- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- सफन्याह २:९सुमारे इ.स.पू. ६३०
म्हणून माझ्या जिवाची शपथ,” इस्राएलचे परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात. “निश्चितच मोआब हा सदोमासारखा, अम्मोनी गमोरासारखा होईल तण वाढलेले ठिकाण व मिठाची आगरे कायमची ओसाड ठिकाणे होतील. माझे अवशिष्ट लोक त्यांची लूट करतील; माझे अवशिष्ट राष्ट्र त्यांच्या भूमीचे वारस बनतील.”
- सफन्याह २:१०सुमारे इ.स.पू. ६३०
त्यांना त्यांच्या गर्विष्ठपणाचे हे प्रतिफळ मिळेल. कारण त्यांनी सर्वसमर्थ याहवेहच्या लोकांचा अपमान व उपहास केला.
- सफन्याह २:११सुमारे इ.स.पू. ६३०
जेव्हा याहवेह पृथ्वीवरील सर्व दैवतांचा नाश करतील, तेव्हा याहवेह त्यांना भयावह वाटतील. दूरदेशातील सर्व राष्ट्रे आपआपल्या भूमीवर त्यांच्यापुढे नतमस्तक होतील.
- सफन्याह २:१२सुमारे इ.स.पू. ६३०
“अहो कूशी लोकांनो, तुमचाही माझ्या तलवारीने वध होईल.”
- सफन्याह २:१३सुमारे इ.स.पू. ६३०
ते उत्तरेविरुद्ध आपला हात उगारतील आणि अश्शूरचा नाश करतील, निनवेह नगरीस ते पूर्णपणे ओसाड आणि वाळवंटाप्रमाणे शुष्क ठिकाण करतील.
- सफन्याह २:१४सुमारे इ.स.पू. ६३०
कळप व मेंढरे सर्व राष्ट्रांचे प्राणी तिथे विश्रांती घेतील. तिथे वाळवंटातील घुबडे व कर्कश किंचाळणारी घुबडे तिच्या स्तंभावर निवारा घेतील. घुबडांची घूं घूं खिडक्यांमधून प्रतिध्वनित होईल, तिची प्रवेशद्वारे दगडविटांच्या तुकड्यांनी भरलेली असतील, देवदारूचे स्तंभ उघडे बोडके होतील.
- सफन्याह २:१५सुमारे इ.स.पू. ६३०
ही नगरी चैनबाजी करणारी, सुरक्षितेत वसणारी होती. ती स्वतःशी म्हणत असे, “मी एकटीच आहे, माझ्यासारखी नगरी जगात दुसरी नाही.” पण आता तिची कशी भग्नावस्था झाली आहे, जंगली श्वापदे राहण्याचे ठिकाण! तिच्याजवळून जाणारे सर्वजण तिचा उपहास करून त्यांचे डोके हलवितात.
- सफन्याह ३:१सुमारे इ.स.पू. ६३०
हे जुलमी लोकांच्या नगरी, विद्रोही व भ्रष्ट नगरी, तुला धिक्कार असो!
- सफन्याह ३:२सुमारे इ.स.पू. ६३०
ती कोणाचीही आज्ञा पाळत नाही, ती कोणतीही सुधारणा स्वीकारत नाही. ती याहवेहवर विश्वास ठेवीत नाही, ती तिच्या परमेश्वराच्या समीप जात नाही.
- सफन्याह ३:३सुमारे इ.स.पू. ६३०
तिच्यामध्ये असलेले तिचे अधिकारी गर्जना करणार्या सिंहासारखे आहेत; तिचे शासनकर्ते निशाचर लांडगे आहेत ते सकाळपर्यंत काहीही शिल्लक राहू देत नाहीत.
- सफन्याह ३:४सुमारे इ.स.पू. ६३०
तिचे संदेष्टे अधर्म करणारे आहेत; ते विश्वासघातकी लोक आहेत. तिचे याजक मंदिर अपवित्र करतात ते आज्ञेचे उल्लंघन करतात.
- सफन्याह ३:५सुमारे इ.स.पू. ६३०
परंतु तिच्यात असणारे याहवेह नीतिमान आहेत; ते काहीही अयोग्य करीत नाहीत. प्रतिदिन सकाळी ते त्यांचे न्यायदान करतात, आणि कोणत्याही नवदिनी ते असफल होत नाहीत, तरी अधर्म्यांना लाज काय ते ठाऊकच नाही.
- सफन्याह ३:६सुमारे इ.स.पू. ६३०
“मी अनेक राष्ट्रांचा नाश केला; त्यांच्या गडांना उद्ध्वस्त केले आहे. मी त्यांचे रस्ते ओसाड केले आहेत तिथून कोणीही प्रवास करीत नाही. आणि त्यांची शहरे निर्जन केली आहेत; ते त्यागलेले व रिकामे झाले आहेत.
