- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- जखऱ्याह ८:१३सुमारे इ.स.पू. ५१८
जसे तुम्ही, यहूदीया व इस्राएल सर्व राष्ट्रात शाप म्हटले जात असत, तर मी तुम्हाला वाचवून तुम्हाला आशीर्वाद असे करेन. तुम्ही भिऊ नका तर तुमचे बाहू बलवान करा.”
- जखऱ्याह ८:१४सुमारे इ.स.पू. ५१८
सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “जसा तुमच्यावर अरिष्ट आणण्याचा व तुमच्या पूर्वजांनी मला क्रोध आणला तेव्हा मुळीच करुणा न करण्याचा मी निर्धार केला,
- जखऱ्याह ८:१५सुमारे इ.स.पू. ५१८
तर आता मी यहूदीया व यरुशलेमचे परत भले करण्याचा निर्धार केला आहे. तुम्ही भिऊ नका.
- जखऱ्याह ८:१६सुमारे इ.स.पू. ५१८
आता तुम्ही या गोष्टी करावयाच्या आहेत: एकमेकांशी सत्य बोला, सत्यता व शांततेने तुमच्या न्यायलयात योग्य निर्णय द्या;
- जखऱ्याह ८:१७सुमारे इ.स.पू. ५१८
एकमेकांविरुद्ध दुष्ट कारस्थान करू नका आणि खोटी शपथ घेण्याची आवड धरू नका. मला या सर्वाचा अतिशय तिरस्कार वाटतो,” असे याहवेह जाहीर करतात.
- जखऱ्याह ८:१८सुमारे इ.स.पू. ५१८
सर्वसमर्थ याहवेहकडून मला वचन आले.
- जखऱ्याह ८:१९सुमारे इ.स.पू. ५१८
सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “चवथ्या, पाचव्या, सातव्या आणि दहाव्या महिन्यातील उपवास आता यहूदीयाच्या घराण्यास आनंदाचा व उल्हासाचा काळ व हर्षोत्सव म्हणून पाळले जातील. म्हणून सत्य व शांती यावर प्रीती करा.”
- जखऱ्याह ८:२०सुमारे इ.स.पू. ५१८
सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “जगभरचे लोक व अनेक नगरांमधील रहिवासी येतील,
- जखऱ्याह ८:२१सुमारे इ.स.पू. ५१८
आणि एका नगरामधील रहिवासी दुसऱ्या नगरात जातील व त्यांना म्हणतील, ‘चला आपण याहवेहला विनंती करू व सर्वसमर्थ याहवेहचा शोध घेऊ. मी स्वतःच जात आहे.’
- जखऱ्याह ८:२२सुमारे इ.स.पू. ५१८
आणि पुष्कळ लोक आणि बलाढ्य राष्ट्रे देखील यरुशलेमला येतील व सर्वसमर्थ याहवेहकडे विनंती करतील.”
- जखऱ्याह ८:२३सुमारे इ.स.पू. ५१८
सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “त्या दिवसात सर्व राष्ट्रांतील व सर्व भाषिक अशी दहा माणसे एका यहूदीच्या अंगरख्याच्या टोकास पकडून म्हणतील, ‘आम्हाला तुमच्याबरोबर येऊ द्या, कारण परमेश्वर तुम्हासोबत आहेत असे आम्ही ऐकले आहे.’ ”
- जखऱ्याह ९:१सुमारे इ.स.पू. ४८७
ही एक भविष्यवाणी आहे: हद्राख देशाविरुद्ध याहवेहचे वचन आले, आणि याचा प्रभाव दिमिष्कवरही पडेल; कारण सर्व लोकांची व इस्राएलच्या सर्व कुळांची दृष्टी याहवेहवर लागलेली आहे;
- जखऱ्याह ९:२सुमारे इ.स.पू. ४८७
सोर व सीदोनवर, आणि त्याच्या सीमेलगत असलेल्या हमाथवरही लागलेली आहे, जरी ते अत्यंत कुशल आहेत.
- जखऱ्याह ९:३सुमारे इ.स.पू. ४८७
सोर नगरीने स्वतःसाठी भक्कम गड बांधले आहेत; तिने रुपे धुळीच्या व सोने रस्त्यावरील कचऱ्याच्या राशीप्रमाणे साठवून ठेवले आहे.
