2. मीखाह ७:१सुमारे इ.स.पू. ७१०

    काय ही माझी दुःखद स्थिती! मी द्राक्षमळ्यातील उन्हाळी फळे गोळा करणार्‍यासारखा आहे; खाण्यास द्राक्षांचा घडही उरला नाही, अंजिराच्या ज्या पहिल्या फळाची मला इच्छा होती ती सुद्धा नाही.

  3. मीखाह ७:२सुमारे इ.स.पू. ७१०

    पृथ्वीवरून विश्वासू लोकांचा नाश झाला आहे; एकही प्रामाणिक मनुष्य उरला नाही. प्रत्येकजण रक्तपात करण्यात गुंतला आहे; ते सापळा रचून एकमेकांची शिकार करतात.

  4. मीखाह ७:३सुमारे इ.स.पू. ७१०

    वाईट करण्यात दोन्ही हात निपुण आहेत; शासक भेटवस्तूंची मागणी करतो, न्यायाधीश लाच घेतात, सामर्थ्यवान लोक बळजबरीने त्यांच्या इच्छा पूर्ण करतात; ते सर्व मिळून कट रचतात.

  5. मीखाह ७:४सुमारे इ.स.पू. ७१०

    त्यांच्यामध्ये जो सर्वोत्कृष्ट मानला जातो तो काटेरी झुडूप आणि जो नीतिमान तो काट्याच्या कुंपणापेक्षाही वाईट आहे. परमेश्वराने तुमच्याकडे येण्याचा दिवस आला आहे, म्हणजेच तुमच्या पहारेकऱ्याने आवाज देण्याची वेळ आली आहे. आता तुमच्या गोंधळाची वेळ आली आहे.

  6. मीखाह ७:५सुमारे इ.स.पू. ७१०

    शेजाऱ्यावर भरवसा ठेवू नका; आणि मित्रांवर विश्वास ठेवू नका. तुझ्या मिठीत असलेली स्त्रीबरोबर असतानाही, तुझ्या ओठांच्या शब्दांचे रक्षण कर.

  7. मीखाह ७:६सुमारे इ.स.पू. ७१०

    कारण पुत्र आपल्या पित्याचा अनादर करतो, मुलगी तिच्या आईविरुद्ध, आणि सून तिच्या सासूविरुद्ध उठते— मनुष्याचे शत्रू त्याच्या आपल्याच कुटुंबातील सदस्य असतात.

  8. मीखाह ७:७सुमारे इ.स.पू. ७१०

    मी तर, याहवेहची आशेने वाट पाहतो, मी माझ्या तारणाऱ्या परमेश्वराची प्रतीक्षा करतो; माझे परमेश्वर माझे ऐकतील.

  9. मीखाह ७:८सुमारे इ.स.पू. ७१०

    अरे माझ्या वैर्‍या, माझी परिस्थिती बघून आनंद करू नकोस! कारण मी पडलो, तरी पुन्हा उठेन. जरी मी अंधारात बसलो, तरी याहवेह माझा प्रकाश होतील.

  10. मीखाह ७:९सुमारे इ.स.पू. ७१०

    मी याहवेहविरुद्ध पाप केल्यामुळे, ते माझी बाजू ऐकून मला न्याय देईपर्यंत मी याहवेहचा कोप सहन करेन. ते मला प्रकाशात आणतील; आणि मी त्यांचे न्यायीपण पाहीन.

  11. मीखाह ७:१०सुमारे इ.स.पू. ७१०

    मग माझे शत्रू हे पाहून ते लज्जेने झाकले जातील, ती जी मला म्हणत होती, “याहवेह तुझा परमेश्वर कुठे आहे?” माझे डोळे तिचे पतन पाहतील; रस्त्याच्या चिखलाप्रमाणे तीही पायाखाली तुडविली जाईल.

  12. मीखाह ७:११सुमारे इ.स.पू. ७१०

    तुमचे तट बांधण्याचा दिवस येईल, आणि तुमच्या सीमा विस्तारित करण्याचा दिवस येईल.

