- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- जखऱ्याह १:११सुमारे इ.स.पू. ५१९
मग त्यांनी मेंदीच्या झुडपांमध्ये उभ्या असलेल्या याहवेहच्या दूताला वृतांत सांगितला, “आम्ही सर्व पृथ्वीवरून फिरून आलो आहोत आणि संपूर्ण जगात विश्रांती व शांतता नांदत आहे.”
- जखऱ्याह १:१२सुमारे इ.स.पू. ५१९
मग याहवेहच्या दूताने म्हटले: “हे सर्वसमर्थ याहवेह, गेली सत्तर वर्षे तुम्ही यरुशलेम व यहूदीयाच्या नगरांवर संतापलेले आहात, त्यांच्यावर दया करण्याचे तुम्ही किती वेळ नाकारणार आहात?”
- जखऱ्याह १:१३सुमारे इ.स.पू. ५१९
तेव्हा माझ्याशी संवाद करीत असलेल्या दूताला याहवेहने सांत्वनपर व आश्वासनदायक उत्तर दिले.
- जखऱ्याह १:१४सुमारे इ.स.पू. ५१९
मग माझ्याशी संवाद करीत असलेला याहवेहचा स्वर्गदूत म्हणाला, “या वचनाची घोषणा कर: सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: ‘मी यरुशलेम व सीयोनाबाबत अत्यंत ईर्ष्यावान आहे,
- जखऱ्याह १:१५सुमारे इ.स.पू. ५१९
ज्या अन्य राष्ट्रांना सुरक्षित वाटते त्यांच्यावर मी फार क्रोधित झालो आहे, कारण आधी मी माझ्या लोकांवर थोडा नाराज होतो, पण त्यांना शिक्षा देण्याचा अधिकार मिळालेली राष्ट्रे मर्यादेपलिकडे गेली.’
- जखऱ्याह १:१६सुमारे इ.स.पू. ५१९
“म्हणून याहवेह असे म्हणतात: ‘मी करुणायुक्त होऊन यरुशलेमकडे परत येईन आणि तिथे माझे भवन पुन्हा बांधले जाईल आणि मापनपट्टी यरुशलेमवर ताणली जाईल,’ असे सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात.
- जखऱ्याह १:१७सुमारे इ.स.पू. ५१९
“आणखी पुढे घोषणा करा: सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: ‘माझी नगरे पुन्हा समृद्धीने ओसंडून वाहू लागतील आणि याहवेह पुन्हा सीयोनाचे सांत्वन करतील आणि यरुशलेमची निवड करतील.’ ”
- जखऱ्याह १:१८सुमारे इ.स.पू. ५१९
नंतर मी वर पाहिले तर मला चार शिंगे दिसली.
- जखऱ्याह १:१९सुमारे इ.स.पू. ५१९
मी माझ्याशी संवाद करीत असलेल्या दूताला विचारले, “हे काय आहे?” त्याने उत्तर दिले, “ही शिंगे आहेत, ज्यांनी यहूदीया, इस्राएल आणि यरुशलेम येथील लोकांची पांगापांग केली.”
- जखऱ्याह १:२०सुमारे इ.स.पू. ५१९
नंतर याहवेहने मला चार शिल्पकार दाखविले.
- जखऱ्याह १:२१सुमारे इ.स.पू. ५१९
तेव्हा मी विचारले, “हे काय करण्यासाठी आले आहेत?” तेव्हा याहवेहच्या दूताने उत्तर दिले, “ही ती चार शिंगे आहेत ज्यांनी यहूदीयाची इतकी पांगापांग केली, की कोणीही आपले मस्तक वर उचलू शकले नाही, पण हे शिल्पकार त्या चार शिंगांना पकडून भयभीत करून व यहूदीयाविरुद्ध आपली शिंगे उंच करून तिच्या लोकांची पांगापांग करणाऱ्या राष्ट्रांना फेकून देण्यासाठी आले आहेत.”