- जखऱ्याह ९:४सुमारे इ.स.पू. ४८७
परंतु प्रभू तिची सर्व संपत्ती हिरावून घेतील आणि तिची समुद्रावरील शक्ती नष्ट करतील, आणि ती अग्नीत भस्म होईल.
- जखऱ्याह ९:५सुमारे इ.स.पू. ४८७
अष्कलोन हे पाहून भयभीत होईल; गाझा वेदनेने कळवळेल, व एक्रोन देखील निराशेने कोमेजून जाईल. गाझा नगरीच्या राजाला ठार करण्यात येईल आणि अष्कलोन नगरी ओसाड होईल.
- जखऱ्याह ९:६सुमारे इ.स.पू. ४८७
मिश्रजातीचे लोक अश्दोदास व्यापून टाकतील, आणि मी पलिष्ट्यांच्या गर्वाचा अंत करेन.
- जखऱ्याह ९:७सुमारे इ.स.पू. ४८७
मी त्यांच्या मुखातून रक्त व त्यांच्या दातांमधून अमंगळ अन्न बाहेर काढेन. जे अवशिष्ट लोक राहतील ते आपल्या परमेश्वराचे होतील आणि यहूदीयाच्या कुळात समाविष्ट करण्यात येतील पलिष्टी आणि एक्रोनचे पूर्वी जसे होते तसे हे लोक यबूसी लोकांप्रमाणे होतील.
- जखऱ्याह ९:८सुमारे इ.स.पू. ४८७
परंतु लुटारूंच्या आक्रमणापासून रक्षण करण्यासाठी मी माझ्या मंदिराभोवती ठाण मांडेन. यापुढे माझ्या लोकांवर कोणीही जुलूम करणारे अधिकार गाजविणार नाहीत, आता मी त्यांच्यावर लक्ष ठेवेन.
- जखऱ्याह ९:९सुमारे इ.स.पू. ४८७
सीयोनकन्ये, फार आनंद कर! यरुशलेमकन्ये, गर्जना कर! पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे, तो नीतिमान व विजयी आहे, तरी तो लीन आहे व गाढवीवर बसून तो येत आहे होय, एका गाढवीच्या शिंगरावर बसून तो येत आहे!
- जखऱ्याह ९:१०सुमारे इ.स.पू. ४८७
मी एफ्राईमचे रथ आणि यरुशलेमचे युद्धाचे अश्व काढून घेईन, आणि युद्धाचे धनुष्य मोडून टाकले जातील. आणि तो राष्ट्रांमध्ये शांतीची घोषणा करेल. त्याच्या राज्याचा विस्तार एका समुद्रापासून दुसर्या समुद्रापर्यंत आणि फरात नदीपासून पृथ्वीच्या दिगंतापर्यंत असेल.
- जखऱ्याह ९:११सुमारे इ.स.पू. ४८७
तुमच्या बाबत बोलायचे तर, रक्ताने शिक्कामोर्तब करून तुमच्याशी केलेल्या करारामुळे, मी तुमच्या बंदिवानांना निर्जल गर्तेतील मृत्यूपासून सोडविणार आहे.
- जखऱ्याह ९:१२सुमारे इ.स.पू. ४८७
अहो सर्व सुटकेची आशा करणाऱ्या बंदिवानांनो, तुमच्या गडात परत या; आता मी ही घोषणा करतो की, तुमची दुप्पटीने परतफेड करेन.
- जखऱ्याह ९:१३सुमारे इ.स.पू. ४८७
यहूदाहास मी असे वाकवेन, जसे माझे धनुष्य वाकवितो आणि एफ्राईमने ते बाणासारखे भरेन. अगे, सीयोना, मी तुझ्या पुत्रांना हे ग्रीस देशा, तुझ्या पुत्रां विरुद्ध प्रोत्साहित करेन, आणि तुला योद्ध्याच्या तलवारीसारखे करेन.
- जखऱ्याह ९:१४सुमारे इ.स.पू. ४८७
मग याहवेह त्यांच्यावर प्रगट होतील; त्यांचे बाण विजेसारखे चमकतील. सार्वभौम याहवेह रणशिंग फुंकतील; ते दक्षिणेतील वादळातून चालतील,