- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa 800–400 BC
The Hebrew Prophets
God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.
या कालखंडातील वचने
- जखऱ्याह ११:११सुमारे इ.स.पू. ४८७
त्या दिवशी तो करार रद्द झाला, आणि माझ्याकडे पाहणाऱ्या अत्याचार होत असलेल्या मेंढरांच्या कळपास कळले की हे याहवेहचे वचन होते.
- जखऱ्याह ११:१२सुमारे इ.स.पू. ४८७
मी म्हणालो, “तुम्हाला योग्य वाटत असेल तर मला माझे वेतन द्या; पण तुम्हाला वाटत नसेल तर देऊ नका.” तेव्हा त्यांनी मला चांदीची तीस नाणी दिली.
- जखऱ्याह ११:१३सुमारे इ.स.पू. ४८७
मग याहवेहने मला सांगितले, “ही नाणी कुंभारापुढे फेकून दे,” त्यांनी माझ्यासाठी किती भारी मोल ठरविले! मग मी ती चांदीची तीस नाणी घेतली व ती याहवेहच्या भवनातील कुंभारापुढे फेकली.
- जखऱ्याह ११:१४सुमारे इ.स.पू. ४८७
मग मी माझी ऐक्य नावाची दुसरी काठी मोडली, यहूदीया व इस्राएल यामधील कौटुंबिक ऐक्य भंग केले.
- जखऱ्याह ११:१५सुमारे इ.स.पू. ४८७
मग याहवेहने मला सांगितले, “परत जाऊन मूर्ख मेंढपाळाची अवजारे घे.
- जखऱ्याह ११:१६सुमारे इ.स.पू. ४८७
मी या राष्ट्रास एका अशा मेंढपाळाच्या हाती देईन, जो हरविलेल्या मेंढरांची काळजी घेणार नाही, कोकरांकडे लक्ष देणार नाही, जखमी मेंढरांना औषध देणार नाही किंवा सशक्त मेंढरांना चारा देणार नाही. त्याऐवजी तो पुष्ट मेंढरे खाऊन टाकील व त्यांची खुरे विदारून त्याचे तुकडे करेल.
- जखऱ्याह ११:१७सुमारे इ.स.पू. ४८७
“धिक्कार असो अशा कुचकामी मेंढपाळाला, जो कळपाला सोडून पळून जातो! तलवार त्याचा हात कापून व उजवा डोळा फोडून टाको! त्याचा हात पूर्णपणे निकामी होवो, आणि त्याचा उजवा डोळा पूर्णपणे अंध होवो!”
- जखऱ्याह १२:१सुमारे इ.स.पू. ४८७
एक भविष्यवाणी: इस्राएलच्या बाबत याहवेहचे वचन. याहवेह, ज्यांनी आकाश विस्तारले, पृथ्वीचा पाया घातला आणि मनुष्यांच्या अंतर्यामी आत्मा घातला, ते जाहीर करतात:
- जखऱ्याह १२:२सुमारे इ.स.पू. ४८७
“मी यरुशलेमला प्याल्याप्रमाणे करेन, जो पिऊन सभोवतालची राष्ट्रे झोकांड्या खातील. यहूदीया तसेच इस्राएलच्या सभोवती वेढा घातल्या जाईल.
- जखऱ्याह १२:३सुमारे इ.स.पू. ४८७
त्या दिवशी, पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे एकत्र होतील, तेव्हा मी यरुशलेमला हालविता न येणारा खडक करेन. जे तिला हालविण्याचा प्रयत्न करतील, उलट ती राष्ट्रेच घायाळ होतील.
- जखऱ्याह १२:४सुमारे इ.स.पू. ४८७
त्या दिवशी, मी प्रत्येक घोड्याला भयचकित करेन व त्याच्या स्वारांची मति भ्रष्ट करेन. मी यहूदीयाच्या लोकांवर लक्षपूर्वक नजर ठेवेन, पण इतर राष्ट्रांना आंधळे करेन,” असे याहवेह जाहीर करतात.
- जखऱ्याह १२:५सुमारे इ.स.पू. ४८७
“मग यहूदाहची कुळे आपल्या मनात म्हणतील, ‘यरुशलेमचे लोक सामर्थ्यशाली आहेत, कारण सर्वसमर्थ याहवेह त्यांचे परमेश्वर आहेत.’
- जखऱ्याह १२:६सुमारे इ.स.पू. ४८७
“त्या दिवशी मी यहूदीयाच्या कुळांना, लाकडाच्या ढिगाऱ्यातील आगटीसारखे, पेंढ्यांमध्ये टाकलेल्या पेटत्या मशालीसारखे करेन; ती कुळे उजवीकडील व डावीकडील सर्व शेजारील राष्ट्रांना जाळून भस्म करतील. यरुशलेम मात्र अचल अशी राहील.
