- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- जखऱ्याह ५:३सुमारे इ.स.पू. ५१९
मग तो मला म्हणाला, “हा तो शाप आहे, जो या सर्व भूमीवर येणार आहे; चर्मपत्राच्या गुंडाळीच्या एका बाजूस जे लिहिलेले आहे ते असे, देशातून प्रत्येक चोर घालवून दिला जाईल आणि दुसर्या बाजूस म्हटले आहे, जो कोणी शपथ घेऊन खोटे बोलतो, त्या दोषीलाही देशातून घालवून दिले जाईल.
- जखऱ्याह ५:४सुमारे इ.स.पू. ५१९
सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात, ‘मी हा शाप पाठवेन, तो प्रत्येक चोराच्या घरात व माझ्या नावाने खोटी शपथ वाहणार्या प्रत्येकाच्या घरात प्रवेश करेल. तो त्या घरावर राहील आणि त्याचे लाकूड व दगडासहित सर्वाचा संपूर्ण नाश करेल.’ ”
- जखऱ्याह ५:५सुमारे इ.स.पू. ५१९
मग जो स्वर्गदूत माझ्याशी बोलत होता तो पुढे आला आणि मला म्हणाला, “वर पाहा आणि बघ काय प्रगट होत आहे.”
- जखऱ्याह ५:६सुमारे इ.स.पू. ५१९
मी विचारले, “ते काय आहे?” “त्याने उत्तर दिले, ती एक टोपली आहे.” तो पुढे बोलला, “ती संपूर्ण देशातील लोकांची पातके आहेत.”
- जखऱ्याह ५:७सुमारे इ.स.पू. ५१९
मग तिचे शिसाचे झाकण वर उघडले गेले आणि त्या टोपलीच्या आत बसलेली एक स्त्री मला दिसली!
- जखऱ्याह ५:८सुमारे इ.स.पू. ५१९
याहवेहचा स्वर्गदूत म्हणाला, “ती दुष्टाई आहे.” असे म्हणून त्याने तिला पुन्हा त्या टोपलीत ढकलले आणि त्या टोपलीचे शिसाचे झाकण बंद केले.
- जखऱ्याह ५:९सुमारे इ.स.पू. ५१९
मग मी वर बघितले—आणि मला दोन स्त्रिया उडतांना दिसल्या, त्यांच्या पंखात वारा भरलेला होता! त्यांचे पंख करकोचाच्या पंखांप्रमाणे होते आणि त्यांनी ती टोपली आकाश व पृथ्वीच्या मध्ये उचलली.
- जखऱ्याह ५:१०सुमारे इ.स.पू. ५१९
तेव्हा जो स्वर्गदूत माझ्याशी बोलत होता त्याला मी विचारले, “ती टोपली त्या कुठे नेत आहेत?”
- जखऱ्याह ५:११सुमारे इ.स.पू. ५१९
त्याने उत्तर दिले, “शिनार देशात, तिच्याकरिता घर बांधण्यासाठी. जेव्हा घर तयार होईल, तेव्हा ही टोपली त्यामध्ये तिच्या ठिकाणी ठेवण्यात येईल.”
- जखऱ्याह ६:१सुमारे इ.स.पू. ५१९
मग मी पुन्हा वर पाहिले, तो दोन पर्वतांमधून चार रथ येत असलेले मला दिसले. ते पर्वत कास्याचे होते.
- जखऱ्याह ६:२सुमारे इ.स.पू. ५१९
पहिला रथ तांबडे घोडे ओढीत होते, दुसरा रथ काळे घोडे ओढीत होते,
- जखऱ्याह ६:३सुमारे इ.स.पू. ५१९
तिसरा रथ पांढरे घोडे, तर चौथा रथ पंचरंगी घोडे ओढीत होते.
- जखऱ्याह ६:४सुमारे इ.स.पू. ५१९
तेव्हा मी जो स्वर्गदूत माझ्याशी बोलत होता, त्याला विचारले, “प्रभू, हे काय आहेत?”
