- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- हबक्कूक १:८सुमारे इ.स.पू. ६२६
त्यांचे घोडे चित्त्यांपेक्षा चपळ आहेत, संधिप्रकाशात फिरणार्या लांडग्यापेक्षाही ते उग्र आहेत. त्यांचे घोडदळ बेफामपणे पुढे धाव घेते; त्यांचे स्वार दूर देशातून येतात. भक्ष्यावर तुटून पडणाऱ्या गरुडांप्रमाणे ते झेप घेतात;
- हबक्कूक १:९सुमारे इ.स.पू. ६२६
हिंसाचार करण्याच्या योजनेनेच ते सर्व येतात, वाळवंटातील वावटळीप्रमाणे त्यांची टोळी येते आणि वाळूच्या कणांप्रमाणे ते बंदिवान गोळा करतात.
- हबक्कूक १:१०सुमारे इ.स.पू. ६२६
ते राजांचा उपहास करतात आणि अधिपतींची चेष्टा करतात. त्यांच्या सर्व तटबंदीच्या नगरांचे हंसे करतात; ते मातीचे ढिगारे उभे करून किल्ले काबीज करतात.
- हबक्कूक १:११सुमारे इ.स.पू. ६२६
वार्याप्रमाणे ते झपाट्याने येतात आणि पुढे निघून जातात— ते अपराधी लोक, ज्यांचे सामर्थ्य त्यांच्या दैवतांपासून आहे.”
- हबक्कूक १:१२सुमारे इ.स.पू. ६२६
हे याहवेह, तुम्ही अनादिकालापासून नाही का? माझ्या परमेश्वरा, माझ्या पवित्र परमेश्वरा, तुम्हाला कधीही मृत्यू येणार नाही. हे याहवेह, तुम्ही आमचा न्याय करण्यासाठी त्यांना निवडले आहे; आमच्या आश्रयाच्या खडका, तुम्ही शिक्षा देण्यासाठीच यांना नियुक्त केले आहे.
- हबक्कूक १:१३सुमारे इ.स.पू. ६२६
तुमची दृष्टी इतकी पवित्र आहे की ती कोणतीही दुष्टता पाहू शकत नाही; तुम्ही कोणत्याही स्वरुपातील पातक सहन करू शकत नाही. मग या विश्वासघातकी लोकांना तुम्ही कसे सहन करता? जेव्हा दुष्ट लोक त्यांच्याहून नीतिमान लोकांना गिळंकृत करतात, तेव्हा तुम्ही स्तब्ध कसे राहता?
- हबक्कूक १:१४सुमारे इ.स.पू. ६२६
तुम्ही लोकांना समुद्रातील माशाप्रमाणे बनविले आहे, जसे काही समुद्री जीव, ज्यांचा कोणी शासक नसतो.
- हबक्कूक १:१५सुमारे इ.स.पू. ६२६
दुष्ट शत्रू गळ टाकतो व त्यांना वर ओढतो, तो त्यांना जाळ्यात पकडतो, मग तो त्यांना त्याच्या अडणीजाळ्यात जमा करतो, आणि तो आनंदित व उल्हासित होतो.
- हबक्कूक १:१६सुमारे इ.स.पू. ६२६
म्हणून तो आपल्या जाळ्यास अर्पणे वाहतो व अडणीजाळ्यापुढे धूप जाळतो, कारण त्याच्या जाळ्यामुळेच तो धनवान होतो आणि आपल्या मनपसंद भोजनाचा आस्वाद घेतो.
- हबक्कूक १:१७सुमारे इ.स.पू. ६२६
तो सर्वकाळ असेच जाळे रिकामे करीत राहणार आहे काय, निर्दयीपणे देशांना नष्ट करीत राहणार आहे काय?
- हबक्कूक २:१सुमारे इ.स.पू. ६२६
मी पहारा देण्यासाठी उभा राहीन आणि टेहळणीच्या बुरुजावर चढेन; मी बघेन व ते मला काय उत्तर देतात हे पाहेन आणि या तक्रारीला मी काय उत्तर द्यावे ते पाहेन.
- हबक्कूक २:२सुमारे इ.स.पू. ६२६
तेव्हा याहवेहने उत्तर दिले: “हे प्रगटीकरण लिही आणि सरळ स्वरुपात एका फळ्यावर लिही म्हणजे घोषणा करणारा धावतांनाही वाचू शकेल.