- जखऱ्याह १२:७सुमारे इ.स.पू. ४८७
“याहवेह यहूदीयाच्या आवासाला प्रथम वाचवतील, जेणेकरून दावीदाच्या घराण्याचा व यरुशलेमच्या रहिवाशांचा आदर यहूदीयापेक्षा महान होणार नाही.
- जखऱ्याह १२:८सुमारे इ.स.पू. ४८७
त्या दिवशी याहवेह यरुशलेमच्या रहिवाशांचे रक्षण करतील, जेणेकरून त्यांच्यातील अत्यंत दुर्बलदेखील दावीद राजासारखे होतील, महापराक्रमी ठरतील. आणि दावीदाचे राजघराणे परमेश्वरासारखे होईल, त्यांच्या अग्रभागी चालणार्या याहवेहच्या दूतासारखे होईल.
- जखऱ्याह १२:९सुमारे इ.स.पू. ४८७
त्या दिवशी यरुशलेमवर हल्ला करणार्या सर्व राष्ट्रांना मी नष्ट करण्यास निघेन.
- जखऱ्याह १२:१०सुमारे इ.स.पू. ४८७
“मग मी दावीदाच्या घराण्यावर व यरुशलेमच्या सर्व रहिवाशांवर कृपेचा आणि विनंतीचा आत्मा ओतेन आणि ज्याला त्यांनी भोसकले त्या माझ्याकडे ते पाहतील आणि एकुलत्या एका पुत्रासाठी करावा, तसा ते त्याच्यासाठी शोक करतील आणि प्रथम पुत्रासाठी करावा, तसा ते त्याच्यासाठी विलाप करतील.
- जखऱ्याह १२:११सुमारे इ.स.पू. ४८७
त्या दिवशी यरुशलेमातील आकांत इतका मोठा असेल, जसा मगिद्दोच्या खोर्यात ठार झालेल्या हदाद-रिम्मोनासाठी होता.
- जखऱ्याह १२:१२सुमारे इ.स.पू. ४८७
संपूर्ण इस्राएल राष्ट्र दुःखाने आक्रंदन करेल, प्रत्येक गोत्र, ते स्वतः व त्यांच्या पत्नींसहः दावीदाच्या घराण्याचे गोत्र व त्यांच्या पत्नी, नाथानाच्या घराण्याचे गोत्र व त्यांच्या पत्नी,
- जखऱ्याह १२:१३सुमारे इ.स.पू. ४८७
लेवी घराण्याचे गोत्र व त्यांच्या पत्नी, शिमी घराण्याचे गोत्र व त्यांच्या पत्नी,
- जखऱ्याह १२:१४सुमारे इ.स.पू. ४८७
आणि राहिलेले सर्व गोत्र व त्यांच्या पत्नी.
- जखऱ्याह १३:१सुमारे इ.स.पू. ४८७
“त्या दिवशी दावीदाच्या घराण्यातून आणि यरुशलेममधील लोकांमधून एक झरा उगम पावेल, तो त्याच्या लोकांना सर्व पापांपासून आणि अशुद्धतेपासून शुद्ध करेल.
- जखऱ्याह १३:२सुमारे इ.स.पू. ४८७
“त्या दिवशी, मी संपूर्ण देशातून मूर्तींच्या नावाचा समूळ उच्छेद करेन, ते त्यांच्या स्मरणातही राहणार नाही. सर्व खोट्या संदेष्ट्यांचा आणि अशुद्धतेच्या आत्म्याचा मी समूळ नाश करेन,” सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात.
- जखऱ्याह १३:३सुमारे इ.स.पू. ४८७
“आणि जर कोणी पुन्हा खोटे भविष्यकथन करू लागला, ज्यांनी त्याला जन्म दिला ते त्याचे खुद्द आईवडीलच त्याला सांगतील, ‘तू मेलाच पाहिजे, कारण तू याहवेहच्या नावाने खोटे बोलत आहेस.’ ते भविष्यकथन करणाऱ्यास भोसकून जिवे मारतील!
- जखऱ्याह १३:४सुमारे इ.स.पू. ४८७
“त्या दिवशी प्रत्येक खोटा संदेष्टा आपल्या भविष्यकथनाच्या दानाबद्दल लज्जित होईल. ते संदेष्ट्यांसाठी केसांनी बनविलेली विशिष्ट वस्त्रे घालणार नाहीत.