मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जखऱ्याह १३:५सुमारे इ.स.पू. ४८७

    प्रत्येकजण म्हणेल, ‘मी संदेष्टा नाही; मी एक शेतकरी आहे; तारुण्यापासून भूमीची मशागत करणे माझ्या उपजीविकेचे साधन आहे.’

  2. जखऱ्याह १३:६सुमारे इ.स.पू. ४८७

    त्याला कोणी विचारले, ‘तुझ्या छातीवर आणि पाठीवर हे घाव कशाचे आहेत?’ तेव्हा तो म्हणेल, ‘माझ्या मित्राच्या घरी या जखमा मला दिल्या आहेत!’

  3. जखऱ्याह १३:७सुमारे इ.स.पू. ४८७

    “अगे तलवारी, माझ्या मेंढपाळाविरुद्ध जागी हो, माझ्या घनिष्ठ सोबत्याविरुद्ध ऊठ!” सर्वसमर्थ याहवेह म्हणतात, “मेंढपाळावर प्रहार कर, म्हणजे मेंढरांची पांगापांग होईल, आणि मी माझा हात कोकरांविरुद्ध उगारेन.”

  4. जखऱ्याह १३:८सुमारे इ.स.पू. ४८७

    याहवेह जाहीर करतात, “इस्राएलाच्या संपूर्ण राष्ट्रातील दोन तृतीयांश लोकांचा उच्छेद होईल व ते मरण पावतील, परंतु एकतृतीयांश लोक देशात उरतील.

  5. जखऱ्याह १३:९सुमारे इ.स.पू. ४८७

    हा तिसरा भाग अग्नीत घालून चांदी शुद्ध करतात तसा मी शुद्ध करेन. आणि सोन्यासारखी त्यांची परीक्षा करेन. ते मला माझ्या नावाने हाक मारतील आणि मी त्यांच्या हाकेला उत्तर देईन; मी म्हणेन, ‘ते माझे लोक आहेत,’ आणि ते म्हणतील, ‘याहवेह आमचे परमेश्वर आहेत.’ ”

  6. जखऱ्याह १४:१सुमारे इ.स.पू. ४८७

    याहवेहचा दिवस येत आहे, ज्या दिवशी तुमची संपत्ती लुटली जाईल आणि तुमच्याच भिंतीच्या आत त्याची वाटणी केली जाईल.

  7. जखऱ्याह १४:२सुमारे इ.स.पू. ४८७

    मी यरुशलेमविरुद्ध युद्ध करण्यास सर्व राष्ट्रांना एकत्र करेन; नगर हस्तगत केले जाईल आणि घरे लुटली जातील, स्त्रियांवर बलात्कार करण्यात येईल. नगरीतील अर्धे लोक बंदिवासात जातील, परंतु उरलेले लोक नगरीतच राहतील.

  8. जखऱ्याह १४:३सुमारे इ.स.पू. ४८७

    मग याहवेह बाहेर पडून लढाईच्या दिवशी करतात तसे, त्या राष्ट्रांशी युद्ध करतील.

  9. जखऱ्याह १४:४सुमारे इ.स.पू. ४८७

    त्या दिवशी त्यांचे पाय यरुशलेमच्या पूर्वेस असलेल्या जैतुनाच्या पर्वतावर उभे राहतील आणि जैतूनांचा पर्वत पूर्वपश्चिम दुभागून मध्ये एक मोठे खोरे निर्माण होईल, अर्धा पर्वत उत्तरेकडे व अर्धा पर्वत दक्षिणेकडे सरेल.

  10. जखऱ्याह १४:५सुमारे इ.स.पू. ४८७

    तुम्ही माझ्या खोर्‍यातून पळ काढाल, कारण ते खोरे आझल नगरीच्या वेशीपर्यंत भिडेल. ज्याप्रमाणे अनेक शतकांपूर्वी तुमचे लोक, यहूदीयाचा राजा उज्जीयाहच्या काळात भूकंप झाला होता तेव्हा निसटून गेले होते, त्याचप्रमाणे तुम्हीही निसटून जाल आणि मग याहवेह, माझे परमेश्वर येतील आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व पवित्रजनही येतील.

  11. जखऱ्याह १४:६सुमारे इ.स.पू. ४८७

    त्या दिवशी सूर्यप्रकाश नसेल व थंड, धुक्याचा अंधकारही नसेल.

  12. जखऱ्याह १४:७सुमारे इ.स.पू. ४८७

    तो एक अद्वितीय दिवस असेल—फक्त याहवेहलाच माहीत असलेला तो दिवस असेल—दिवस व रात्रीत फरक राहणार नाही. संध्याकाळ झाली, तरीही प्रकाश असेल.