  13. मीखाह ७:१२सुमारे इ.स.पू. ७१०

    अश्शूरपासून इजिप्तच्या नगरांपर्यंत आणि मिसरपासून फरात नदीपर्यंत, समुद्रापासून समुद्रापर्यंत आणि डोंगरांपासून डोंगरांपर्यंत, त्या दिवशी लोक तुझ्याकडे येतील.

  14. मीखाह ७:१३सुमारे इ.स.पू. ७१०

    पृथ्वीवरील रहिवाशांमुळे, त्यांच्या कृतींचा परिणाम म्हणून, पृथ्वी उजाड होईल.

  15. मीखाह ७:१४सुमारे इ.स.पू. ७१०

    आपल्या लोकांचा काठीसह मेंढपाळ हो, जो तुझ्या वतनाचा कळप आहे, जो एकटाच जंगलात, सुपीक कुरणात राहतो. त्यांना पूर्वीप्रमाणे बाशानात व गिलआदात यथेच्छ चरू द्या.

  16. मीखाह ७:१५सुमारे इ.स.पू. ७१०

    “तुम्ही इजिप्तमधून बाहेर आलात त्या दिवसांप्रमाणे, मी त्यांना माझे चमत्कार दाखवेन.”

  17. मीखाह ७:१६सुमारे इ.स.पू. ७१०

    राष्ट्रे हे पाहतील आणि लज्जित होतील, त्यांच्या सत्तेपासून वंचित राहतील. ते आपली मुखे हाताने झाकतील आणि त्यांचे कान बहिरे होतील.

  18. मीखाह ७:१७सुमारे इ.स.पू. ७१०

    ते सर्पाप्रमाणे, भूमीवर सरपटणार्‍या प्राण्यांप्रमाणे धूळ चाटतील. ते आपल्या बिळातून थरथर कापत बाहेर पडतील; भयभीत होऊन ते याहवेह आमच्या परमेश्वराकडे वळतील आणि तुमचे भय बाळगतील.

  19. मीखाह ७:१८सुमारे इ.स.पू. ७१०

    तुम्ही जे अन्यायाची क्षमा करतात, आपल्या वतनातील उरलेल्यांची पापे मागे टाकतात त्या तुमच्यासारखा कोण परमेश्वर आहे? तुम्ही सर्वकाळ क्रोध धरीत नाहीत, परंतु दया दाखविण्यात आनंद मानता.

  20. मीखाह ७:१९सुमारे इ.स.पू. ७१०

    पुन्हा एकदा तुम्ही आम्हावर दया कराल; तुम्ही आमची पापे आपल्या पायाखाली तुडविणार; आणि आमची दुष्कृत्ये समुद्राच्या खोलीत फेकून द्याल.

  21. मीखाह ७:२०सुमारे इ.स.पू. ७१०

    फार पूर्वी, आमच्या पूर्वजांना वचन दिल्याप्रमाणे, तुम्ही याकोबाशी विश्वासू असाल, आणि अब्राहामवर प्रीती दाखवाल.

  22. नहूम १:१सुमारे इ.स.पू. ७१३

    निनवेहविषयी भविष्यवाणी. एल्कोशवासी नहूमच्या दृष्टान्ताचे पुस्तक.

  23. नहूम १:२सुमारे इ.स.पू. ७१३

    याहवेह ईर्ष्यावान व सूड घेणारे परमेश्वर आहेत; याहवेह सूड घेणारे आणि क्रोधाने भरलेले आहेत. त्यांच्या शत्रूंचा ते सूड घेतात आणि आपला कोप त्यांच्याविरुद्ध मोकळा करतात.

  24. नहूम १:३सुमारे इ.स.पू. ७१३

    याहवेह मंदक्रोध आहेत, पण अत्यंत सामर्थ्यशाली आहेत; याहवेह दुष्टांना शिक्षा दिल्याशिवाय सोडत नाही. त्यांचे मार्ग चक्रीवादळ व वादळामधून जातात. ढग त्यांच्या पायाखालची धूळ आहेत.

  25. नहूम १:४सुमारे इ.स.पू. ७१३

    ते समुद्रास फटकारतात आणि तो शुष्क होतो; ते सर्व नद्यांना कोरडे करतात. बाशान व कर्मेल मलूल होतात; लबानोनचा मोहोर कोमेजतो.