- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- नहूम ३:२सुमारे इ.स.पू. ७१३
चाबकांच्या फटकार्यांचा आवाज, चाकांचा खडखडाट, चौखूर धावणारे घोडे आणि हिसके देणारे रथ!
- नहूम ३:३सुमारे इ.स.पू. ७१३
आक्रमक घोडेस्वारांची पलटण लखलखणार्या तलवारी चमचमणारे भाले! पडलेली अनेक प्रेते, सर्वत्र मृतांचे ढीग, अगणित मृत शरीरे, प्रेतांना अडखळून पडणारे लोक—
- नहूम ३:४सुमारे इ.स.पू. ७१३
या सर्वांचे कारण, एका वेश्येच्या रंगेलपणाची वासना, ती भुलविणारी, जादूटोण्याची स्वामिनी आहे, तिने आपल्या वेश्यागिरीने राष्ट्रांना आणि जादूटोण्याने लोकांना गुलाम बनविले.
- नहूम ३:५सुमारे इ.स.पू. ७१३
सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात, “मी तुझ्याविरुद्ध आहे, मी तुझे वस्त्र तुझ्या चेहऱ्यावर उचलेन. तुझी नग्नता सर्व राष्ट्रांना आणि तुझी लज्जा सर्व देशांना दाखवेन.
- नहूम ३:६सुमारे इ.स.पू. ७१३
मी तुझ्यावर घृणास्पद गोष्टी फेकेन, मी तुला अपमानित करेन आणि तुला तमाशा बनवेन.
- नहूम ३:७सुमारे इ.स.पू. ७१३
तुला पाहणारे सर्व भयभीत होऊन तुझ्यापासून दूर पळतील व म्हणतील, ‘निनवेह उद्ध्वस्त झाली आहे—तिच्यासाठी कोण शोक करेल?’ तुझे सांत्वन करणारा मला कुठे मिळेल?”
- नहूम ३:८सुमारे इ.स.पू. ७१३
नाईल नदीकाठी वसलेल्या, सर्व बाजूंनी पाण्याने घेरलेल्या थेबेस नगरीपेक्षा तू अधिक चांगली आहेस काय? नदीच तिला संरक्षण देते, नदीच तिची तटबंदी आहे.
- नहूम ३:९सुमारे इ.स.पू. ७१३
कूश आणि इजिप्त तिचे अपरिमित सामर्थ्य होते; पूट व लिबिया तिच्या मित्रराष्ट्रांपैकी होते.
- नहूम ३:१०सुमारे इ.स.पू. ७१३
असे असूनही थीब्जचा पाडाव झाला आणि तिला बंदिवासात नेण्यात आले. तिची बालके रस्त्यांच्या प्रत्येक कोपऱ्यावर दगडांवर आपटून ठार मारण्यात आली. तिच्या अधिकार्यांसाठी चिठ्ठ्या टाकण्यात आल्या, तिच्या सर्व प्रतिष्ठित व्यक्तींना साखळदंडानी बांधण्यात आले.
- नहूम ३:११सुमारे इ.स.पू. ७१३
तू देखील मद्यपीप्रमाणे धुंद होशील; तू लपून बसशील आणि सुरक्षिततेसाठी तुझ्या शत्रूपासून आश्रय शोधशील.
- नहूम ३:१२सुमारे इ.स.पू. ७१३
तुझे सर्व गड अंजिरांच्या झाडासारखे होतील त्यांच्या प्रथम पिकलेल्या फळांगत; जेव्हा ते हलविले जातात, तेव्हा ते नेमके खाणाऱ्याच्या तोंडात पडतात.
- नहूम ३:१३सुमारे इ.स.पू. ७१३
तुझ्या सैन्य-दलांकडे पाहा— ते सर्व दुर्बल आहेत. तुझ्या देशाच्या वेशी तुझ्या शत्रूंसाठी सताड उघडलेल्या आहेत; तुझ्या वेशीच्या सळया अग्नीने भस्म केल्या आहेत.
- नहूम ३:१४सुमारे इ.स.पू. ७१३
तुला पडणार्या वेढ्यासाठी पाण्याचा साठा करून ठेव, तुझे किल्ले मजबूत कर! चिखल तुडवून ठेव, चिखलाचा गारा साच्यांत भर, वीटकाम दुरुस्त कर!