- जखऱ्याह ६:५सुमारे इ.स.पू. ५१९
देवदूताने मला उत्तर दिले, “अखिल पृथ्वीच्या प्रभूच्या समोर उभे राहणारे हे चार स्वर्गीय आत्मे आहेत, ते तिथून बाहेर जात आहेत.
- जखऱ्याह ६:६सुमारे इ.स.पू. ५१९
काळ्या घोड्यांचा रथ उत्तरेला जाईल आणि पांढर्या घोड्यांचा रथ पश्चिमेकडे, पंचरंगी घोड्यांचा रथ दक्षिणेकडे जाईल.”
- जखऱ्याह ६:७सुमारे इ.स.पू. ५१९
जेव्हा ते शक्तिशाली घोडे निघाले, ते संपूर्ण पृथ्वीवर जाण्यास आतुर झाले होते आणि तो त्यांना म्हणाला, “संपूर्ण पृथ्वीवर जा!” तेव्हा ते संपूर्ण पृथ्वीवर गेले.
- जखऱ्याह ६:८सुमारे इ.स.पू. ५१९
मग त्याने मला बोलाविले आणि तो मला म्हणाला, “जे उत्तरेला गेले, त्यांनी उत्तरेकडील भूमीला माझ्या आत्म्याची शांती दिली आहे.”
- जखऱ्याह ६:९सुमारे इ.स.पू. ५१९
याहवेहचे वचन माझ्याकडे आले:
- जखऱ्याह ६:१०सुमारे इ.स.पू. ५१९
“हेल्दय, तोबीयाह व यदायाह यांनी बाबेलमध्ये बंदिवासात असलेल्या यहूदी लोकांकडून आणलेले रुपे व सोने घे. त्याच दिवशी तू सफन्याहचा पुत्र योशीयाहच्या घरी जा.
- जखऱ्याह ६:११सुमारे इ.स.पू. ५१९
रुपे व सोने घेऊन त्यांचा एक मुकुट तयार कर. मग तो मुकुट यहोसादाकाचा पुत्र, प्रमुख याजक यहोशुआच्या मस्तकावर ठेव.
- जखऱ्याह ६:१२सुमारे इ.स.पू. ५१९
त्याला सांग की सर्वसमर्थ याहवेह म्हणतात, ‘हा तो पुरुष आहे, ज्याचे नाव “शाखा” आहे, जो त्याच्या ठिकाणापासून शाखा काढेल आणि याहवेहचे मंदिर बांधेल.
- जखऱ्याह ६:१३सुमारे इ.स.पू. ५१९
तो याहवेहचे मंदिर बांधेल व तो वैभवशाली वस्त्र परिधान करेल आणि राजासनावर बसेल व राज्य करेल. तो त्याच्या सिंहासनावर याजक होईल आणि या दोघात समन्वय होईल.’
- जखऱ्याह ६:१४सुमारे इ.स.पू. ५१९
हेलेम, तोबीयाह आणि यदायाह आणि सफन्याहचा पुत्र हेन, यांना याहवेहच्या मंदिराचे स्मृतिचिन्ह म्हणून मुकुट देण्यात येईल.
- जखऱ्याह ६:१५सुमारे इ.स.पू. ५१९
दूरवर असलेले लोकही येतील व याहवेहचे मंदिर बांधण्यासाठी मदत करतील, तेव्हा तुला कळेल की सर्वसमर्थ याहवेहनी मला तुझ्याकडे पाठवले आहे. तुझे परमेश्वर याहवेह त्यांच्या आज्ञा तू काळजीपूर्वक पाळशील तरच हे घडेल.”
- जखऱ्याह ७:१सुमारे इ.स.पू. ५१८
दारयावेश राजाच्या कारकिर्दीत चौथ्या वर्षी नवव्या म्हणजे किसलेव महिन्याच्या चवथ्या दिवशी जखर्याहला याहवेहकडून संदेश मिळाला.