  13. जखऱ्याह १४:८सुमारे इ.स.पू. ४८७

    त्या दिवशी जीवनजल यरुशलेमातून बाहेर वाहील, त्यातील अर्धे पूर्व दिशेला मृत समुद्राकडे व अर्धे पश्चिम दिशेला भूमध्यसुमद्राकडे वाहतील, उन्हाळ्यात व हिवाळ्यात ते निरंतर वाहत राहतील.

  14. जखऱ्याह १४:९सुमारे इ.स.पू. ४८७

    तेव्हा याहवेह सर्व पृथ्वीचे राजा होतील. त्या दिवशी फक्त एकच याहवेह असतील व केवळ त्यांच्याच नामाची उपासना होईल.

  15. जखऱ्याह १४:१०सुमारे इ.स.पू. ४८७

    यहूदीयाच्या उत्तरेकडील सीमेपासून म्हणजे गेबापासून ते दक्षिणेकडील सीमेपर्यंतची म्हणजे रिम्मोन पर्यंतची सर्व भूमी अराबासारखी शुष्क होईल, परंतु यरुशलेम उंचावल्या जाईल, बिन्यामीनच्या वेशीपासून पहिल्या वेशीपर्यंत व कोपर्‍याच्या वेशीपर्यंत आणि हनानेलाच्या बुरुजापासून शाही द्राक्षकुंडांपर्यंत असेल व या स्थानावर ते अचल राहील.

  16. जखऱ्याह १४:११सुमारे इ.स.पू. ४८७

    तिच्यात लोकवस्ती होईल; पुन्हा कधीही तिचा नाश होणार नाही. यरुशलेम सुरक्षित होईल.

  17. जखऱ्याह १४:१२सुमारे इ.स.पू. ४८७

    जे लोक यरुशलेमविरुद्ध लढले, त्या सर्व लोकांवर याहवेह ही मरी पाठवतील: स्वतःच्या पायावर उभे असतानाच त्यांचे मांस सडत जाईल; त्यांचे डोळे त्यांच्या खाचेत सडतील, आणि त्यांच्या जिभा त्यांच्या तोंडातच सडतील.

  18. जखऱ्याह १४:१३सुमारे इ.स.पू. ४८७

    याहवेहकडून आलेल्या भयंकर भीतीने त्यांना धडकी भरेल. त्यांची त्रेधा उडून ते एकमेकांवर हल्ला करतील.

  19. जखऱ्याह १४:१४सुमारे इ.स.पू. ४८७

    यहूदीयाही यरुशलेमात लढेल. शेजारच्या सर्व राष्ट्रांची संपत्ती—सोने आणि रुपे व तलम कपडे यांचे मोठमोठे साठे जप्त केले जातील.

  20. जखऱ्याह १४:१५सुमारे इ.स.पू. ४८७

    अशीच मरी घोडे, खेचरे, उंट, गाढवे यावर आणि शत्रूच्या ठाण्यातील इतर सर्व प्राण्यांवर पसरेल.

  21. जखऱ्याह १४:१६सुमारे इ.स.पू. ४८७

    मग ज्यांनी यरुशलेमवर आक्रमण केले त्या सर्व राष्ट्रातून वाचलेले अवशिष्ट लोक प्रत्येक वर्षी वर यरुशलेमला राजाधिराज सर्वसमर्थ याहवेहची भक्ती करण्यास, मंडपाचा सण पाळण्यास व आराधना करण्यास जातील.

  22. जखऱ्याह १४:१७सुमारे इ.स.पू. ४८७

    आणि या संपूर्ण जगातील एखाद्या राष्ट्रातील लोकांनी यरुशलेमला येण्याचे व राजाधिराज सर्वसमर्थ याहवेहची आराधना करण्याचे नाकारले, तर त्यावर पर्जन्यवृष्टी होणार नाही.

  23. जखऱ्याह १४:१८सुमारे इ.स.पू. ४८७

    जर इजिप्तच्या लोकांनी येण्याचे नाकारले तर त्यांना पर्जन्यवृष्टी मिळणार नाही. याहवेह त्यांच्यावर मरी पाठवतील, जे मंडपाचा सण पाळण्यास यरुशलेमला येण्याचे नाकारतात.

  24. जखऱ्याह १४:१९सुमारे इ.स.पू. ४८७

    म्हणून इजिप्त व इतर राष्ट्रे जे मंडपाचा सण पाळण्यास यरुशलेमला येण्याचे नाकारतील, त्या सर्वांना ही शिक्षा करण्यात येईल.

  25. जखऱ्याह १४:२०सुमारे इ.स.पू. ४८७

    त्या दिवशी घोड्यांच्या गळ्यात घातलेल्या घंटावर “याहवेहसाठी पवित्र” असे लिहिलेले असेल आणि याहवेहच्या भवनातील सर्व स्वयंपाकाची भांडी वेदीपुढे ठेवावयाच्या पवित्र कटोर्‍यांसारखी होतील.