मुख्य मजकुरावर जा

circa 800–400 BC

The Hebrew Prophets

God speaks through Isaiah, Jeremiah, and the minor prophets—calling Israel to repentance and foretelling the coming Messiah.

3,706 वचने · 14 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मलाखी २:११सुमारे इ.स.पू. ३९७

    यहूदाहने विश्वासघात केला. इस्राएल आणि यरुशलेम येथे अत्यंत घृणास्पद कार्य केले आहे: यहूदीयाच्या पुरुषांनी याहवेहचे प्रिय मंदिर परकीय मूर्तिपूजक स्त्रियांशी विवाह करून भ्रष्ट केले आहे.

  2. मलाखी २:१२सुमारे इ.स.पू. ३९७

    ज्याने अशी गोष्ट केली आहे, मग तो कोणीही असो, तो सर्वसमर्थ याहवेहस अर्पणे वाहत असेल तरीही याहवेह त्याला याकोबाच्या तंबूमधून काढून टाको.

  3. मलाखी २:१३सुमारे इ.स.पू. ३९७

    दुसरी गोष्ट तुम्ही ही करता: तुम्ही याहवेहच्या वेदीवर अश्रूंचा पूर वाहता. तुम्ही रडता व आक्रोश करता, कारण ते तुमच्या हातातील अर्पणांवर कृपादृष्टी टाकत नाहीत व प्रसन्नतेने त्यांचा स्वीकार करीत नाहीत.

  4. मलाखी २:१४सुमारे इ.स.पू. ३९७

    तुम्ही विचारता, “का?” कारण याहवेह तुम्ही व तुमच्या तारुण्यातील पत्नी मधील साक्षीदार आहेत. ती तुमची सहचारिणी आहे व तुमच्या वैवाहिक कराराद्वारे तुमची पत्नी आहे, तरीही तुम्ही तिचा विश्वासघात केला.

  5. मलाखी २:१५सुमारे इ.स.पू. ३९७

    तुम्हाला एकाच परमेश्वराने निर्माण केले नाही का? तुमचे शरीर व आत्मा त्यांचाच मालकीचे आहे. आणि एका परमेश्वरास काय हवे असते? धार्मिक संतती. म्हणून सावध राहा, आपल्या तारुण्यातील पत्नीचा विश्वासघात करू नका.

  6. मलाखी २:१६सुमारे इ.स.पू. ३९७

    याहवेह इस्राएलाचे परमेश्वर म्हणतात, “जिला संरक्षण देणे हे त्याचे कर्तव्य आहे, तिच्याविरुद्ध तो हिंसाचार करतो, तिचा तो तिरस्कार करतो व तिला घटस्फोट देतो.” म्हणून सावध राहा व विश्वासघात करू नका.

  7. मलाखी २:१७सुमारे इ.स.पू. ३९७

    तुम्ही आपल्या शब्दांनी याहवेहला त्रागा आणला आहे. पण तुम्ही विचारता, “आम्ही याहवेहला त्रागा कसा आणला?” असे म्हणूनच, “जे सर्व लोक दुष्टता करतात, ते याहवेहच्या दृष्टीने चांगले आहेत व ते त्यांच्यावर प्रसन्न आहेत, मग न्यायी परमेश्वर कुठे आहेत?”

  8. मलाखी ३:१सुमारे इ.स.पू. ३९७

    “मी माझा संदेष्टा पाठवेन, जो माझ्यापुढे मार्ग तयार करेल. मग ज्यांची तुम्ही वाट पाहत आहात, ते प्रभू अकस्मात त्यांच्या मंदिरात येतील; ते कराराचे संदेशवाहक, ज्यांची तुम्ही फार आतुरतेने इच्छा करीत आहात ते येतील,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.

  9. मलाखी ३:२सुमारे इ.स.पू. ३९७

    पण त्यांच्या येण्याचा दिवस कोण सहन करू शकेल? त्यांच्या आगमनास कोण सामोरा जाऊ शकेल? कारण तो मौल्यवान धातू शुद्ध करणार्‍या धगधगत्या अग्नीसारखा आहे आणि मलीन वस्त्रे धुणाऱ्या साबणासारखा असेल.

  10. मलाखी ३:३सुमारे इ.स.पू. ३९७

    रुपे शुद्ध करणार्‍यासारखा तो बसेल; तो लेवींना सोने व रुप्याप्रमाणे शुद्ध करेल. मग याहवेहकडे नीतिमत्तेने अर्पणे वाहणारे पुरुष असतील,

  11. मलाखी ३:४सुमारे इ.स.पू. ३९७

    मग पूर्वीच्या दिवसाप्रमाणे आणि गतवर्षासारखे पुन्हा एकदा यहूदीया व यरुशलेम येथील लोकांनी आणलेली अर्पणे याहवेहस मान्य होतील.