- सफन्याह ३:७सुमारे इ.स.पू. ६३०
यरुशलेमबद्दल मी विचार केला, ‘निश्चितच तू माझे भय धरशील; आणि माझ्या सुधारणांचा स्वीकार करशील!’ तेव्हा तिचे आश्रयस्थान उद्ध्वस्त होणार नाही. माझ्या सर्व शिक्षा तिच्यावर येणार नाहीत, पण तरीही पूर्वीसारखीच भ्रष्टाचारी दुष्कर्मे करण्यास ती उत्सुक आहे.”
- सफन्याह ३:८सुमारे इ.स.पू. ६३०
याहवेह जाहीर करतात, “म्हणून माझी वाट पाहा, त्या दिवशी मी दोषारोप करण्यास उभा राहीन. पृथ्वीवरील सर्व राज्ये व राष्ट्रे एकत्र करण्याचा मी निर्धार केला आहे आणि त्यांच्यावर माझ्या कोपाचा वर्षाव करेन; माझ्या अत्यंत तीव्र क्रोधाग्नीने आणि माझ्या ईर्षेच्या अग्नीने संपूर्ण विश्व जळून भस्म होईल.
- सफन्याह ३:९सुमारे इ.स.पू. ६३०
“मग मी त्यांच्या ओठांचे शुद्धीकरण करेन, असे की ते सर्व याहवेहच्या नामाचा धावा करतील आणि खांद्याला खांदा लावून त्यांची सेवा करतील.
- सफन्याह ३:१०सुमारे इ.स.पू. ६३०
कूश देशाच्या नद्यांपलीकडून माझे उपासक, माझे विखुरलेले लोक माझ्यासाठी अर्पणे आणतील.
- सफन्याह ३:११सुमारे इ.स.पू. ६३०
त्या दिवशी तू यरुशलेमा, माझ्याविरुद्ध जे काही दुष्कृत्य केलेस, त्याबद्दल तू लज्जित केली जाणार नाही, तेव्हा तू माझ्याविरुद्ध बंड करणारी अशी राहणारच नाहीस. कारण मी तुझ्यातील सर्व गर्वाने उन्मत्त झालेली माणसे काढून टाकेन. माझ्या पवित्र पर्वतावर पुन्हा कधीही गर्विष्ठपणा केला जाणार नाही.
- सफन्याह ३:१२सुमारे इ.स.पू. ६३०
मी तुझ्यामध्ये जे गरीब व दीन, असेच अवशिष्ट लोक ठेवेन. इस्राएलचे अवशिष्ट लोक असतील आणि ते याहवेहच्या नामात आश्रय घेतील.
- सफन्याह ३:१३सुमारे इ.स.पू. ६३०
इस्राएलमधील उरलेले कोणतेही दुष्कृत्य करणार नाहीत; ते असत्य बोलणार नाहीत. लबाडी करणारी जीभ त्यांच्या मुखात असणार नाही. ते अन्न सेवन करून विसावा घेतील आणि त्यांना कोणीही भीती दाखविणार नाही.”
- सफन्याह ३:१४सुमारे इ.स.पू. ६३०
हे सीयोनकन्ये, तू गीत गा; हे इस्राएला, तू मोठ्याने गजर कर! अगे यरुशलेमकन्ये, अगदी मनापासून आनंद कर, उल्लास कर.
- सफन्याह ३:१५सुमारे इ.स.पू. ६३०
कारण याहवेहने तुझी शिक्षा काढून घेतली आहे, तुझ्या शत्रूचे सैन्य परत गेले आहे. याहवेह, इस्राएलचे राजा तुझ्यासह आहेत; यापुढे हानीचे भय तू बाळगणार नाही.
- सफन्याह ३:१६सुमारे इ.स.पू. ६३०
त्या दिवशी ते यरुशलेमला असे म्हणतील, “हे सीयोना, भिऊ नकोस, तुझे बाहू दुर्बल होऊ देऊ नकोस.
- सफन्याह ३:१७सुमारे इ.स.पू. ६३०
महाप्रतापी योद्धा जे रक्षणकर्ता आहेत, ते याहवेह तुझे परमेश्वर तुझ्यासह आहेत. त्यांना तुझ्यामुळे अत्यंत आनंद होतो; तुझ्यावरील प्रीतीमुळे ते तुजवर दोषारोपण करणार नाहीत. त्याऐवजी तुझ्याबद्दल ते गीत गाऊन उल्हास व्यक्त करतील.”
- सफन्याह ३:१८सुमारे इ.स.पू. ६३०
“जे निर्धारित सण तुझ्याकरिता ओझे व कलंक आहेत, ते सण साजरे करता आले नाही म्हणून जे लोक शोक करतात, त्या सर्वांना मी तुझ्यामधून काढून टाकेन.