मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. हबक्कूक २:१६सुमारे इ.स.पू. ६२६

    तुम्ही गौरवाऐवजी लज्जेने भरून जाल. आता तुमची वेळ आहे, प्या व तुमची नग्नता उघडी होऊ द्या! याहवेहच्या उजव्या हातातील प्याला तुमच्याकडे येत आहे, आणि कलंक तुमचा गौरव झाकून टाकेल.

  2. हबक्कूक २:१७सुमारे इ.स.पू. ६२६

    लबानोनमध्ये तुम्ही केलेला हिंसाचार तुम्हाला व्याकूळ करेल, आणि तुम्ही केलेला प्राण्यांचा नाश तुम्हाला भयभीत करेल, कारण तुम्ही मनुष्याचे रक्त वाहिले आहे; तुम्ही देश व नगरांचा आणि त्यात राहणाऱ्या प्रत्येकाचा नाश केला आहे.

  3. हबक्कूक २:१८सुमारे इ.स.पू. ६२६

    “मूर्तीकाराने निर्मित केलेल्या मूर्तीची काय किंमत आहे? किंवा प्रतिमा, जी असत्य शिकविते? स्वतःच्या हस्तकृतीवर भरवसा ठेवणारे; तो मूर्ती घडवितो जी बोलू शकत नाही.

  4. हबक्कूक २:१९सुमारे इ.स.पू. ६२६

    धिक्कार असो, जो लाकडाला म्हणतो, ‘जिवंत हो!’ किंवा निर्जीव दगडाला म्हणतो, ‘जागा हो!’ ते मार्गदर्शन करू शकतात काय? त्या सोन्याने व रुप्याने मढविलेल्या आहेत; पण त्यांच्यात श्वास नाही.”

  5. हबक्कूक २:२०सुमारे इ.स.पू. ६२६

    परंतु याहवेह आपल्या पवित्र मंदिरात आहेत; सर्व पृथ्वी त्यांच्या पुढे स्तब्ध राहो.

  6. हबक्कूक ३:१सुमारे इ.स.पू. ६२६

    ही हबक्कूक संदेष्ट्याची प्रार्थना. शिगयोनोथच्या शैलीत.

  7. हबक्कूक ३:२सुमारे इ.स.पू. ६२६

    हे याहवेह, मी तुमची किर्ती ऐकली आहे; मी तुमच्या कृत्यामुळे भयप्रद झालो आहे. आमच्या दिवसातही त्या कार्याची पुनरावृत्ती करा, आमच्या काळात त्या प्रसिद्ध होऊ द्या; क्रोधित असतानाही कृपेची आठवण असू द्या.

  8. हबक्कूक ३:३सुमारे इ.स.पू. ६२६

    परमेश्वर तेमान वरून आले, परमपवित्र पारान पर्वतावरून आले. सेला त्याच्या गौरवाने आकाश व्यापून गेले आहे व पृथ्वी त्याच्या स्तुतीने भरून गेली आहे.

  9. हबक्कूक ३:४सुमारे इ.स.पू. ६२६

    त्यांचे तेज सूर्योदयेसारखे होते; किरणे त्यांच्या हातांतून चकाकत बाहेर निघत होती, जिथे त्यांचे सामर्थ्य लपलेले होते.

  10. हबक्कूक ३:५सुमारे इ.स.पू. ६२६

    महामारी त्यांच्या पुढे चालते; घातकी रोग त्यांच्यामागे चालतात.

  11. हबक्कूक ३:६सुमारे इ.स.पू. ६२६

    ते थांबले व त्यांनी पृथ्वीस हालवून टाकले; त्यांनी बघितले व देशास थरकाप आणला. पुरातन पर्वतांचा चुराडा झाला प्राचीन डोंगर ढासळले— परंतु ते सर्वकाळ मार्गस्थ आहेत.

  12. हबक्कूक ३:७सुमारे इ.स.पू. ६२६

    कूशानाचे तंबू पीडित झालेले मी बघितले, व मिद्यानाचे रहिवासी भयग्रस्त झालेले मी पाहिले.

  13. हबक्कूक ३:८सुमारे इ.स.पू. ६२६

    हे याहवेह, तुम्ही नद्यांवर संतापला होता काय? झऱ्यांविरुद्ध तुमचा कोप होता काय? जेव्हा जय मिळविण्यासाठी तुम्ही अश्वारूढ झालात व तुमच्या रथात स्वार झालात, तेव्हा तुम्ही समुद्राविरुद्ध क्रोधित झाला होता काय?