  12. मलाखी ३:५सुमारे इ.स.पू. ३९७

    “त्यावेळी मी येईन आणि तुमची पारख करून न्याय करेन. जादूटोणा करणारे, व्यभिचारी व खोटी साक्ष देणारे, आपल्या मजुरांना लुबाडणारे, विधवा व अनाथांवर जुलूम करणारे, परकियांना न्यायापासून वंचित करणारे, पण माझे भय न बाळगणारे, अशा सर्व दुष्ट लोकांविरुद्ध मी त्वरित कारवाई करेन,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.

  13. मलाखी ३:६सुमारे इ.स.पू. ३९७

    “मी याहवेह बदलत नाहीत. म्हणून तुम्ही, याकोबाचे वंशज नष्ट झाला नाहीत.

  14. मलाखी ३:७सुमारे इ.स.पू. ३९७

    तुमच्या पूर्वजांच्या काळापासून तुम्ही माझ्या विधिनियमापासून दूर जात आहात व त्यांचे पालन करीत नाही. माझ्याकडे पुन्हा या व मी तुमच्याकडे परत येईन,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात. “पण तुम्ही विचारता, ‘आम्ही तुमच्याकडे परत कसे यावे?’

  15. मलाखी ३:८सुमारे इ.स.पू. ३९७

    “एखादा मर्त्यमनुष्य परमेश्वराला लुबाडू शकेल काय? तरीही तुम्ही मला लुबाडले आहे. “पण तुम्ही विचारता, ‘आम्ही तुम्हाला कसे लुबाडत आहोत?’ “दशांश आणि अर्पणात.

  16. मलाखी ३:९सुमारे इ.स.पू. ३९७

    तुमच्यावर शाप आहे—तुमचे संपूर्ण राष्ट्र—तुम्ही मला लुबाडीत आहात.

  17. मलाखी ३:१०सुमारे इ.स.पू. ३९७

    तुमचा सर्व दशांश मंदिराच्या भांडारात आणा म्हणजे माझ्या भवनात पुरेसे अन्न राहील. याबाबत तुम्ही माझी परीक्षा घ्या,” सर्वसमर्थ याहवेह म्हणतात. “आणि बघा तुमच्यासाठी मी स्वर्गाची धरणद्वारे उघडेन आणि तुमच्यावर आशीर्वादाचा एवढा वर्षाव करेन की ते साठविण्यास तुमच्याजवळ पुरेशी जागाही असणार नाही.

  18. मलाखी ३:११सुमारे इ.स.पू. ३९७

    कीटकांना तुमची पिके नाश करण्यापासून मी रोखेन आणि तुमच्या मळ्यातील द्राक्षे पिकण्यापूर्वी गळणार नाहीत,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.

  19. मलाखी ३:१२सुमारे इ.स.पू. ३९७

    “सर्व राष्ट्रे तुम्हाला धन्य म्हणतील, कारण तुमची भूमी आनंददायी असेल.” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.

  20. मलाखी ३:१३सुमारे इ.स.पू. ३९७

    याहवेह म्हणतात, “तुम्ही माझ्याविरुद्ध उर्मटपणे बोलता.” “तरी तुम्ही विचारता, ‘तुमच्याविरुद्ध आम्ही काय बोललो?’

  21. मलाखी ३:१४सुमारे इ.स.पू. ३९७

    “तुम्ही असे म्हणाला, ‘परमेश्वराची सेवा करणे व्यर्थ आहे. त्यांचे सर्व विधिनियम पाळण्याने किंवा सर्वसमर्थ याहवेहपुढे शोक करण्याऱ्यासारखे जाण्याने आम्हाला काय मिळते?

  22. मलाखी ३:१५सुमारे इ.स.पू. ३९७

    पण आता, आपण जे उद्धट ते धन्य असे म्हणू. कारण दुष्टाई करणाऱ्यांची निश्चितच भरभराट होते आणि ते परमेश्वराची परीक्षा पाहतात, तरी ते निर्दोष ठरतात.’ ”

  23. मलाखी ३:१६सुमारे इ.स.पू. ३९७

    मग याहवेहचे भय बाळगणार्‍यांनी एकमेकांशी चर्चा केली आणि याहवेहने ती लक्षपूर्वक ऐकली. नंतर याहवेहच्या समक्ष, एका चर्मपत्राच्या गुंडाळीवर याहवेहचे भय बाळगणारे व त्यांच्या नावाचा सन्मान करणारे यांच्यासंबंधीची स्मरण पुस्तिका लिहिण्यात आली.

  24. मलाखी ३:१७सुमारे इ.स.पू. ३९७

    सर्वसमर्थ याहवेह म्हणतात, “त्या दिवशी मी कृती करेन, ते लोक माझी मौल्यवान संपत्ती होतील; आणि ज्याप्रमाणे एखादा पिता आपली सेवा करणाऱ्या पुत्राची गय करतो, त्याप्रमाणे मी त्यांची गय करेन.

  25. मलाखी ३:१८सुमारे इ.स.पू. ३९७

    मग नीतिमान व दुष्ट माणसे, त्याचप्रमाणे परमेश्वराची सेवा करणारे व सेवा न करणारे यातील फरक तुम्हाला दिसून येईल.”