- जखऱ्याह २:१सुमारे इ.स.पू. ५१९
मग मी वर पाहिले, तेव्हा माझ्यासमोर हातात मापनपट्टी घेतलेला एक मनुष्य मला दिसला.
- जखऱ्याह २:२सुमारे इ.स.पू. ५१९
मी त्याला विचारले, “तू कुठे जात आहेस?” तो म्हणाला, “मी यरुशलेमेचे मोजमाप घेण्यासाठी चाललो आहे. ती किती लांब व किती रुंद आहे हे मला पाहावयाचे आहे.”
- जखऱ्याह २:३सुमारे इ.स.पू. ५१९
आणि पाहा, जो स्वर्गदूत माझ्याशी बोलत होता तो जाऊ लागला, तेव्हा दुसरा एक स्वर्गदूत त्याला भेटण्यास आला.
- जखऱ्याह २:४सुमारे इ.स.पू. ५१९
व त्याला म्हणाला: “पळत जा आणि त्या तरुणाला सांग, की यरुशलेम तटबंदी नसलेले नगर होईल कारण तिथे असंख्य लोक व जनावरे असतील.
- जखऱ्याह २:५सुमारे इ.स.पू. ५१९
आणि मी स्वतः त्याभोवती अग्नीचा कोट होईन व आत त्या नगरीचे वैभव होईन,” असे याहवेह जाहीर करतात.
- जखऱ्याह २:६सुमारे इ.स.पू. ५१९
“चला! चला! उत्तरेकडील देशांमधून बाहेर पळा, कारण मी तुम्हाला स्वर्गातील वाऱ्याच्या चारही दिशांना विखुरले आहे,” असे याहवेह जाहीर करतात.
- जखऱ्याह २:७सुमारे इ.स.पू. ५१९
“चल सीयोने! जी तू बाबेल कन्येत राहते!”
- जखऱ्याह २:८सुमारे इ.स.पू. ५१९
सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात, “गौरवशाली प्रभूने तुम्हाला लूटणाऱ्या राष्ट्राविरुद्ध मला पाठविले—जो कोणी तुम्हाला स्पर्श करतो, तो याहवेहच्या डोळ्यातील बुबुळाला स्पर्श करतो—
- जखऱ्याह २:९सुमारे इ.स.पू. ५१९
मी निश्चितच त्यांच्याविरुद्ध माझा हात उगारेन, म्हणजे त्यांचेच गुलाम त्यांची लुटालूट करतील. मग तुम्हाला कळेल की सर्वसमर्थ याहवेहने मला पाठविले आहे.
- जखऱ्याह २:१०सुमारे इ.स.पू. ५१९
“अगे सीयोनकन्ये, गीत गा आणि उल्हास कर! कारण मी येत आहे आणि मी तुम्हामध्ये वस्ती करेन,” याहवेह जाहीर करतात.
- जखऱ्याह २:११सुमारे इ.स.पू. ५१९
“त्या दिवसात अनेक राष्ट्रे याहवेहकडे वळतील. मी तुम्हामध्ये वस्ती करेन मग तुम्हाला कळेल की सर्वसमर्थ याहवेहने मला पाठविले आहे.
- जखऱ्याह २:१२सुमारे इ.स.पू. ५१९
आणि यहूदीया ही पवित्र भूमी याहवेहचे वतन होईल, आणि ते पुन्हा यरुशलेमला निवडतील.
- जखऱ्याह २:१३सुमारे इ.स.पू. ५१९
हे सर्व मानवजाती, याहवेहपुढे स्तब्ध राहा, कारण ते आपल्या पवित्र निवासस्थानातून जागृत झाले आहेत.”
- जखऱ्याह ३:१सुमारे इ.स.पू. ५१९
नंतर प्रमुख याजक यहोशुआ हा याहवेहच्या दूतापुढे उभा असल्याचे दूताने मला दाखविले आणि सैतान ही तिथे दूताच्या उजव्या बाजूला होता आणि तो यहोशुआवर आरोप करीत होता.