- नहूम ३:१५सुमारे इ.स.पू. ७१३
तिथे तुला अग्नी भस्म करेल; तलवार तुला कापून टाकेल— एखाद्या टोळधाडीप्रमाणे ते तुला गिळंकृत करतील. नाकतोड्यासारखे बहुगुणित व्हा, टोळांसारखे बहुगुणित व्हा!
- नहूम ३:१६सुमारे इ.स.पू. ७१३
तू तुझ्या व्यापार्यांची संख्या वाढविली आहे त्यांची संख्या आकाशातील तार्यांपेक्षाही जास्त वाढली आहे, परंतु ते एखाद्या टोळधाडीप्रमाणे संपूर्ण भूमी ओरबाडून टाकतात व मग ते उडून जातात.
- नहूम ३:१७सुमारे इ.स.पू. ७१३
तुझे रक्षक टोळांसारखे आहेत, तुझे अधिकारी टोळांच्या झुंडीप्रमाणे आहेत थंडीच्या दिवसात ते भिंतीमध्ये वसतात— पण सूर्योदय होताच उडून जातात, आणि कुठे जातात ते कोणालाच कळत नाही.
- नहूम ३:१८सुमारे इ.स.पू. ७१३
हे अश्शूरच्या राजा, तुझे मेंढपाळ डुलकी घेतात; तुझे प्रतिष्ठित लोक विश्रांती घेण्यासाठी पहुडले आहेत. तुझे लोक डोंगरांवर विखुरले आहेत त्यांना एकत्र करण्यास कोणीही नाही.
- नहूम ३:१९सुमारे इ.स.पू. ७१३
तुला कशानेही आरोग्य मिळणार नाही; तुझी जखम घातक आहे. तुझ्या दुर्दशेची बातमी जे कोणी ऐकतील ते सर्वजण आनंदाने टाळ्या वाजवितील, तुझ्या क्रूरतेचा उपद्रव ज्याला झाला नाही, असा कोण आहे?
- हबक्कूक १:१सुमारे इ.स.पू. ६२६
संदेष्टा हबक्कूकला प्राप्त झालेली ही भविष्यवाणी आहे:
- हबक्कूक १:२सुमारे इ.स.पू. ६२६
हे याहवेह, मी कुठवर तुमचा धावा करावा? पण तुम्ही ऐकत नाहीत? मी तुम्हाला ओरडून हाक मारतो, “हिंसा!” पण तुम्ही वाचवित नाहीत.
- हबक्कूक १:३सुमारे इ.स.पू. ६२६
तुम्ही मला अन्यायाकडे का पहायला लावता? तुम्ही चुकीचे कार्य का सहन करता? विनाश आणि हिंसाचार माझ्यापुढे होत आहे; वाद व कलह वाढत आहेत.
- हबक्कूक १:४सुमारे इ.स.पू. ६२६
म्हणून कायदा नेभळा झाला आहे, आणि योग्य न्याय कधीही दिला जात नाही, दुष्टांनी नीतिमानांना वेढले आहे, म्हणून कायदा विपरीत केला जातो.
- हबक्कूक १:५सुमारे इ.स.पू. ६२६
“देशांकडे पाहा आणि लक्षपूर्वक बघ— आणि अत्यंत आश्चर्यचकित हो. कारण आता मी तुझ्या काळात जे कार्य करणार आहे जरी ते तुला सांगितले तरी त्यावर तुझा विश्वास बसणार नाही.
- हबक्कूक १:६सुमारे इ.स.पू. ६२६
मी बाबेलच्या लोकांना उभारणार आहे, ते निर्दयी आणि उतावळे लोक आहेत, जे संपूर्ण पृथ्वीला पादाक्रांत करीत आहेत ते स्वतःचे नसलेले आवास काबीज करतील.
- हबक्कूक १:७सुमारे इ.स.पू. ६२६
ते दहशत वाटेलसे व भीतिदायक लोक आहेत; ते स्वतःचाच कायदा बनवितात आणि स्वतःचाच मान राखतात.