मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात, ‘सध्याच्या या भवनाचे वैभव पहिल्या भवनाच्या वैभवापेक्षा श्रेष्ठ असेल, या स्थळात मी शांती बहाल करेन,’ असे सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात.”

  2. दारयावेश राजाच्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षी, नवव्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी, संदेष्टा हाग्गयद्वारे याहवेहचे हे वचन आले:

  3. “सर्वसमर्थ याहवेहचे असे म्हणणे आहे: ‘याजकांना विचार नियमशास्त्र काय म्हणते:

  4. तुमच्यापैकी कोणी आपल्या झग्यामध्ये पवित्र मांस घेऊन जात असेल आणि त्यावेळी त्याच्या झग्याचा स्पर्श भाकर, द्राक्षारस अथवा मांस यांना झाला, तर स्पर्श झालेला पदार्थ पवित्र होईल काय?’ ” त्यावर याजकांनी उत्तर दिले, “नाही.”

  5. मग हाग्गयाने त्यांना विचारले, “समजा, कोणी एखाद्या प्रेताला शिवले आणि विधिनियमानुसार तो अपवित्र झाला आणि नंतर त्याचा स्पर्श या वस्तूंना झाला, तर ते अपवित्र होते काय?” याजकांनी उत्तर दिले, “होय, ते अपवित्र होते.”

  6. नंतर हाग्गयने म्हटले, “ ‘तर हे लोक व हे राष्ट्र माझ्या नजरेत हे असेच आहे,’ याहवेह जाहीर करतात. ‘ते जे काही करतात व जी अर्पणे आणता ती अपवित्र असतात.

  7. “ ‘आता तुम्ही आजपासून गंभीरपणे याचा विचार करा; याहवेहचे मंदिर बांधण्यास आरंभ केला तेव्हा एका दगडावर दुसरा दगड ठेवीपर्यंत सर्व परिस्थिती कशी होती.

  8. जेव्हा कोणी वीस मापे धान्याच्या राशीची अपेक्षा केल्यास, तिथे फक्त दहा मापेच धान्य मिळत असे. जर कोणी द्राक्षकुंडातून पन्नास मापे द्राक्षारस काढला, तर त्याला वीसच मापे मिळत असे.

  9. तुमच्या हाताच्या सर्व कार्यास मी तांबेरा, भेरड आणि गारांनी फटका दिला, तरीही तुम्ही माझ्याकडे परत येण्याचे नाकारले,’ असे याहवेह जाहीर करतात.

  10. ‘आजपासून म्हणजे नवव्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी, ज्या दिवशी याहवेहच्या मंदिराचा पाया घालण्याचे काम पूर्ण झाले, त्या दिवसाचा गंभीरपणे विचार करा. गंभीरपणे विचार करा:

  11. धान्याच्या कणगीत एक तरी धान्यकण उरला आहे का? आतापर्यंत द्राक्षवेल, अंजिराच्या झाडाला, डाळिंबाला आणि जैतुनाच्या झाडाला फळे लागलीच नाहीत. “ ‘आजपासून मी तुम्हाला आशीर्वाद देईन.’ ”

  12. त्या महिन्याच्या चोविसाव्या दिवशी याहवेहकडून हाग्गयला दुसऱ्यांदा वचन आले:

  13. “यहूदीयाचा राज्यपाल जरूब्बाबेलला सांग, मी आकाश व पृथ्वी हलवून सोडणार आहे.

  14. सर्व राष्ट्रांमधील राजासने उलथून टाकेन व परकियांचे सामर्थ्य डळमळीत करणार आहे. मी त्यांचे रथ व त्यांचे सारथी उलथून टाकेन; घोडे व त्यावरील स्वार पडतील, प्रत्येकजण त्याच्या भावाच्या तलवारीने पडेल.

  15. “ ‘त्या दिवशी माझ्या सेवका,’ सर्वसमर्थ याहवेह म्हणतात, ‘हे शल्तीएलचा पुत्र जरूब्बाबेला, मी तुला माझ्या बोटातील मुद्रेची अंगठी करेन; कारण मी तुला निवडले आहे,’ असे याहवेह जाहीर करतात.”

  16. दारयावेश राजाच्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षी आठव्या महिन्यात इद्दोचा नातू व बेरेख्याहचा पुत्र, संदेष्टा जखर्‍याहला याहवेहकडून हे वचन प्राप्त झाले:

  17. “याहवेह तुमच्या पूर्वजांवर अत्यंत क्रोधित झाले होते.

  18. म्हणून लोकांना सांग: सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: ‘तुम्ही माझ्याकडे परत या आणि मी तुम्हाकडे परत येईन,’ सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात.

  19. तुमच्या पूर्वजांसारखे तुम्ही होऊ नका, ज्यांना पूर्वीच्या संदेष्ट्यांनी घोषणा केली: ‘आपल्या दुष्ट मार्गापासून व दुष्ट प्रथांपासून मागे वळा.’ पण त्यांनी माझे ऐकले नाही वा त्याच्याकडे लक्ष दिले नाही, याहवेह जाहीर करतात.

  20. तुमचे पूर्वज कुठे आहेत? आणि संदेष्टे, ते कायमचे जगतात का?

  21. पण माझी वचने व माझे नियम जे मी माझ्या सेवक संदेष्ट्यांना आज्ञापिले होते, त्यांनी तुमच्या पूर्वजांना मागे टाकले आहे ना? “तेव्हा त्यांनी पश्चात्ताप केला व ते म्हणाले, ‘आमचे वागणे व प्रथांमुळे याहवेहकडून आम्हाला जी शिक्षा मिळाली, त्यास आम्ही पात्र आहोत. जी करण्याचा त्यांनी निर्धार केला होता.’ ”

  22. जखऱ्याह १:७सुमारे इ.स.पू. ५१९

    दारयावेश राजाच्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षी वर्षाच्या अकराव्या महिन्यातील चोविसाव्या दिवशी, शबात महिन्यात, संदेष्टा जखर्‍याह, बेरेख्याहचा पुत्र व इद्दोचा नातू याला याहवेहचे वचन प्राप्त झाले.

  23. जखऱ्याह १:८सुमारे इ.स.पू. ५१९

    रात्रीच्या वेळी मला एक दृष्टान्त मिळाला, एका तांबड्या घोड्यावर एक मनुष्य बसलेला मी पाहिला. तो एका खोऱ्यात मेंदीच्या झुडपांमध्ये उभा होता. त्याच्या पाठीमागे तांबडे, तपकिरी व पांढरे असे दुसरे घोडे होते.

  24. जखऱ्याह १:९सुमारे इ.स.पू. ५१९

    मी विचारले, “माझ्या प्रभू, हे सर्व काय आहे?” एक स्वर्गदूत जो माझ्याशी बोलत होता, त्याने उत्तर दिले, “ते काय आहे हे मी तुला दाखवेन.”

  25. जखऱ्याह १:१०सुमारे इ.स.पू. ५१९

    मग मेंदीच्या झुडपांमध्ये उभे असलेल्या मनुष्याने सांगितले, “याहवेहने यांना संपूर्ण पृथ्वीवरून फेरी मारण्याकरिता पाठविले आहे.”