- हबक्कूक २:३सुमारे इ.स.पू. ६२६
कारण प्रगटीकरण त्याच्या नियोजित वेळेची वाट पाहते; ते अंत समयाबद्धल बोलते आणि ते खोटे ठरत नाही. जरी ते विलंबित होते, तरी त्याची वाट पाहा; ते निश्चितच येईल आणि त्याला उशीर होणार नाही.
- हबक्कूक २:४सुमारे इ.स.पू. ६२६
“बघ, शत्रू फुशारक्या मारत आहे; त्याच्या इच्छा दुष्ट आहेत— पण नीतिमान व्यक्ती त्याच्या विश्वासयोग्यतेमुळे जगेल.
- हबक्कूक २:५सुमारे इ.स.पू. ६२६
खरोखर, मद्य त्यांचा घात करते; तो उन्मत्त आहे व त्याला कधीही चैन पडत नाही. कारण तो कबरेसारखा लोभी आहे आणि मृत्यूप्रमाणे तो कधीही समाधानी होत नाही, तो अनेक राष्ट्रे गोळा करीत आहे, आणि सर्व लोकांना बंदिवान करीत आहे.
- हबक्कूक २:६सुमारे इ.स.पू. ६२६
“ते सगळे त्याचा उपहास व अपमान करून टोमणा मारून म्हणणार नाहीत काय, “ ‘जो चोरीच्या सामानाचे ढीग लावतो आणि अवैध कामे करून स्वतःला धनवान बनवितो, त्याचा धिक्कार असो! हे असे केव्हापर्यंत चालत राहणार?’
- हबक्कूक २:७सुमारे इ.स.पू. ६२६
तुमचे कर्जदाते अचानक तुमच्यापुढे येणार नाहीत काय? ते उठून तुमचा थरकाप करणार नाहीत काय? मग तुम्ही त्यांचे सावज बनाल.
- हबक्कूक २:८सुमारे इ.स.पू. ६२६
कारण तुम्ही पुष्कळ राष्ट्रांची लूट केली आहे, मग जे राहिलेले लोक आहेत, ते तुमची लूट करतील. तुम्ही मनुष्यांचे रक्त वाहिले आहे; तुम्ही देश व नगरांचा आणि त्यात राहणाऱ्या प्रत्येकाचा नाश केला.
- हबक्कूक २:९सुमारे इ.स.पू. ६२६
“धिक्कार असो त्याचा, जो अन्यायाच्या कमाईने त्याचे घर बांधतो, विनाशापासून पळ काढावा म्हणून जो उंच ठिकाणी आपले घरटे बांधतो!
- हबक्कूक २:१०सुमारे इ.स.पू. ६२६
तुम्ही अनेक लोकांच्या नाशाचे कारस्थान करून, व घराचे दार इतरांकरिता बंद करून, स्वतःचा जीव गमाविला.
- हबक्कूक २:११सुमारे इ.स.पू. ६२६
खुद्द तुमच्या घरातील भिंतीचे दगडच आक्रोश करतील, आणि छताच्या तुळया तो प्रतिध्वनित करतील.
- हबक्कूक २:१२सुमारे इ.स.पू. ६२६
“धिक्कार असो, जो रक्तपात करून शहरे बांधतो आणि अन्यायाने नगर वसवितो!
- हबक्कूक २:१३सुमारे इ.स.पू. ६२६
लोकांचे कष्ट अग्नीत घालण्याचे सरपण होणे, आणि देशांनी केलेले सर्व श्रम व्यर्थच जावे असे सर्वसमर्थ याहवेहनी निर्धारित केले नाही काय?
- हबक्कूक २:१४सुमारे इ.स.पू. ६२६
कारण समुद्र जसा पाण्याने व्यापलेला आहे तशीच पृथ्वी याहवेहच्या गौरवाच्या ज्ञानाने भरून जाईल.
- हबक्कूक २:१५सुमारे इ.स.पू. ६२६
“धिक्कार असो तुला, जो शेजाऱ्यास मद्य पाजतो, ते मद्यधुंद होईपर्यंत थेट पखालीतून ओतून पाजतो, म्हणजे तो त्यांची विवस्त्र शरीरे पाहू शकेल!