  14. हबक्कूक ३:९सुमारे इ.स.पू. ६२६

    तुम्ही तुमचे धनुष्य बाहेर काढले, व अनेक बाण मागविले. सेला नद्यांनी भूमी विभागली;

  15. हबक्कूक ३:१०सुमारे इ.स.पू. ६२६

    पर्वतांनी हे पाहिले आणि ते कंपित झाले. पाण्याचा प्रखर प्रवाह झपाट्याने आला; खोल समुद्र गरजला आणि त्याने आपल्या लाटा उंच उफाळल्या.

  16. हबक्कूक ३:११सुमारे इ.स.पू. ६२६

    तुमच्या झेप घेणाऱ्या बाणांच्या तेजाने विजेप्रमाणे चकाकणार्‍या तुमच्या भाल्याच्या प्रकाशाने सूर्य व चंद्र आकाशात स्तब्ध उभे राहिले.

  17. हबक्कूक ३:१२सुमारे इ.स.पू. ६२६

    क्रोधित होऊन तुम्ही पृथ्वीवर चालत गेला आणि संतापाने तुम्ही राष्ट्रांना पायदळी तुडविले.

  18. हबक्कूक ३:१३सुमारे इ.स.पू. ६२६

    तुम्ही आपल्या लोकांना तारण्यास व अभिषिक्तांना वाचविण्यासाठी बाहेर पडलात. तुम्ही दुष्ट भूमीच्या पुढाऱ्यांचा चुराडा केला आणि त्यांना डोक्यापासून पायांपर्यंत विवस्त्र केले. सेला

  19. हबक्कूक ३:१४सुमारे इ.स.पू. ६२६

    आमची दाणादाण करण्यासाठी त्यांचे योद्धे धावून आले, तेव्हा त्याने स्वतःच्याच भाल्याने आपले मस्तक छेदून घेतले, लपलेल्या दुष्टास जणू तो गिळंकृत करेल अशा हावरटपणाने तो आला.

  20. हबक्कूक ३:१५सुमारे इ.स.पू. ६२६

    तुमच्या घोड्यांनी समुद्रास असे तुडविले, की महाजलाशय घुसळले.

  21. हबक्कूक ३:१६सुमारे इ.स.पू. ६२६

    मी हे ऐकले आणि माझ्या हृदयात धडकी भरली, भीतीने माझे ओठ कापू लागले; माझ्या हाडात नाशाने प्रवेश केला, आणि माझे पाय थरथरू लागले. तरी देखील मी आमच्यावर आक्रमण करणाऱ्या देशावर येणाऱ्या संकटाच्या दिवसाची शांतपणे वाट पाहत राहीन.

  22. हबक्कूक ३:१७सुमारे इ.स.पू. ६२६

    अंजिरांची झाडे ना बहरली आणि द्राक्षलतांवर फळे राहिली नाहीत, जैतुनाचे सर्व पीक बुडाले आणि शेते नापीक झाली, जरी मेंढवाड्यात मेंढरे राहिली नाहीत, गोठ्यात गुरे नाहीत,

  23. हबक्कूक ३:१८सुमारे इ.स.पू. ६२६

    तरी मी याहवेहच्या ठायी आनंद करेन; मला तारण देणार्‍या परमेश्वराच्या ठायी मी हर्ष करेन.

  24. हबक्कूक ३:१९सुमारे इ.स.पू. ६२६

    सार्वभौम याहवेह माझे सामर्थ्य आहेत; मला उंची गाठण्यास समर्थ करण्यास ते माझी पावले हरणाच्या पावलांसारखी करतील. गायकवर्गाच्या संचालकास सूचना: हे कवन गाताना तंतुवाद्यांची साथ असावी.

  25. सफन्याह १:१सुमारे इ.स.पू. ६३०

    सफन्याहला, जो कूशीचा पुत्र, जो गदल्याहचा पुत्र, जो अमर्‍याहचा पुत्र, जो हिज्कीयाहचा पुत्र, यहूदीयाचा राजा योशीयाह, जो आमोनचा पुत्र होता, याच्या कारकिर्दीत याहवेहकडून आलेले वचन ते असे: